Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्लीतील लाठीमारानंतर उद्धव ठाकरे आक्रमक! सरकारला दिला ‘हा’ मोठा इशारा; म्हणाले- ‘तुम्ही लाठ्या-बंदुका घेऊन या, मी…’

दिल्लीतील नीट आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीमाराविरोधात मुंबईच्या शिवाजी पार्कवर भव्य आंदोलन पार पडले. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व अमित ठाकरे यांनी या आंदोलनाला भेट देत सरकारला थेट इशारा दिला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 24, 2026 | 06:27 PM
दिल्लीतील लाठीमारानंतर उद्धव ठाकरे आक्रमक! सरकारला दिला 'हा' मोठा इशारा (Photo Credit- X)

दिल्लीतील लाठीमारानंतर उद्धव ठाकरे आक्रमक! सरकारला दिला 'हा' मोठा इशारा (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • दिल्लीतील लाठीमारानंतर उद्धव ठाकरे आक्रमक!
  • सरकारला दिला ‘हा’ मोठा इशारा
  • म्हणाले- ‘तुम्ही लाठ्या-बंदुका घेऊन या, मी…’
मुंबई: नीट (NEET) परीक्षेतील पेपरफुटी प्रकरण, परीक्षांमधील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या भीषण लाठीमाराचे पडसाद आता संपूर्ण देशात उमटत आहेत. दिल्लीतील कारवाईच्या निषेधार्थ मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क येथे मैदानात हजारो विद्यार्थ्यांनी एकत्र येत भव्य आंदोलन पुकारले. या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आमदार आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली.

बघू तुमची हुकूमशाही जिंकते की आमचा तिरंगा – उद्धव ठाकरे

शिवतीर्थावर जमलेल्या अथांग तरुणाईला संबोधित करताना उद्धव ठाकरे कमालीचे आक्रमक झाले होते. ते म्हणाले, “चार दिवसांत आपण दुसऱ्यांदा या जागेवर भेटलो आहोत. परवा मी दिल्लीला गेलो होतो, आता रविवारी पुन्हा भेटणार आहोत. आपण सर्व भारतीय आहोत, हीच आपली खरी ओळख आहे. दिल्लीत ज्या अमानुष पद्धतीने विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला, त्यावरून मी आता या सरकारला स्पष्ट इशारा देतोय.” सरकारला थेट आव्हान देत उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “तुमच्या हातात लाठ्या आणि बंदुका असतील, पण आमच्या हातात हा तिरंगा आहे! या तिरंग्याशी लढण्याची हिंमत आजपर्यंत कोणाचीही झालेली नाही. या, तुम्ही लाठ्या-बंदुका घेऊन समोर या, मी तिरंगा घेऊन येतो. बघू तुमची हुकूमशाही जिंकते की आमचा तिरंगा जिंकतो!”

#WATCH | Mumbai | Shiv Sena (UBT) Chief Uddhav Thackeray holds a Tiranga Rally in Dadar in support of students protesting over the NEET paper leak issue (Video Source: Shiv Sena (UBT) pic.twitter.com/am8jGAdRpA — ANI (@ANI) July 24, 2026

CJP Protest: आमदार रोहित पाटील थेट दिल्लीतील ‘जंतर-मंतर’वर; NEET आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये मिसळून केंद्र सरकारविरोधात निदर्शने

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे – आदित्य ठाकरे

आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची पुनरुच्चार केला. “सोनम वांगचुक यांचे उपोषण सुटले असले तरी विद्यार्थ्यांचे मुख्य आंदोलन संपलेले नाही. दिल्लीत अभिजित दीपके आणि इतर तरुण आजही न्यायासाठी लढा देत आहेत. आपला हा आवाज दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचलाच पाहिजे,” असे ते म्हणाले. तसेच विद्यार्थ्यांना उद्देशून त्यांनी सवाल केला, “आपल्याच सहकाऱ्यांवर अमानुष लाठीमार करणाऱ्यांचे तुम्ही मित्र होऊ शकता का? जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आपण शांत बसायचे नाही!”

