Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kokan Farmers Protest Mumbai : काजू-आंबा उत्पादकांचे मुंबईत आंदोलन; राजू शेट्टींसह नेते पोलिसांच्या ताब्यात

कोकणातील काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मुंबईत आंदोलन छेडले असताना पोलिसांनी राजू शेट्टी, हर्षवर्धन सपकाळ, जयंत पाटील आणि विनायक राऊत यांच्यासह अनेक नेत्यांना ताब्यात घेतले.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 15, 2026 | 04:31 PM
काजू-आंबा उत्पादकांचे मुंबईत आंदोलन; राजू शेट्टींसह नेते पोलिसांच्या ताब्यात

काजू-आंबा उत्पादकांचे मुंबईत आंदोलन; राजू शेट्टींसह नेते पोलिसांच्या ताब्यात

Follow Us
Follow Us:
  • काजू-आंबा उत्पादकांचे मुंबईत आंदोलन
  • राजू शेट्टींसह नेते पोलिसांच्या ताब्यात
  • सरकारने जाहीर केलेली 22 हजार रुपयांची मदत अपुरी
Kokan Farmers Protest Mumbai News Marathi : आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, त्यांना चांगला बाजारभाव मिळावा, यासाठी मुंबईत माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री महादेव जानकर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, त्यापूर्वीच या सर्वांची पोलिसांनी धरपकड केली आहे.

दरम्यान, विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या कोकणातील काजू आणि आंबा उत्पादकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्यांमध्ये शेतकरी नेते राजू शेट्टी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शेकपचे जयंत पाटील, शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत आणि इतर अनेक नेत्यांचा समावेश आहे. या कारवाईनंतर, आंदोलन करणारे शेतकरी अधिकच आक्रमक झाले.

Mumbai News : भाभा रुग्णालयात प्रसूतीनंतर महिलेचा वेदनेतून मृत्यू; डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्याचा नातेवाईकांचा आरोप

कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी मोठे नुकसान झाले आहे. असे असूनही सरकारने केवळ २२,००० रुपयांची मदत जाहीर केली. याच्या निषेधार्थ, काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी मुंबईत आंदोलन केले. गिरगाव चौपाटीपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी, ‘वर्षा’ बंगल्यापर्यंत मोर्चा काढण्याची त्यांची योजना होती. आंदोलकांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपल्या विविध मागण्या मांडण्याचा मानस होता. मात्र, हे घडण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, “आम्ही दुपारी ४ वाजता गिरगाव चौपाटीवर जमलो होतो. तेव्हा पोलीस अचानक आले आणि त्यांनी आम्हाला ताब्यात घेतले. आम्ही कोणताही गुन्हा केला नव्हता. आम्ही फक्त आंदोलन करण्याचा प्रयत्न करत होतो. आम्ही आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत आम्हाला ताब्यात घेण्याचा पोलिसांना कोणताही अधिकार नव्हता. पण पोलिसांनी आम्हाला ढकलाढकली करत जबरदस्तीने ताब्यात घेतले . आम्हाला कायदा शिकवण्याची गरज नाही. आम्ही बनवलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करणे हे पोलिसांचे काम आहे, पण ते नेमक्या त्याच गोष्टीच्या विरोधात काम करत असल्याचे दिसते.”

राजू शेट्टी पुढे म्हणाले, “कोकणातील शेतकरी गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. मुख्यमंत्री विविध कामांसाठी तीन-चार वेळा कोकणात आले, पण त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष दिले नाही किंवा त्यांचे निवेदन स्वीकारले नाही. गेल्या ५० वर्षांत पहिल्यांदाच कोकणातील शेतकरी मुंबईत आले, पण पोलिसांनी त्यांची व्यथा समजून घेण्याऐवजी त्यांना ताब्यात घेतले.”

Maharashtra Cabinet Decisions: वैद्यकीय संस्थांच्या इमारतींसाठी ५०% सवलत; ‘सिंधुरत्न’ योजनेला मुदतवाढ, नाशिकसाठी कोट्यवधींचा निधी

Web Title: Konkan cashew mango farmers protest leaders detained mumbai news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 04:31 PM

Topics:  

  • Harshvardhan Sapkal
  • Raju Shetti

संबंधित बातम्या

Raju Shetti Threatens Kata Bandh Satara: ऊस दराचा तिढा सुटेपर्यंत ‘काटा बंद’! ; राजू शेट्टींचा साखर कारखानदारांना थेट इशारा
1

Raju Shetti Threatens Kata Bandh Satara: ऊस दराचा तिढा सुटेपर्यंत ‘काटा बंद’! ; राजू शेट्टींचा साखर कारखानदारांना थेट इशारा

अटक केलेल्या विद्यार्थ्यांना तत्काळ सोडा, अन्यथा वर्षा बंगल्याला…; हर्षवर्धन सपकाळांचा सरकारला इशारा
2

अटक केलेल्या विद्यार्थ्यांना तत्काळ सोडा, अन्यथा वर्षा बंगल्याला…; हर्षवर्धन सपकाळांचा सरकारला इशारा

Congress on Caste Census : जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पुन्हा तापला, ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसचा भाजपाविरोधात एल्गार
3

Congress on Caste Census : जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पुन्हा तापला, ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसचा भाजपाविरोधात एल्गार

तरुणाईंच्या मुळ प्रश्नांना भाजपने उत्तर द्यावे, कितीही गुन्हे दाखल केले तरीही…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा
4

तरुणाईंच्या मुळ प्रश्नांना भाजपने उत्तर द्यावे, कितीही गुन्हे दाखल केले तरीही…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.