मुंबई : कुर्ला येथे शॉपिंग सेंटरच्या (Shopping Center Balcony Collapsed) छताचा छज्जा कोसळून एका ५ वर्षाच्या बालका (5 Year Child Died)चा मृत्यू झाला आहे. या घटनेत तीन जण गंभीर जखमी (Injured) झाल्याचीही माहिती मिळाली आहे. जखमींवर घाटकोपर (Ghatkopar) येथील राजावाडी रुग्णालयात (Rajawadi Hospital) उपचार सुरु आहेत. याप्रकरणी विनोबा भावे पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. कुर्ला (Kurla) पश्चिमेतील राम मनोहर लोहीया मार्ग येथे दुपारी २.४० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अग्नीशमन दल आणि पोलिसांकडून बचाव कार्य सुरु आहे.
[read_also content=”वाढत्या महागाईत आणखी एक झटका, अमूल दुधाच्या दरात झाली इतक्या रुपयांची वाढ https://www.navarashtra.com/india/amul-increases-milk-prices-by-2-rupees-from-1st-march-2022-nrsr-246847.html”]
मिळालेल्या माहितीनुसार ही इमारत म्हाडाची असून, शॉपिग सेंटरच्या पहिल्या माळ्याच्या छज्जाचा भाग तळमजल्यावर असलेल्या उपहार गृहावर पडला. यात तीन जण जखमी झाले. एकाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. अफान खान (५) असे मृत बालकाचे नाव आहे. तर रफीक शेख (४६), इरफान खान (३३), मोहम्मद जिकरान (६) अशी जखमींची नावे आहेत. यापैकी रफीक शेख आणि इरफान खान यांच्यावर राजावाडी रुग्णालयात तर मोहम्मद जिकरान याच्यावर कुर्ल्यातील भाभा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.