लालबागच्या राजाच्या प्रसादाने उजळणार BMC हॉस्पिटल्स; काय आहे नेमकी योजना? जाणून घ्या संकल्पना
१० टन कचऱ्यावर केली जाणार प्रक्रिया
गणेशोत्सवाच्या उत्सवादरम्यान मंदिर आवारातून दररोज सुमारे ८ ते १० टन कचरा निर्माण होण्याची शक्यता आहे. हा ओला कचरा पारंपारिक विल्हेवाटीसाठी पाठवण्याऐवजी विशेष वाहनांमार्फत त्याला गोळा केले जाऊन मग बीएमसीच्या नायर रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय, जीटीबी रुग्णालय व सायन रुग्णालय येथील बायोमिथेनेशन प्रकल्पांमध्ये त्याला नेले जाणार आहे.
माहितीनुसार, या प्रकल्पाची प्रोसेस कॅपेसिटी २ मेट्रिक टन इतकी आहे. याअंतर्गत ११ दिवसांत ८० मेट्रिक टन सेंद्रिक कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार असून अंदाजे ७,७४४ युनिट्स उर्जा यातून तायर करण्याचे लक्ष्य आहे. तथापि, या प्रकल्पाला किती यश येणार हे आपल्याला येत्या काळात स्पष्ट होईल. कचऱ्यापासून तयार करण्यात आलेल्या या उर्जेचा वापर रुग्ण कक्ष, कॉरिडॉर आणि सार्वजनिक जागांवर दिवे लावण्यासाठी केला जाईल. या प्रकल्पाचे संचालन आणि देखभाल बीएमसीने नियुक्त केलेली एजन्सी, मे. एरोकेअर एव्हिएशन प्रा. लि. यांच्यामार्फत केला जाणार आहे.
शिवडीच्या राजाच्या अमृतमहोत्सवी वर्षात अनोखा देखावा; मुंबईत साकारली ‘पाण्याखालची द्वारका’
प्रसाद टू पाॅवर
मोठ्या सार्वजनिक गणेश उत्सवादरम्यान निर्माण होणाऱ्या सेंद्रिय कचऱ्याचा वापर चांगल्या आणि उपयुक्त कामासाठी कसा केला जाऊ शकते ते आपल्याला या प्रकल्पातून पाहता येते. ‘प्रसाद टू पॉवर’ द्वारे गणेश मंडपात तयार होणाऱ्या कचऱ्याचा उपयोग रुग्णालयातील संसाधने वापरण्यात केला जाणार आहे. श्रद्धेचा प्रसाद आणि पर्यावरण संवर्धनाची सांगड घालणारा हा उपक्रम भविष्यात कचरा व्यवस्थापनासाठी एक चांगला आदर्श ठरू शकतो.






