निरोगी चिमुकलीला कुष्ठरोगी ठरवले, चुकीच्या औषधांमुळे गमवावा लागला जीव; काय आहे नेमकं प्रकरण?
कर्जत/ संतोष पेरणे: पेण तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या तांबडी गावाला कोणतीही ओळख नाही.मात्र त्याच तांबडी गावामध्ये एका लहानगीला कुष्ठरोगी ठरवले आणि त्यांनतर हेच तांबडी गाव प्रकाशात आले आहे.आजूबाबाजूला दगडखाणी असलेल्या तांबडी आदिवासी वाडीमध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या गाड्यांची वर्दळ वाढली आहे. मात्र असे असताना देखील आपल्या मुलीला गमावलेल्या खुशबूच्या पालकांना तिला झालेल्या आजाराबद्दल आणि तिच्या आजारावर करण्यात आलेल्या उपचाराची कोणतीही माहिती देण्यात येत नाही.मात्र खुशबूमुळे प्रकाशात आलेले तांबडी बद्दल सरकारी अनास्था कायम आहे.तर संपूर्ण तांबडी गाव आज ठाकरे कुटुंबाच्या पाठीशी उभे राहिल्याचे चित्र आहे.
पेण तालुक्यामध्ये असलेल्या वरवणे येथील शासकीय आश्रमशाळा कुष्ठरोगी ठरवलेले खुशबू नामदेव ठाकरे हिला कुष्ठरोग झाल्याचे निदान करून आरोग्य विभागाने केले.त्यानंतर पनवेल येथील रुग्णालयात दाखल केल्यावर त्याच कुष्ट रोगाच्या गोळ्या तत्काळ बंद करण्यात आल्या.त्यामुळे पूर्ण तपासणी न करता आणि चुकीची औषधे दिल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे.संबंधित एमजीएम हॉस्पिटल यांनी मृत्यू मुलीच्या कुटुंबीयांना अध्याप कोणतेही मेडिकल रिपोर्ट देण्यात आलेले नाही या धक्कादायक प्रकार पेण तालुक्यातील तांबडी गावामध्ये घडला आहे. एकीकडे आपला देश 75 वा अमृत महोत्सव साजरा करत असताना आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे एका निराअपराध चिमुरडीचा मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे. यावर नवनिर्वाचित आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर या प्रकरणाची चौकशी करणार का..?असा प्रश्न देखील येथे उपस्थित होत आहे.
प्रकरणाची पाठराखण करण्यासाठी प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांचा अजब कारभार समोर आला असून चक्क खुशबू चे वडील नामदेव ठाकरे यांना पैशाची आमिष दाखवत खुशबूच्या मृत्यूची किंमत मोजत असल्याचे प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांचा अजब कारभार समोर येत आहे. या प्रकरणा संदर्भात अद्याप कोणत्याही अधिकाऱ्यावर कारवाई किंवा चौकशी करण्यात आली नाही. त्यामुळे सदर बाब अत्यंत खेदाची व निंदनीय आहे. ग्रामीण भागातील तसेच पीडित कुटुंब आदिवासी असल्याने अधिकारी त्यांच्या पदाचा गैरवापर करून संबंधित कुटुंबीयांना अंधारात ठेवून आपली खुर्ची वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.वरवणे येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेमध्ये इयत्ता चौथी मध्ये शिकत असलेली खुशबू ह्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे,त्यामुळे अख्खे तांबडी गाव दूर्दैवी ठाकरे कुटुंबाच्या पाठीशी उभे राहिले आहे.