Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: “रात्र वैऱ्याची आहे,तर…”; बाळा नांदगावकरांची मतदानाआधी भावनिक पोस्ट

राज्यातील मुंबई, पुणे महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. मुंबई, पुणे महापालिका जिंकण्यासाठी ठाकरे बंधू, भजप, राष्ट्रवादी कॉँग्रेसने जोरदार प्रचार केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 14, 2026 | 04:16 PM
Maharashtra Politics: “रात्र वैऱ्याची आहे,तर…”; बाळा नांदगावकरांची मतदानाआधी भावनिक पोस्ट
Follow Us
Follow Us:

महापालिका निवडणुकीआधी मनसे नेत्याची भावनिक पोस्ट 
उद्या 29 महानगरपालिकांसाठी होणार मतदान 
16 तारखेला होणार निकाल जाहीर

Bala Nandgaonkar: राज्यातील मुंबई, पुणे महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. मुंबई, पुणे महापालिका जिंकण्यासाठी ठाकरे बंधू, भजप, राष्ट्रवादी कॉँग्रेसने जोरदार प्रचार केला आहे. दरम्यान मुंबई महापालिका निवडणूक ही मराठी-अमराठी, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव, ते महायुती सरकारने केलेली विकासकामे यावर फिरताना दिसली. काल प्रचाराची अंतिम मुदत संपली आहे. त्यानंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी भावनिक पोस्ट केली आहे. त्याचा उदय काही मतदानावार परिणाम होणार का हे 16 तारखेलाच कळणार आहे.

काय म्हणाले मनसे नेते बाळा नांदगांवकर? 

रात्र वैऱ्याची आहे, आता तरी जागा हो.

उद्या होणाऱ्या महापालिका निवडणुकीत मतदान करताना फक्त 2 मिनिटे शांत चित्ताने विचार करा की ही निवडणूक किती महत्त्वाची आहे. यावेळी मराठी माणूस चुकला तर मग पुन्हा संधी नाही. ठाकरेंना जर सत्तेसाठी एकत्र यायचे असते तर ते कधीच आले असते. पण केवळ आपल्या माय मराठी साठी आपल्या महाराष्ट्र धर्मा साठी ही लढाई किती महत्त्वाची आहे हे जाणून ते नेक इराद्याने एक आले आहे.

समोरील विरोधक बलाढ्य, धनदांडगे, सत्ताधारी असले तरी आपण एकीने , ठाकरेंच्या बरोबरीने लढलो तर आपण त्यांना हरवू शकतो. माझ्या एका मताने काय होईल असा विचार न करता मी अजून किती जणांना सांगू शकतो ते बघा आणि सर्व ताकद आपल्या माणसांसाठी लावा. ही विनंती केवळ मुंबईतील नागरिकांना नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना आहे. रात्र वैऱ्याची आहे पण या अंधार रात्री नंतर जी आशेची किरण घेऊन येणारी सकाळ आहे ती सोनेरी आहे. मी महाराष्ट्रासाठी खारीचा वाटा उचलत आहे तुम्हीही पुढे या.

ठाकरे बंधूंना भाजप सोबत घेणार? फडणवीस स्पष्टच म्हणाले…

राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष असणार आहे. निकाल आला की हे महाराष्ट्र राज्य पंतप्रधान मोदी यांच्या पाठीशी असल्याचे आपल्याला दिसून येईल. महानगरपालिकांमध्ये महायुतीचीच सत्ता येणार आहे. राज्यातील जतना आमच्या बाजूने आहे असा मला विश्वास आहे. आम्ही यांच्या प्रचारात विकासाचा मुद्दाच जास्त उचलून धरला, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

प्रेम टिकवायचं का नाही हे ठाकरे बंधूंनी ठरवावं; बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले

महानगरपालिकांमध्ये महायुतीचाच महापौर होईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. काही ठिकाणी मित्रपक्षांचे महापौर असणार आहेत. मुंबई महानगरपालिकेत निवडणुकीचा निकाल आल्यावर गरज भासल्यास ठाकरे बंधूंना सोबत घेणार का असा प्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारण्यात आयाला. त्यावर बोलताना त्यांनी आता कोणत्याही युतीची शक्यता नाही. आम्ही बहुमताने सतेत येऊ. त्यांना सोबत घेण्याची गरज अजिबात नाही.

Web Title: Mns leader bala nandgaonkar emotional post on social media before bmc election 2026 maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2026 | 04:11 PM

Topics:  

  • BMC Election 2026
  • Maharashtra Local Body Election
  • Maharashtra Politics
  • MNS

संबंधित बातम्या

BJP Pradesh Karyakarini Pune: कार्यकारिणीच्या बैठकीत फडणवीसांनी भाजप पदाधिकाऱ्यांना सुनावले, नेमकं घडलं काय?
1

BJP Pradesh Karyakarini Pune: कार्यकारिणीच्या बैठकीत फडणवीसांनी भाजप पदाधिकाऱ्यांना सुनावले, नेमकं घडलं काय?

Maharashtra Breaking News Today 2026:  कच्च्या तेलाच्या वाढीमुळे जागतिक बाजारात चिंता
2

Maharashtra Breaking News Today 2026:  कच्च्या तेलाच्या वाढीमुळे जागतिक बाजारात चिंता

मोदींचा फोटो हटवल्याने मुंबईत मनसे-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा; शिवतीर्थ परिसरात तणावाचे वातावरण, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
3

मोदींचा फोटो हटवल्याने मुंबईत मनसे-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा; शिवतीर्थ परिसरात तणावाचे वातावरण, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

Police Arrest MNS Workers: प्राचार्यांच्या केबिनमध्ये राडा, घोषणाबाजी; अमित ठाकरेंसह २०-२५ मनसैनिकांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक
4

Police Arrest MNS Workers: प्राचार्यांच्या केबिनमध्ये राडा, घोषणाबाजी; अमित ठाकरेंसह २०-२५ मनसैनिकांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.