Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Local: मध्य रेल्वेच्या १० स्थानकांवर सुरू होणार ‘आपत्कालीन वैद्यकीय कक्ष’; खासदार संजय दिना पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई लोकल प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मध्य रेल्वेच्या १० स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार आहेत. खा. संजय दिना पाटील यांच्या मागणीनंतर रेल्वेमंत्र्यांनी हा निर्णय घेतला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 18, 2026 | 05:25 PM
मध्य रेल्वेच्या १० स्थानकांवर सुरू होणार 'आपत्कालीन वैद्यकीय कक्ष' (Photo Credit- X)

मध्य रेल्वेच्या १० स्थानकांवर सुरू होणार 'आपत्कालीन वैद्यकीय कक्ष' (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी दिलासादायक!
  • मध्य रेल्वेच्या १० स्थानकांवर सुरू होणार ‘आपत्कालीन वैद्यकीय कक्ष’
  • खासदार संजय दिना पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
नीता परब/मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क: मुंबई उपनगरी रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ईशान्य मुंबईचे खासदार व केंद्रीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य संजय दिना पाटील यांच्या मागण्यांची गंभीर दखल घेतली आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर मध्य रेल्वेच्या दहा महत्त्वाच्या स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईच्या उपनगरी रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा, खोपोली आणि कर्जत या मार्गांवर सुमारे ९० रेल्वे स्थानके आहेत. मात्र, यापैकी केवळ चार स्थानकांवरच वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्यामुळे अपघातग्रस्त प्रवाशांना वेळेवर उपचार मिळत नसल्याची गंभीर बाब समोर आली होती. अनेकदा जखमी प्रवाशांना रुग्णालयात नेण्यापूर्वीच उपचाराअभावी जीव गमवावा लागत असल्याने या प्रश्नावर खा. संजय दिना पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यासंदर्भात त्यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्र पाठवून प्रशासनाच्या निष्क्रियतेवर बोट ठेवले होते.

तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी झालेल्या बैठकीत प्रत्येक स्थानकावर किमान प्राथमिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी ठामपणे मांडली होती. ‘गोल्डन अवर’मध्ये जखमींना तात्काळ उपचार मिळणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. त्यांनी मांडलेल्या मागण्यांमध्ये प्रत्येक स्थानकावर ऑक्सिजन, स्ट्रेचर, आवश्यक औषधे, बेसिक लाईफ सपोर्ट सुविधा उपलब्ध करणे, प्राथमिक उपचार पेट्या ठेवणे, तसेच स्टेशन मास्टर, टीसी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण देणे यांचा समावेश आहे.

Mumbai Local: लटकून प्रवास करण्याचे दिवस संपणार? मुंबईकरांसाठी बंद दरवाजांची सुरक्षित लोकल दाखल; पाहा काय आहे खास वैशिष्ट्य

पूर्वी मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर यांसारख्या स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष कार्यरत होते. मात्र गेल्या वर्षभरात या सुविधा बंद झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. याच पार्श्वभूमीवर खा. पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करत हा मुद्दा केंद्र सरकारसमोर मांडला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून आता कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस, चेंबूर, मानखुर्द, घाटकोपर, ठाणे, मुंब्रा, टिटवाळा आणि कर्जत या स्थानकांवर टप्प्याटप्प्याने आपत्कालीन वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या निर्णयामुळे दररोज लाखो प्रवाशांची ‘जीवनवाहिनी’ असलेल्या मुंबई उपनगरी रेल्वेमध्ये प्रवास अधिक सुरक्षित होणार असून अपघातग्रस्तांना तात्काळ उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करत खा. संजय दिना पाटील यांनी सांगितले की, ही केवळ सुरुवात असून पुढील काळात सर्व रेल्वे स्थानकांवर अशा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्न सुरू ठेवणार आहे. तसेच प्रत्येक स्थानकाबाहेर रुग्णवाहिका सेवा उपलब्ध व्हावी यासाठीही पाठपुरावा केला जाईल. दरम्यान, प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात असून, रेल्वे प्रशासनावर टीका करणाऱ्या मुद्द्यांनंतर आता सकारात्मक पाऊल उचलले गेले असल्याचे स्पष्ट होत आहे.

Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास होणार सुरक्षित! देशातील पहिली ‘नॉन-एसी’ बंद दरवाज्यांची लोकल दाखल; कधीपासून सुरू होणार प्रवास?

Web Title: Central railway to start emergency medical rooms at 10 stations sanjay dina patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 05:22 PM

Topics:  

  • ashwini vaishnaw
  • Mumbai Local
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai News: खाजगी रुग्णालय बिलांना लगाम कधी? ‘जनआरोग्य अभियाना’चा सवाल, उपचारांचे प्रमाणित दर निश्चित करण्याची मागणी
1

Mumbai News: खाजगी रुग्णालय बिलांना लगाम कधी? ‘जनआरोग्य अभियाना’चा सवाल, उपचारांचे प्रमाणित दर निश्चित करण्याची मागणी

Maharashtra Breaking News Today 2026:  राज्यासह देशभरात शिक्षक दिन आणि गोकुळाष्टमीचा उत्साह
2

Maharashtra Breaking News Today 2026: राज्यासह देशभरात शिक्षक दिन आणि गोकुळाष्टमीचा उत्साह

NCPA कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; दरमहा ₹7,250 वेतनवाढ, ₹50 हजार वार्षिक बोनस, रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महत्वपूर्ण करार
3

NCPA कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; दरमहा ₹7,250 वेतनवाढ, ₹50 हजार वार्षिक बोनस, रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महत्वपूर्ण करार

BMC कडून मुलुंडमध्ये ‘Pedestrian First’ मोहिमेअंतर्गत अतिक्रमणाविरोधात कारवाई…
4

BMC कडून मुलुंडमध्ये ‘Pedestrian First’ मोहिमेअंतर्गत अतिक्रमणाविरोधात कारवाई…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.