एखादी ट्रेन किंवा कोणतीही गाडी... बोगद्याच्या एका बाजूने शिरत असेल, तर दुसऱ्या बाजूने बाहेर तर निघणारच. पण ती बाहेर आलीच नाही तर? समजा ती बाहेर आली नाही पण बोगद्यात शोध घेतल्यास ती सापडलीच नाही तर...? असंच काहीतरी घडलं इटलीमध्ये! 1911 साली, झेनेटी नावाच्या एका कंपनीने ट्रेन तयार केली होती. त्या ट्रेनची अगदी पहिलीच राईड होती. या ट्रेनमध्ये तेव्हा जवळजवळ 106 प्रवाशी प्रवास करत होते.
बोगदाच्या एका बाजूने आज शिरली बाहेर कधीच आली नाही.
ट्रेन रोमहुन मिलानकडे जात होती. ट्रेनमध्ये सगळं काही सुरळीत होतं. डोंगरदर्यातून तसेच रानावनातून वाट काढत ट्रेन सुसाट वेगाने पुढे जात होती.
पण त्या ट्रेनमधल्या प्रवाशांना काय ठाऊक? की येत्या क्षणी होत्याचं नव्हतं होणार होतं. ट्रेन एका बोगद्यात शिरते अन् बोगद्याच्या दुसऱ्या बाजूने कधीच बाहेर येत नाही. ऐकायला विचित्र वाटणारा हा प्रसंग खरोखर इटलीमध्ये 1911 सारी घडलेला आहे. अनेक शोधा शोध होते, परंतु ती ट्रेन कुठेच सापडत नाही.
ट्रेन बोगद्यात शिरण्याचा अगोदर दोन प्रवाशांनी ट्रेनमधून बाहेर उडी टाकलेली असते. त्यातील एका प्रवाशाचे असे म्हणणे आहे की बोगद्यात एक तेजस्वी प्रकाश होता. त्या प्रकाशामध्ये ट्रेन गेली आणि त्यातच सामावून गेली, बाहेर कधी आलीच नाही.
पुढे काही वर्षांत मेक्सिकोमध्ये अनेक मनोरुग्ण आढळून आले. जरी त्यांना समाज मनोरुग्ण म्हणत असला तरी ते त्यांचा संबंध या ट्रेनशी जोडतात. ते का जोडतात? याचा काहीच पुरावा नाही.
तेथील काही स्थानिक लोकं त्या ट्रेनला टाईम ट्रॅव्हल झाल्याचे सांगतात तर काही भूतांच्या कथेशी संलग्न सांगतात, तर काही लोकांनी या ट्रेनला पुन्हा बघितले असण्याचा दावा केला आहे. आजही ही कथा इटलीसह जगभरात चर्चेचा विषय ठरते.