मराठी भाषा ही प्रमाण भाषा असून त्याच्या अनेक पोटभाषा आहेत. तुम्हाला नक्की किती पोटभाषा माहीत आहेत? याची संपूर्ण माहिती जाणून घ्या सोप्या शब्दात. कोणत्या भागात कोणती भाषा बोलली जाते?
मराठी भाषेच्या किती पोटभाषा (फोटो सौजन्य - Social Media)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
मराठी भाषेच्या किती पोटभाषा आहेत
कोणत्या भागात कोणती पोटभाषा
मराठी पोटभाषेविषयी तुम्हाला माहीत आहे का?
मराठी भाषेत भौगोलिक व सामाजिक फरकांमुळे अनेक पोटभाषा ज्याला आपण बोलीभाषा असं म्हणतो त्या विकसित झाल्या आहेत. मुख्य प्रमाण भाषेचे व्याकरण एकच असले, तरी दर १२ कोसांवर शब्दांचे उच्चार, शब्दसंग्रह आणि वाक्प्रचार बदलतातय. तुम्हाला माहीत आहे का? महाराष्ट्रात ४० ते ६० पेक्षा जास्त पोटभाषा बोलल्या जातात. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील साधारण प्रमुख मराठी पोटभाषानक्की कोणत्या आहेत आणि त्या कोणत्या भागात बोलल्या जातात आपण जाणून घेणार आहोत. तुम्हीही उत्सुक आहात ना? चला तर मग जराही विलंब न करता जाणून घेऊया.
अहिराणी भाषाः उत्तर महाराष्ट्रात अर्थात जळगाव, धुळे, नंदुरबार या ठिकाणांवर बोलली जाणारी ही एक अत्यंत लोकप्रिय बोलीभाषा आहे. अनेक कवी आणि कलाकार अहिराणी भाषेतून व्यक्त होताना दिसतात
पुणेरी: पुणे आणि आसपासच्या परिसरातील प्रमाण मराठीशी जवळीक साधणारी ही बोलीभाषा आहे. बऱ्यापैकी शुद्ध मराठी या परिसरांमध्ये बोलले जाते
वऱ्हाडी भाषा: विदर्भ भागात जो अमरावती, नागपूर, बुलढाणा, यवतमाळ इत्यादी प्रकर्षाने गणला जातो त्या भागात वऱ्हाडी भाषा मोठ्या प्रमाणावर बोलली जाते。यात ‘मला’ ऐवजी ‘मले’, ‘तुला’ ऐवजी ‘तुले’ असा उच्चार होतो
मालवणी भाषा: दक्षिण कोकणात साधारणतः सिंधुदुर्ग जिल्हा ज्यात मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी समाविष्ट आहे, तिथे बोलली जाणारी मालवणी ही गोड भाषा आहे。यात ‘माका’ म्हणजे मला, ‘तुका’ म्हणजे तुला असे शब्द वापरले जातात
मराठवाडी भाषा: मराठवाड्यात ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर इत्यादीचा समावेश आहे तिथे ही भाषा बोलली जाते, ज्यावर उर्दू आणि कानडी भाषेचा थोडा प्रभाव जाणवतो
कोल्हापुरी मराठी: पश्चिम महाराष्ट्रात अर्थात कोल्हापूर, सांगली या भागांमध्ये बोलली जाणारी, रांगड्या लहेजाची आणि खास वेगळ्या उच्चारशैलीची ही बोली आहे. अनेक मराठी मालिकांमधूनही ही भाषा आपल्या कानावर पडत असते
आगरी आणि कोळी बोलीभाषा: मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरातील आगरी आणि कोळी समाजाची ही मुख्य बोलीभाषा आहे
झाडीबोली: पूर्व विदर्भात जो भाग भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली हा आहे इथे ही भाषा बोलली जाते. या भागात घनदाट जंगले अर्थात झाडी असल्याने तिला ‘झाडीबोली’ म्हणतात
कोकणी / गोमंतकी: कोकण किनारपट्टी आणि गोव्यात बोलली जाणारी ही एक महत्त्वाची भाषा आहे. याला एक वेगळाच लहेजा असतो आणि हीदेखील मराठीची पोटभाषा आहे
याव्यक्तिरिक्त अनेक पोटभाषा आहेत, दरवर्षी अनेक पोटभाषा लुप्त होतात. ५० वर्षांत भारतातल्या २० टक्के भाषा लुप्त झाल्या असे अभ्यासात सांगण्यात येते. याशिवाय २०११ च्या जनगणनेनुसार भारतात २०००हून अधिक बोलीभाषा आहेत. तुम्हाला याबाबत माहीत होते का? आम्हाला नक्की कळवा.