बाप होण्यासाठी जिवंत गिळलं कोंबडीचं पिल्लू; अघोरी कृत्य बेतलं जीवावर
आई-बाप होणं हा एक कुटुंबातील आणि त्या दाम्पत्यासाठी अविस्मरणीय प्रसंग असतो. परंतु काहीवेळा वंध्यत्व येतं, त्यामुळे नैराश्य येतं. या नैराश्यातून अनेकवेळा अंध्यश्रद्धेच्या आहारी गेलेल्या अनेक घटना घडल्या आहेत. छत्तीसगडमध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. छत्तीसगडच्या अंबिकापूर येथील ३३ वर्षीय तरुणाने बाप होण्यासाठी चक्क कोबंडीचं जिवंत पिल्लू गिळलं आहे. मात्र हा प्रकार त्याच्या जीवावर बेतला असून पिल्लू अन्ननलिकेत अडकून त्याचा मृत्यू झाला आहे.
Bikaner Bomb Blast : बिकानेर फील्ड फायरिंग रेंजमध्ये बॉम्बचा स्फोट, 2 जवान शहीद
आनंद यादव हा तरुण अंबिकापूर येथील छिंदकलो गावातील रहिवाशी होता. दरमन्यान घरी अंघोळ करून बाहेर आल्यानंतर त्याला चक्कर आली. अचानक त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर लगेचंच तो जमिनीवर कोसळला. त्यामुळे त्याला कुटुंबीयांनी आणि शेजाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आणि डॉक्टरांनी पोस्ट मॉर्टम केलं तेव्हा धक्काच बसला.
त्याच्या अन्ननलिकेत कोंबडीचं पिल्लू आढळून आलं.. हे कोंबडीचं पिल्लू आनंद यादव यांच्या अन्ननलिकेत श्वसननलिकेच्या कार्याला अडथळा आणत होतं. त्यामुळे आनंद यादव यांना श्वासोच्छवास त्रास होत होता आणि यातूनच त्याचा मृत्यू झाला.
One Nation One Election : भारतात पहिल्यांदा एक देश एक निवडणूक कधी झाली? का बंद झाली? वाचा सविस्तर
डॉक्टर म्हणाले, हा प्रकार पाहून आम्हालाही धक्का बसला आहे. आमच्या कारकीर्दीत पहिल्यांदाच अशा प्रकारची घटना पाहिली आहे. 15,000 हून अधिक पोस्टमॉर्टम केले आहेत. मात्र ही घटना आमच्यासाठी धक्कादायक होती. असं त्यांनी म्हटलं आहे.” असं डॉक्टर बाग म्हणाले. दरम्यान स्थानिकांच्या मते, हे कृत्य मांत्रिकाच्या सांगण्यावरून केलं असावं. आनंद अंधश्रद्धेच्या आहारी गेला असावा. काही रहिवाशांच्या मते, आनंद वंध्यत्वाशी झुंज देत होता. त्याला बाप होण्याचं सुख मिळवायचं होतं. असं केल्याने त्याची समस्या सुटेल असं त्याला वाटत असावं त्यामुले त्याने कोंबडीचं पिल्लू गिळलं असावं.