विद्यार्थ्यांवरील लाठीमारावरून राज ठाकरेंचा संताप

मला एक प्रश्न पडला आहे. जर शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारलं तर त्यांच्यावर कारवाई होते, तर मग दिल्लीत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर आणि तसे आदेश देणाऱ्यांवर कारवाई का होत नाही? दिल्लीत सध्या जे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे, त्या आंदोलनाला हाताळताना विद्यार्थ्यांवर सर्रास लाठीचार्ज केला जात आहे. हा लाठीचार्ज अगदी हलक्या स्वरूपात गर्दी पांगवण्यासाठी केला जात असता तरी एकवेळ ठीक, पण हा म्हणजे कुठलातरी सूड उगवल्यासारखा केला जात आहे. जे व्हिडीओज समोर येत आहेत त्यात फक्त आंदोलनकर्ते विद्यार्थीच नाही तर आसपास असणाऱ्या अनेकांना सर्रास तुडवलं जात आहे. आणि पोलीस अशी कृत्य करत आहेत याचा अर्थ त्यांना असे आदेश आल्याशिवाय तर हे होऊच शकत नाही.

मुळात आंदोलन का झालं? तर NEET परीक्षेत गोंधळ झाले ज्याचा फटका लाखो विद्यार्थ्यांना बसला त्या रागातून ही मुलं रस्त्यावर उतरली. त्यांच्या समर्थनार्थ इतर विद्यार्थी पण उतरले. थोडक्यात हे आंदोलन विद्यार्थ्यांनी उभं केलं, मोठं केलं. मग विद्यार्थ्यांना मारण्याचं कारण काय होतं ? आणि हा अधिकार पोलिसांना दिलाच कोणी ? विद्यार्थ्यांना मारण्याची जशी शिक्षकांना परवानगी नाही तशी ती पोलिसाना पण नाही. पण तरीही हे का केलं गेलं ?

‘पोलिसांकडे ड्रग्स सहज उपलब्ध होतात का?’ व्हायरल व्हिडिओवरून जयंत पाटील यांचा सरकारला सवाल

Web Title: Uddhav thackeray takes a combative stance following the lathi charge in delhi issues a major warning to the government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 06:27 PM

Topics:  

  • CJP Protest
  • Mumbai
  • neet paper leak
  • Shivaji Park
  • ubt shiv sena

संबंधित बातम्या

Mumbai Local: प्रवाशांसाठी मोठी बातमी! मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर सुरू होणार आपत्कालीन वैद्यकीय कक्ष
1

Mumbai Local: प्रवाशांसाठी मोठी बातमी! मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर सुरू होणार आपत्कालीन वैद्यकीय कक्ष

Mumbai News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! दीड तासांचा प्रवास अवघ्या काही मिनिटांत, मढ-वर्सोवा केबल-स्टेड पुलाचा मार्ग मोकळा
2

Mumbai News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! दीड तासांचा प्रवास अवघ्या काही मिनिटांत, मढ-वर्सोवा केबल-स्टेड पुलाचा मार्ग मोकळा

Manoj Jarange Patil: ‘मराठ्यांना मुंबईत येण्यापासून रोखल्यास भाजपपासून मतदान दूर गेलेच समजा’; जरांगे पाटलांचा थेट इशारा
3

Manoj Jarange Patil: ‘मराठ्यांना मुंबईत येण्यापासून रोखल्यास भाजपपासून मतदान दूर गेलेच समजा’; जरांगे पाटलांचा थेट इशारा

Mumbai Metro: गणेशभक्तांसाठी खुशखबर! रात्री १२.३० पर्यंत धावणार मुंबई मेट्रो; १० ते १५ अतिरिक्त फेऱ्या
4

Mumbai Metro: गणेशभक्तांसाठी खुशखबर! रात्री १२.३० पर्यंत धावणार मुंबई मेट्रो; १० ते १५ अतिरिक्त फेऱ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.