बुलेट ट्रेन मार्गात चीनचा खोडा; टीबीएम मशिन चीनमधील बंदरात अडकल्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात मोठा अडथळा आला आहे. बुलेट ट्रेनचा भुयारी मार्ग उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या दोन टनेल बोरिंग मशिन (टीबीएम) चीनमधील बंदरात अडकल्या आहेत. त्यामुळे बुलेट टेनच्या भूयारी बांधकामाचे कोलमडण्याची शक्यता आहे.
वेळापत्रक एनएचएसआरसीएलकडून म बुलेट ट्रेनची उभारणी होत आहे. यासाठी १.०८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येत आहे. या प्रकल्पातील सावली-विक्रोळी आणि विक्रोळी बीकेसी आणि विक्रोळी-सावलीदरम्यान भुयारी मार्ग तयार करण्यासाठी एकूण तीन ‘टीबीएम’चा वापर करण्याचे नियोजन आहे.
वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) ते शिळफाटा या २१ किमीच्या महत्त्वाच्या मार्गासाठी टीबीएमची आवश्यकता आहे. ठाणे खाडीखालील समुद्राखालील सात किमीचा भाग याच्याच्या मदतीने उभारण्यात येणार आहे. भारतीय रेल्वे मंत्रालयाने हे प्रकरण परराष्ट्र मंत्रालयाकडे नेले आहे. ‘टीबीएम’ सह अन्य उपकरणे सोडण्यासाठी राजनैतिक मार्गाचा अवलंब करण्यात येत आहे. मात्र ‘टीबीएम’ आणि अत्यावश्यक यंत्रणा देशात केव्हा दाखल होतील, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही.
जर्मनीमधील ‘टीबीएम’ विशेषज्ञ हेरेनक्नेट यांना टीबीएमची ऑर्डर देण्यात आली होती. या ‘टीबीएम’ चीनमधील ग्वांगझू येथे तयार करण्यात येत होत्या. त्या ऑक्टोबर २०२४ पर्यंत भारतात येणे अपेक्षित होते. सद्यस्थितीत जून २०२५ मध्येही ‘टीबीएम’ आलेल्या नाहीत. याचा थेट परिणाम बुलेट ट्रेनच्या भुयारी बांधकामावर झाला असून, भुयारी बांधकामे आणखी लांबण्याची शक्यता आहे.
जून २०२३मध्ये अफकॉन्सला या भुयारी बांधकामासाठी सहा हजार ३९७ कोटींसह करारबद्ध करण्यात आले होते.
तयारीच्या कामाचा एक भाग म्हणून सध्या बीकेसी (३६ मीटर खोल), विक्रोळी (५६ मीटर) आणि सावली (३९ मीटर) येथे तीन उभ्या शाफ्ट बांधत आहेत.
यामधून ‘टीबीएम’ प्रत्यक्ष बांधकाम जागेवर पोहोचून कार्यान्वित होणार आहेत.