Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kopar Khairane Slab Collapse: नवी मुंबईत मोठी दुर्घटना! कोपरखैरणेत ३० वर्षे जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला; २ वर्षांपूर्वीच…

नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे ३० वर्षे जुन्या 'अथर्व सोसायटी'च्या तिसऱ्या मजल्याचा स्लॅब कोसळला. २ वर्षांपूर्वीच पालिकेने नोटीस दिली होती. सुदैवाने जीवितहानी टळली असून रहिवाशांचे स्थलांतर केले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 15, 2026 | 07:38 PM
नवी मुंबईत मोठी दुर्घटना! कोपरखैरणेत ३० वर्षे जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला

नवी मुंबईत मोठी दुर्घटना! कोपरखैरणेत ३० वर्षे जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला

Follow Us
Follow Us:
  • कोपरखैरणेत ३० वर्षे जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला!
  • रहिवाशांचे तातडीने स्थलांतर
  • मोठी दुर्घटना टळली
सावन वैश्य | नवी मुंबई -: नवी मुंबईतील कोपरखैरणे (Kopar khairane) परिसरातून एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. येथील सेक्टर-१८ मधील ‘अथर्व सोसायटी’ या ३० वर्षांहून अधिक जुन्या इमारतीचा तिसऱ्या मजल्यावरील स्लॅब अचानक कोसळला. हा स्लॅब थेट दुसऱ्या मजल्यावरील घरात कोसळल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. सुदैवाने, या दुर्घटनेच्या वेळी दोन्ही फ्लॅटमध्ये कोणीही नसल्याने एक मोठा अनर्थ टळला असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या घटनेमुळे जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मोठ्या आवाजाने रहिवाशांमध्ये घबराट; ४ दिवसांपूर्वीच मिळाला होता इशारा

अथर्व सोसायटीतील ३०२ क्रमांकाच्या फ्लॅटचा स्लॅब अचानक कोसळल्याने मोठा आवाज झाला. या आवाजामुळे इमारतीमधील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आणि त्यांनी तात्काळ इमारतीबाहेर धाव घेतली. धक्कादायक बाब म्हणजे, अवघ्या चार दिवसांपूर्वीच याच इमारतीत स्लॅबचा काही भाग कोसळण्याची प्राथमिक घटना घडली होती. तरीही रहिवाशांकडून आणि व्यवस्थापनाकडून इमारतीचा वापर सुरूच ठेवण्यात आला होता, ज्यामुळे हा मोठा धोका निर्माण झाला.

नवी मुंबई महापालिकेच्या नोटीशीकडे दुर्लक्ष!

अथर्व सोसायटीची ही इमारत अत्यंत जुनी आणि जर्जर झाली आहे. दोन वर्षांपूर्वीच नवी मुंबई महानगरपालिकेने (NMMC) या सोसायटीला अधिकृत नोटीस बजावली होती. यामध्ये इमारतीचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, सोसायटीकडून वेळेत आवश्यक ती कार्यवाही आणि दुरुस्ती न झाल्यामुळे अखेर बुधवारी सायंकाळी ही मोठी दुर्घटना घडल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये सुरू आहे.

Moshi Building Collapse: पिंपरी-चिंचवडमधील मोशीत इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली १४ ते १५ जण अडकल्याची भीती

रहिवाशांचे तात्पुरते स्थलांतर; वीज आणि पाणीपुरवठा बंद

घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. सुरक्षेचा आणि खबरदारीचा उपाय म्हणून इमारतीमधील सर्व रहिवाशांचे तात्काळ अण्णासाहेब पाटील सभागृहात सुरक्षित स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच दुर्घटनाग्रस्त इमारतीचा वीज आणि पाणीपुरवठाही खंडित करण्यात आला असल्याची माहिती कोपरखैरणेचे विभाग अधिकारी भरत धांडे यांनी दिली आहे.

धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर!

अवघ्या चार दिवसांपूर्वीच कोपरखैरणे परिसरातील एका इमारतीमधील केक शॉपचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली होती. लागोपाठ घडलेल्या या दोन्ही दुर्घटनांमुळे नवी मुंबईतील विशेषतः कोपरखैरणे आणि वाशी परिसरातील जुन्या सिडको (CIDCO) व खाजगी इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा विषय ऐरणीवर आला आहे. पालिकेने अशा सर्व धोकादायक इमारतींवर कठोर पावले उचलावीत, अशी मागणी आता रहिवाशांकडून केली जात आहे.

वाशीतील दुर्घटनाग्रस्त ‘गीता अपार्टमेंट’ अखेर जमीनदोस्त; नमुंमपाची मोठी कारवाई, सुरक्षेसाठी वाशी-कोपरखैरणे मार्ग काही तास बंद

Web Title: Major accident in navi mumbai slab of a 30 year old building collapses in koparkhairane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 07:37 PM

Topics:  

  • Navi Mumbai
  • Navi Mumbai News
  • slab collapsed

संबंधित बातम्या

Navi Mumbai News : खाद्यपदार्थांच्या एक्सपायरी डेटमध्ये फेरफार; 75 लाखांचा माल जप्त, दोन आरोपींसह 11 कंपन्यांवर कारवाई
1

Navi Mumbai News : खाद्यपदार्थांच्या एक्सपायरी डेटमध्ये फेरफार; 75 लाखांचा माल जप्त, दोन आरोपींसह 11 कंपन्यांवर कारवाई

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार
2

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार

Navi Mumbai: तुर्भेतील घनकचरा प्रकल्पात विषारी वायूचा धोका? NMMCने आरोप फेटाळले, जाणून घ्या वस्तुस्थिती
3

Navi Mumbai: तुर्भेतील घनकचरा प्रकल्पात विषारी वायूचा धोका? NMMCने आरोप फेटाळले, जाणून घ्या वस्तुस्थिती

Navi Mumbai News: पुणे पॅटर्नचा धडा! नवी मुंबईत ‘दंडाची वसुली’ कधी होणार बंद? नागरिकांचा थेट सवाल
4

Navi Mumbai News: पुणे पॅटर्नचा धडा! नवी मुंबईत ‘दंडाची वसुली’ कधी होणार बंद? नागरिकांचा थेट सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.