Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BMC News: मुंबई महानगरपालिकेतील बदली प्रक्रियेवर गंभीर आरोप; वशिलेबाजी, नियमभंग आणि गैरव्यवहारामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Brihanmumbai Municipal Corporation मधील बदली प्रक्रियेवर वशिलेबाजी, नियमभंग आणि गैरव्यवहाराचे गंभीर आरोप झाले आहेत. या प्रकरणामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 20, 2026 | 03:42 PM
मुंबई महानगरपालिकेतील बदली प्रक्रियेवर गंभीर आरोप; वशिलेबाजी, नियमभंग आणि गैरव्यवहारामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह

मुंबई महानगरपालिकेतील बदली प्रक्रियेवर गंभीर आरोप; वशिलेबाजी, नियमभंग आणि गैरव्यवहारामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Follow Us
Follow Us:
  • मुंबई महानगरपालिकेतील बदली प्रक्रियेवर गंभीर आरोप
  • वशिलेबाजी, नियमभंग आणि गैरव्यवहारामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह
  • दोन प्रमुख विभागांमार्फत होणाऱ्या बदल्यांमध्ये वशिलेबाजी आणि संभाव्य
.मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) बदली प्रक्रियेबाबत गंभीर आरोप समोर येत असून, दोन प्रमुख विभागांमार्फत होणाऱ्या बदल्यांमध्ये वशिलेबाजी आणि संभाव्य आर्थिक गैरव्यवहार होत असल्याची चर्चा प्रशासनात रंगली आहे. यामुळे महानगरपालिके च्या पारदर्शकतेवर आणि कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महानगरपालिकेमध्ये बदली प्रक्रिया प्रामुख्याने दोन विभागांमार्फत राबवली जाते. पहिला म्हणजे सामान्य प्रशासन विभाग (General Administration Department), ज्यामार्फत प्रशासकीय संवर्ग यांच्या बदल्या केल्या जातात. तर दुसरा म्हणजे नगर अभियंता कार्यालय, ज्यामार्फत त्यांच्या अखत्यारीतील विविध विभागांमधील अभियंता संवर्ग तसेच प्रशासकीय संवर्गाच्या बदल्या केल्या जातात.

मुंबईचा पाणीसाठा ३२ टक्क्यांवर! मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार, ऑगस्टपर्यंत पाणी पुरवण्याचे आदेश

मात्र, या दोन्ही विभागांमधून होणाऱ्या बदल्यांच्या प्रक्रियेमुळेच वशिलेबाजी आणि आर्थिक गैरव्यवहारांना खतपाणी मिळत असल्याचे आरोप पुढे येत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, काही कर्मचारी आपल्या संपूर्ण सेवा कालावधीत सामान्य प्रशासन विभाग किंवा नगर अभियंता कार्यालयातच कार्यरत राहतात. नियमांनुसार ठराविक कालावधीनंतर बदली अपेक्षित असतानाही, अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्या केवळ विकास नियोजन, मालमत्ता यांसारख्या मुख्यालयापुरत्याच मर्यादित राहतात.

विशेष म्हणजे, काही कर्मचाऱ्यांची पदोन्नती लिपिकापासून मुख्य लिपिक आणि पुढे प्रशासकीय अधिकारी पदापर्यंत झाली असली, तरी त्यांची संपूर्ण सेवा ही मुख्यालयातच पार पडल्याचे दिसून येते. यामुळे इतर विभागांमध्ये अनुभवी कर्मचाऱ्यांचा तुटवडा निर्माण झाला असून, कामकाजावर त्याचा प्रतिकूल परिणाम होत आहे.

दरम्यान, योगेश वीर या लिपिक पदावरील कर्मचाऱ्याच्या बदली प्रकरणामुळे हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ते अकरा वर्षे नगर अभियंता विभागात कार्यरत होते. नियमानुसार तीन वर्षांनी बदली अपेक्षित असतानाही त्यांनी दीर्घकाळ एकाच म्हणजे नगर अभियंता विभागात सेवा बजावली. अलीकडेच त्यांची घनकचरा व्यवस्थापन विभागात बदली करण्यात आली होती, मात्र त्यांनी नव्या विभागात रुजू न होता पुन्हा नगर अभियंता कार्यालयातच कार्यरत राहिल्याचे समोर आले आहे.

नियमानुसार, बदली आदेशानंतर तीन दिवसांच्या आत नवीन विभागात रुजू न झाल्यास संबंधित कर्मचाऱ्याचा पगार थांबविणे अपेक्षित असते. मात्र, या प्रकरणात तसे झाले नसल्याने नगर अभियंत्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. शिवाय, संबंधित कर्मचारी बायोमेट्रिक उपस्थिती नोंदवत नगर अभियंता कार्यालयातच हजर राहिल्याची माहितीही पुढे आली आहे.

तसेच, घनकचरा व्यवस्थापन विभागात सफाई कामगारांच्या सेवा नोंदी, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या आणि रजा पडताळणी यांसारख्या महत्त्वाच्या बाबी हाताळल्या जातात. अशा विभागात बदली आदेश रद्द होणे किंवा कर्मचारी रुजू न होणे यामुळे कामकाजात अडथळे निर्माण होऊन सफाई कामगारांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

योगेश वीर यांची बदली ही एक आठवड्याच्या कालावधीनंतर त्वरित घनकचरा व्यवस्थापन विभागातील बदली बदलून पुन्हा मुख्यालयातीलच सहाय्यक आयुक्त मालमत्ता विभागात करण्यात आल्याचे समजते. सहाय्यक आयुक्त मालमत्ता हा विभाग याआधीच मालमत्ता प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहाराबाबत केंद्र बनल्याचे बोलले जाते. योगेश वीर हे महानगरपालिकेचे जावई असल्यासारखे म्हणजे पुन्हा आता मालमत्तेच्या संभाव्य आर्थिक गैरव्यवहार, नियमभंग यांसारख्या प्रकरणांमध्ये बजावण्याची शक्यता नाकारता येत नाही असे म्हटले जाते.

मुळात एक आठवड्यापूर्वी योगेश वीर यांचे निघालेले घनकचरा व्यवस्थापन मधील बदलीचे आदेश हे नगर अभियंता यांमार्फत बदलून मालमत्ता विभागात होऊच कसे शकतात. या सर्व घडामोडींमुळे सामान्य प्रशासन विभाग आणि नगर अभियंता कार्यालय हे बदल्यांमधील गैरप्रकारांचे केंद्र बनल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच बदली प्रक्रिया पारदर्शक आणि नियमबद्ध करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कर्मचारी आणि नागरिकांकडून केली जात आहे.

दरम्यान, या संदर्भात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. तरी या संपूर्ण प्रकरणाकडे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नवनियुक्त महानगरपालिका आयुक्त तसेच श्रीमती अश्विनी भिडे आणि अतिरिक्त आयुक्त (शहर) श्रीमती अश्विनी जोशी कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. प्रशासन या प्रकरणात ठोस पावले उचलणार का, याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना दुहेरी धक्का! लोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वे ठप्प; पनवेल स्थानकातील लिफ्ट कोसळली…

Web Title: Bmc transfer process allegations irregularities mumbai news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • BMC
  • maharashtra
  • Mumbai

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात
1

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
3

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’
4

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.