फोटो सौजन्य- सोशल मीडिया
धारावीचा पुनर्विकास जो केवळ कागदावर होता तो आपल्या सरकारने करुन दाखवला. पुढच्या पाच सात वर्षाने धारावीचा माणूस पक्क्या सुंदर घरात बसलेला पाहायला मिळेल.18 निर्णय घेतले आणि मुंबईकरांना स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून 1600 प्रोजेक्ट आता प्रस्तावित आहेत. पुढच्या काळात 100 स्क्वेअर फुटच्या घरात राहणाऱ्यांना 500 स्क्वेअर फुटचे घर पुनर्विकासाच्या माध्यमातून दिले जाणार आहे असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
शिवाजी पार्क येथे झालेल्या महायुतीच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या विकासावर भाष्य केले ते म्हणाले, मोदींजींच्या नेतृत्वात महायुती 1 आणि महायुती 2 या दोन्ही सरकारांनी मुबंईचा चेहरा बदलवून दाखवला कारण त्यांचा आशीर्वाद होता. मुबंईकरांचा सर्वात मोठा प्रश्न मुबंईकराचे 60 टक्के जीवन हे प्रवासात जाते त्यांचा प्रवास सुकर झाला पाहिजे म्हणून मोदीजींच्या नेतृत्वात मुंबईच्या रेल्वेचा चेहरा बदलला. त्याठिकाणी प्लॅटफॉर्मचे नुतनीकरण, एस्केलेटर, लिफ्ट आदी वेगवेगळ्या सुविधा दिल्या गेल्या. त्यासोबत जुन्या सरकारने 15 वर्षात 11 किमी मेट्रो केली. आपल्या सरकारने 5 वर्षात 350 किमी मेट्रोचे नेटवर्क सुरु केल.
ते पुढे म्हणाले, आपल्या सरकारने कोस्टल रोड तयार केला. संपुर्ण वेस्ट कोस्ट हा तयार होत आहे. 40 मिनिटांत नरिमन पोइंट ते विरार जाता येईल अशाप्रकारे व्यवस्था केली जात आहे. विरार अलिबाग कॉरिडोअरही तयार होत आहे. अटल सेतूमुळे मुंबई आणि नवी मुबंई जोडली गेली. मुबंई आणि एमएमआर परिसरात लोकांकरिता प्रवास सुकर व्हावा ही व्यवस्था मोदीजींनी केली.
पुढच्या पाच सात वर्षाने धारावीचा माणूस पक्क्या सुंदर घरात बसलेला पाहायला मिळेल
वर्षानुवर्षे माझा मुंबईचा मराठी माणूस या घराकरिंता तडफत होता मोदींच्या नेतृत्वामध्ये बीडीडी चाळीचा पुनर्विकास असो, अभ्युदय नगर सारखी योजना असो, विशाल सह्याद्रीसारखी योजना असो अशाप्रकारच्या वस्त्या ज्यांचा पुनर्विकास बाकी होता, केवळ कागदावर होते तो पुनर्विकास आपल्या सरकारने करुन दाखवले अशा 100 योजना मी सांगू शकतो. धारावीचा पुनर्विकास जो केवळ कागदावर होता तो आपल्या सरकारने करुन दाखवला. पुढच्या पाच सात वर्षाने धारावीचा माणूस पक्क्या सुंदर घरात बसलेला पाहायला मिळेल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उलेमांच्या मागणीवरुन महाविकास आघाडीवर घणाघात
देवेंद्र फडणवीस यांनी उलेमांच्या मागणीवरुन बोलताना म्हटले की, केलेल्या कामावर आम्ही मतदान मागतो आहोत. काही लोक केवळ लांगुलचालनावर मतदान घेत आहेत. माझा सवाल उद्धव ठाकरेंना आहे, शरद पवारांना आहे. उलेमानच्या 17 मागण्या मान्य करताना तुम्ही त्या वाचल्या होत्या का ? त्यातली एक मागणी जी महाविकास आघाडीने मान्य केली ती मागणी अशी आहे की, 2012 ते 2024 मध्ये महाराष्ट्रात दंगली घडल्या त्या दंगलीत जेवढे मुस्लमान आरोपी आहेत. त्या सर्व आरोपींना एका झटक्या सोडून द्या ही मागणी उलेमांनी केली, महाविकास आघाडी ही मागणी मान्य केली.हे जर व्होट जिहाद करणार असतील तर मतांचे धर्मयुद्ध करण्याची वेळ आमच्यावर आली आहे.
फडणवीस यांनी या भाषणात डॉमनिक या देशाने मोदीजींनी कोरोना काळात केलेल्या कामाकरिता त्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार दिला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.