Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भक्तीच्या महापुरात न्हाली मोहोळ नगरी; गुरू-शिष्य भेट अन् खर्गे महाराजांकडून ‘ही’ भाकणूक

Satara News : ; रणरणत्या उन्हात श्री नागनाथ महाराजांचा जयघोषामध्ये मोहोळमधील यात्रा पार पडली. यावेळी ​गुरू-शिष्य भेटीचा सोहळा पाहण्यासाठी जनसागर लोटला होता.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 24, 2026 | 10:52 AM
Mohol Village Nagnath Maharaj yatra bhaknuk Celebrated with Great Enthusiasm in Satara News

Mohol Village Nagnath Maharaj yatra bhaknuk Celebrated with Great Enthusiasm in Satara News

Follow Us
Follow Us:

 

​Satara News : मोहोळ :  दादासाहेब गायकवाड : प्रचंड उष्णता आणि घामाच्या धारांची पर्वा न करता, ‘ना चिंता ना भय, नागनाथ महाराज की जय’च्या जयघोषात मोहोळचे ग्रामदैवत श्री नागनाथ महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी झाली. गुरुवारी पार पडलेल्या या सोहळ्यात हजारो भाविकांनी आपल्या लाडक्या दैवताच्या दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती.

​यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या श्रींच्या पालखीची आणि गणांची सवाद्य मिरवणूक पारंपरिक थाटात निघाली. डोक्यावर तळपणारा सूर्य असतानाही भाविकांच्या उत्साहात कोणतीही कमतरता भासली नाही. या मिरवणुकीत साकी आणि अभंगांच्या स्वरांनी चैतन्य भरले होते, तर ‘शेख नसरुद्दीन बादशहा की दो चिराऊ दिन…’ या जयघोषाने सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडवले.

​गुरू-शिष्यांचे मिलन आणि खर्ग तीर्थावरील गर्दी
​
या सोहळ्याचा सर्वात भावूक क्षण म्हणजे राजेंद्र खर्गे महाराज आणि अरुण काका मोहोळकर यांची ‘गुरू-शिष्य भेट’. खर्ग तीर्थावर संपन्न झालेल्या या भेटीचे साक्षीदार होण्यासाठी शेकडो भाविक उपस्थित होते. मिरवणूक मंदिरात परतल्यानंतर महाआरती झाली आणि भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही खर्गे महाराजांनी पावसाची भाकणूक केली. त्यांच्या वर्तवलेल्या अंदाजानुसार
​पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा : शाहूपुरीतील पाणीपुरवठा पिवळसर! दूषित पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात? जाणून घ्या उपाययोजना
​
पाऊस कमी असला तरी खरीप आणि रब्बी हंगामातील पेरण्या मोठ्या प्रमाणात होतील.
भविष्यात चारा टंचाईमुळे चाऱ्याचे दर वाढण्याची आणि काही काळ रोगराई पसरण्याची शक्यता आहे.

​यात्रेनिमित्त मोहोळमध्ये आनंदाचे वातावरण होते. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांसाठी मनोरंजनाचे साधन म्हणून मोठे पाळणे, खेळण्यांची दुकाने आणि मिठाईचे स्टॉल्स लावण्यात आले होते. उन्हाचा तडाखा लक्षात घेता, शहरातील विविध सामाजिक संस्था, यांच्या वतीने ठिकठिकाणी थंड पाणी, सरबत आणि नाष्ट्याची सोय करण्यात आली होती.

हे देखील वाचा : NCERT चा अजब कारभार! मराठा साम्राज्याचा नकाशा वगळल्याने इतिहासप्रेमी आक्रमक

श्री नागनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त मोहोळ शहरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती, या पार्श्वभूमीवर मोहोळ पोलिसांनी अत्यंत चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. यात्रेदरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मंदिर परिसरावर पोलिस लक्ष ठेवून होते. साध्या वेशातील पोलिसांची गस्तही वाढवण्यात आली होती. पोलिसांच्या या सतर्कतेमुळे आणि सुनियोजित नियोजनामुळे आता पर्यंतचा संपूर्ण यात्रा सोहळा अत्यंत शांततेत पार पडला. पोलिस प्रशासनाच्या या कामगिरीचे भाविक आणि स्थानिक नागरिकांकडून कौतुक होत आहे. ​देवस्थान कमिटी आणि नागेश भक्तांच्या नियोजनामुळे हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.

Web Title: Mohol village nagnath maharaj yatra bhaknuk celebrated with great enthusiasm in satara news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 10:52 AM

Topics:  

  • maharashtra news
  • Satara News
  • Yatra News

संबंधित बातम्या

Satara ZP Education Officer: सातारा जिल्हा परिषदेत खळबळ! शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे राज्य शासनाकडून निलंबित
1

Satara ZP Education Officer: सातारा जिल्हा परिषदेत खळबळ! शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे राज्य शासनाकडून निलंबित

Tukaram Mundhe: महाराष्ट्रात मोठा घोळ! 11 रुपयांचा IV Set 325 ला विक्री, तुकाराम मुंडेंनी केंद्रीय हस्तक्षेपाची केली मागणी
2

Tukaram Mundhe: महाराष्ट्रात मोठा घोळ! 11 रुपयांचा IV Set 325 ला विक्री, तुकाराम मुंडेंनी केंद्रीय हस्तक्षेपाची केली मागणी

Satara Voter Registration Camp 2026: सातारकरांसाठी महत्त्वाची बातमी! १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबरला विशेष मतदार नोंदणी शिबिर
3

Satara Voter Registration Camp 2026: सातारकरांसाठी महत्त्वाची बातमी! १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबरला विशेष मतदार नोंदणी शिबिर

Jalgaon News : मुक्ताईनगर हादरलं! भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू; दुसरा गंभीर
4

Jalgaon News : मुक्ताईनगर हादरलं! भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू; दुसरा गंभीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.