एसटी बसचा भीषण अपघात (फोटो- सोशल मिडिया)
MSRTC Bus Accident: अहिल्यानगर-मनमाड मार्गावर एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. एसटी बस आणि कंटेनरचा अपघात अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे झाला आहे. कोपरगाव येथे एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. राज्य परिवहन मंडळाची बस शिर्डी येथून छत्रपती संभाजीनगरकडे जात होती. त्या दरम्यान कोपरगाव येथे कंटेनर आणि एसटीचा अपघात झाला आहे.
एसटी बस कंटेनरमध्ये झालेली धडक ही अत्यंत भीषण असल्याचे समजते आहे. लालपरीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक प्रवासी जखमी झाल्याचे समोर आले आहे. सर्व जखमी लोकांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या आपघतामध्ये एसटी बसचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.
एसटी बस आणि कंटेनरचा अपघात झाल्यानंतर लगेचच स्थानिक लोकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. तसेच जखमी लोकांना मदत करण्यास सुरुवात केली. अपघाताची घटना कळताच रुग्णवाहिका देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. कंटेनर आणि एसटी बसच्या धडकेत चालकाची बाजू पूर्णपणे चक्काचूर झाली. पोलिस हा अपघत कशामुळे घडला याकहा तपास करत आहेत.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन बसचा भीषण अपघात
पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस आणि वरवंडच्या शिवेवर असलेल्या निसर्ग हॉटेल जवळ दोन एसटी बसची जोरदार धडक होऊन भीषण अपघाताची घटना घडली. अपघातामध्ये एक महिला व एक जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तर दोन्ही बसमधील ४० ते ४५ प्रवासी जखमी झाले आहेत. ही माहिती पाटस पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांनी दिली. सुवर्णा संतोष होले (वय ३८, राहणार बिरोबावाडी ता दौंड जिल्हा पुणे ) व नामदेव आढाव ( वय ७०, राहणार काष्टी, तालुका श्रीगोंदा जिल्हा नगर ) दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माहिती पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर राज्य परिवहन विभागाची जामखेड ते स्वारगेट एसटी बस ही पुणे दिशेला जात असताना एक मोटर सायकल आडवी आल्याने एसटी बस वाहन चालकाने मोटर सायकल चालकाला वाचवण्यासाठी वाहन बाजूला घेत असताना वाहनावरील ताबा सुटल्याने एसटी बस दुभाजक तोडून विरुद्ध दिशेला गेली आणि समोरील येणाऱ्या पुणे वरून तुळजापूर ला जाणाऱ्या दुसऱ्या एसटी बसला जाऊन धडकली. हा अपघात दुपारी एक ते दीड वाजण्याच्या आसपास पाटस आणि वरवंड शिवेवर जवळ कवठीचा मळा हॉटेल निसर्ग समोर घडला.
हेही वाचा: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन बसचा भीषण अपघात; २ जणांचा मृत्यू, ४५ जखमी
कात्रज घाटात भीषण अपघात
पुण्यात अपघाताचे सत्र सुरुचं असून, पुण्यातील वेगवेगळ्या भागात दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कात्रज घाट परिसरात भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी तरुण जखमी झाला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. विक्रम विठ्ठल मोरे (वय ४८, रा. सुमती बालवन शाळेजवळ, गुजरवाडी, कात्रज) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.