महेंद्र वानखेडे, मिरा भाईंदर: मिरा भाईंदरमध्ये (Mira Bhaynder News) एक वेगळीच घटना समोर आली आहे. आमदार गीता जैन (MLA Geeta Jain) यांनी मिरा भाईंदर पालिका अधिकाऱ्याला कानशिलात लगावल्याची माहिती मिळाली आहे. मिरा भाईंदरमधील प्रभाग समिती सहाचे इंजिनीअर शुभम पाटील आणि संजय सोनी बांधकाम तोडण्यासाठी गेले असता आमदारांनी त्यांना चांगलंच झापलं.
यावेळी आमदार गीता जैन दोघांना ओरडत असताना इंजिनीअर शुभम पाटील हसल्याने गीता जैन यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी थेट कॉलर पकडून इंजिनीअर शुभम पाटील यांच्या कानाखाली वाजवली.