उत्तर कोपर्डे हवेली य़ेथील रेल्वे स्थानकावर अजमेर रेल्वे अपघाताचे मॉक ड्रिल (फोटो - टीम नवराष्ट्र)
मसूर : देशामध्ये रेल्वे अपघात वाढले आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. साताऱ्यामध्ये देखील असाच काहीचा अपघात झाला आहे. उत्तर कोपर्डे हवेली गावाच्या हद्दीतील रेल्वे गेटवर अपघात झाला. पहाटे पाच वाजेच्या वेळेमध्ये अजमेर एक्सप्रेसला ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची धडक बसली. या घटनेमुळे रेल्वे प्रशासनासह पोलीस व संबंधित यंत्रणेची एकच तारांबळ उडाली होती. मात्र ही एक मॉक ड्रिल समजतात सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. यामुळे सर्वांचा जीव भांड्यात पडले. पण काही काळासाठी कोपर्डे हवेली गावाच्या हद्दीवरील रेल्वे स्थानकामध्ये सारं काही एक थ्रील अनुभवास मिळाले.
या संदर्भात घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, उत्तरकोपर्डे हवेलीच्या पावक्ता परिसरा नजिक असलेल्या रेल्वे गेट न.९७ वर पहाटे पाच वाजता मोठा आवाज झाला. त्याच दरम्यान रुग्णवाहिका, पोलीस गाडीच्या सायरनच्या आवाजाने स्थानिकांच्या मनात धडकी भरवली. नेमके घडले काय ॽ असा प्रश्न पडला. दरम्यान पुणेकडून मिरजकडे जाणाऱ्या अजमेर एक्सप्रेसला ऊसवाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरची धडक दिल्याची माहिती गेटमन नरेंद्र मीना यांनी कराड रेल्वे स्टेशनचे स्टेशनमास्तर अमरीश कुमार यांना दिली. यानंतर स्टेशन मास्तर यांनी ही माहिती रेल्वे सुरक्षा बल, रुग्णवाहिका व स्थानिक पोलीस प्रशासनाला कळवली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती मिळताच रेल्वे प्रशासन अलर्ट झाले. आर.पी.एफ, सिग्नल विभाग, टेलिकॉम, इंजिनिअरिंग, टी.आर.डी विभागातील अधिकारी यांनी गेट न ९७ वर तातडीने धाव घेतली. घटनास्थळी पाहणी करून मिळालेल्या माहितीची खातरजमा केली. मात्र प्रत्यक्षात अपघात झाला नाही. अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक व अतिरिक्त विभागीय सुरक्षा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मॉक ड्रिल घेण्यात आले. हे लक्षात येताच सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. एकंदरीत सर्वांचा जीव भांड्यात पडला.
अजमेर एक्सप्रेस पाऊण तास उशिरा
प्रत्यक्ष घटना घडल्याचे भासवण्यासाठी व सतर्कता बाळगण्यासाठी, अधिकाऱ्यांना घटनेचे गांभीर्य लक्षात यावे. यासाठी पुण्यावरून मिरजकडे जाणारी अजमेर एक्सप्रेस माॅक ड्रील दरम्यान गेट नंबर ९७ वर पाऊण तास थांबवून ठेवण्यात आली होती.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
स्थानिकांचा जीव टांगणीला…
पहाटे पाचच्या सुमारास रेल्वे गेट नंबर ९७ परिसरात फटाके वाजवून मोठा आवाज करण्यात आला होता. पाठोपाठ रुग्णवाहिका व पोलीस गाड्यांच्या सायरनच्या आवाजाने नागरिकांची झोप उडाली. नक्की काय झाले हे लोकांना समजत नव्हते. स्थानिकांचा जीव टांगणीला लागला होता. मात्र मॉक ड्रिल असल्याचे समजतात सर्वांना हायसे वाटले. यामुळेप्रशासनाला आणि यंत्रणेला तातडीने घडणाऱ्या या घटनेची माहिती व अनुभव घेता आला.अजमेर एक्सप्रेस रेल्वे अपघाताचे मॉक ड्रिल तसेच यंत्रणेची सुसज्जता देखील लक्षात आली.