आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना दुहेरी धक्का! लोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वे ठप्प; पनवेल स्थानकातील लिफ्ट कोसळली...
Solapur News : कोणी पाणी देतं का पाणी ; 872 कोटी रुपये खर्च करुनही नागरिकांची पाण्यासाठी वणवण
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीहून कल्याणच्या दिशेने जाणारी एक डाऊन स्लो लोकल रुळावरून घसरल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. डबा रुळावरून घसरल्याने डाऊन स्लो मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असल्याची माहिती मिळत आहे. आज आठवड्याचा पहिला दिवस आहे. कामावर जाणाऱ्या प्रवाशांची लगबग सुरु आहे. अशाच परिस्थितीत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. (फोटो सौजन्य – X)
दुसरी घटना म्हणजे, नवी मुंबईतील पनवेल रेल्वे स्थानकातील प्रवाशांना ने-आण करणारी लिफ्ट अचानक खाली कोसळली आहे. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या लिफ्टमध्ये 4 प्रवासी अडकले होते. अचानक लिफ्ट खाली कोसळल्याने प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास डोंबिवली रेल्वे स्थनकाजवळ मोठी दिर्घटना घडली. या घटनेमुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आज सकाळी डोंबिवली रेल्वे स्थनकाजवळ कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकलचे ३ डबे रुळावरून घसरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही लोकल कळवा कारशेडमधून अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात होती. या घटनेत कोणतीही जिवीत नाही घडली नाही. तरी देखील याचा परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतूकीवर झाला आहे. या घटनेनंतर मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी झाली आहे.
सध्या रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम सुरू आहे, लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येईल, अशी शक्यता आहे. या घटनेनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेसेवेवर परिणाम झाला आहे. याचा परिणाम प्रवाशांवर होत आहे.
पनवेल रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वरील लिफ्ट अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे सर्वत्र गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. या लिफ्टमध्ये अडकलेल्या चार प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे आणि या घटनेक कोणतीही जिवीतहानी झाली नाही.






