पिंपरी : भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेनंतर शहर भाजपमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. विशेष म्हणजे चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांना काही पदाधिकारी जाणून-बुजून डावलत असल्याचे बोलले जाऊ लागले, अशा पदाधिकाऱ्यांवर पक्षाने कारवाई करावी, अशी मागणी होऊ लागली. शहरात जोरदार चर्चा रंगली असताना अखेर यावर भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी पडदा टाकला आहे.
आम्ही पक्ष म्हणून एकत्र आहोत
आमच्या पक्षात कोणीही नाराज नाही. आम्ही पक्ष म्हणून एकत्र आहोत, पक्ष म्हटले की समज-गैरसमज होत असतात. अश्विनी लक्ष्मण जगताप यांना गैरसमज झाला होता, असे शंकर जगताप यांनी पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
पत्रकारांच्या समोर चांगलंच खडसावले
चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी गेल्या आठवड्यात भाजपच्या पत्रकार परिषदेत भाजप पदाधिकाऱ्याला पत्रकारांच्या समोर चांगलंच खडसावले होते. त्यामुळे भाजपमध्ये विद्यमान आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांना डावलले जात असल्याची चर्चा रंगली होती. आमदारांचा अपमान करणाऱ्या पदाधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. तसेच अश्विनी जगताप यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन शंकर जगताप यांना टार्गेट करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.
भाजपमध्ये नाराजी
शंकर जगताप यांना शहराध्यक्ष पद दिल्यानंतर भाजपमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. तर आमदार जगताप आणिशहराध्यक्ष जगताप यांच्यातही काहीसे अलबेल नसल्याचे बोलले जात आहे. या सगळ्यामुळे शहर भाजप मधील वाद चव्हाट्यावर आलेअसून यावर प्रदेशाध्यक्ष चन्द्रशेखर बावनकुळे यांनाही बोलावे लागले.
भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांची प्रतिक्रिया
या सगळ्या प्रकारानंतर अखेर भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनागैरसमज झाला होता म्हणून त्यांच्याकडून काही शब्द अनावधानाने गेले होते. त्या पदाधिकाऱ्याने देखील काही शब्द काढला नाही, त्यावडीलधाऱ्या आहेत, पक्ष म्हटलं की समज-गैरसमज असतात. आम्ही सर्व एकत्र आहोत,असे शंकर जगताप म्हणाले. भाजपमध्येनिष्ठावंत नाराज नाहीत. उलट कार्यकारणीत निष्ठावंतांना सर्वात जास्त पदे देण्यात आली आहेत. परंतु, पक्ष संघटना म्हटलं की, नाराजीयेते, त्यांची नाराजी दूर करण्याचा मी प्रयत्न करेल, असं देखील शंकर जगताप यांनी म्हटलं आहे. आमदारकी बाबत पक्षश्रेष्ठी जोनिर्णय घेतील तो मला मान्य असेल, असेही ते म्हणाले.
Web Title: Misunderstanding mla ashwini jagtap argument between city bjp on brink finally explanation of bjp city president shankar jagtap nryb