Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रात मान्सूनची तारीख अखेर ठरली; ‘या’ तारखेनंतर राज्यात मुसळधार पाऊस होणार?

सध्या मान्सूनची उत्तर सीमा हर्णे सोलापूर मार्गे पुढे सरकत असली तरी अरबी समुद्रावरील वारे कमकुवत असल्याने पुढील काही दिवस मान्सूनचा प्रवास संथ राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 19, 2026 | 01:22 PM
महाराष्ट्रात 25 जूननंतर मान्सून

महाराष्ट्रात 25 जूननंतर मान्सून

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यात मान्सूनच्या प्रगतीला ब्रेक लागल्याने पावसाची प्रतीक्षा वाढली असतानाच भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आगामी 15 दिवसांच्या विस्तारित अंदाजाने दिलासा आणि सावधगिरीचा असा दुहेरी संदेश दिला आहे. १८ ते २४ जूनदरम्यान महाराष्ट्रात मान्सूनची स्थिती तुलनेने कमकुवत राहण्याची शक्यता असून, २५ जूननंतर मात्र मान्सूनला पुन्हा वेग मिळून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत. यात कोकण पट्टयात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

सध्या मान्सूनची उत्तर सीमा हर्णे सोलापूर मार्गे पुढे सरकत असली तरी अरबी समुद्रावरील वारे कमकुवत असल्याने पुढील काही दिवस मान्सूनचा प्रवास संथ राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १८ ते २० जूनदरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट (हिटवेव्ह) जाणवू शकते. तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता असून नागरिकांनी दुपारच्या उन्हापासून बचाव करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोकणात मात्र उष्ण आणि दमट वातावरण कायम राहण्याचा अंदाज आहे.

PCMC News : पावसाळा तोंडावर तरी पिंपरी-चिंचवडमध्ये रस्त्यांची कामे अर्धवट; महापालिकेचा मात्र ९२% नालेसफाईचा दावा PCMC pre monsoon

दरम्यान, २५ जून ते १ जुलै या कालावधीत मान्सूनला अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रावरील हवेचा प्रवाह वाढणे आणि विविध चक्राकार प्रणालींच्या निर्मितीमुळे महाराष्ट्रात मान्सूनच्या पुढील वाटचालीला गती मिळू शकते. विशेषतः कोकण किनारपट्टीवर, गोवा लगतच्या भागात तसेच घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे.

देशभरातील हवामानात वेगाने बदल होण्याची शक्यता

पश्चिमी विक्षोभ, चक्रीय वारे आणि सक्रिय मान्सूनच्या प्रभावामुळे देशभरातील हवामानात वेगाने बदल होण्याची शक्यता आहे. त्यातच भारताच्या ईशान्य भागात मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. यात विजांचा कडकडाट आणि गारपिटीची शक्यता असून, काही भागांमध्ये सोसाट्याचा वारा आणि उष्णता वाढण्याचीही शक्यता आहे.

वादळी पावसाचा नाशिक शहर-जिल्ह्याला तडाखा

मान्सूनपूर्व पहिल्याच पावसाने मंगळवारी दुपारी वादळी वाऱ्यासह हजेरी लावल्याने काही तासातच रस्त्यांवर पाणीच पाणी वाहू लागले. खोदून ठेवलेले रस्ते, वाहतूकीत केलेला बदल व अचानक आलेल्या पावसामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या कोसळल्या तर वीज पुरवठाही खंडीत झाला. रस्त्यावर सर्वच कचरा वाहून आल्याने धुळधाण उडाली.

Web Title: Monsoon in maharashtra after june 25

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 01:05 PM

Topics:  

  • Maharashtra Rain
  • Rain Update
  • Weather Update

संबंधित बातम्या

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत
1

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत

उत्तर प्रदेश चक्रीवादळाच्या विळख्यात; 42 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचाही इशारा, मेघगर्जनेसह…
2

उत्तर प्रदेश चक्रीवादळाच्या विळख्यात; 42 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचाही इशारा, मेघगर्जनेसह…

Rain Update : पुण्यात पावसाची विश्रांती; ढगाळ वातावरण कायम, आज तापमान…
3

Rain Update : पुण्यात पावसाची विश्रांती; ढगाळ वातावरण कायम, आज तापमान…

Rain Update : सिंधुदुर्ग, कोल्हापूर, लातूरसह राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी; अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस होणार?
4

Rain Update : सिंधुदुर्ग, कोल्हापूर, लातूरसह राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी; अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.