Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना दुहेरी धक्का! लोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वे ठप्प; पनवेल स्थानकातील लिफ्ट कोसळली…

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठा बिघाड झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. डोंबिवलीजवळ लोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली, तर पनवेल रेल्वे स्थानक येथे लिफ्ट कोसळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 20, 2026 | 10:02 AM
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना दुहेरी धक्का! लोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वे ठप्प; पनवेल स्थानकातील लिफ्ट कोसळली...

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना दुहेरी धक्का! लोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वे ठप्प; पनवेल स्थानकातील लिफ्ट कोसळली...

Follow Us
Follow Us:
  • डोंबिवली-कल्याण मार्गावर लोकलचा डबा रुळावरून घसरला
  • मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत
  • पनवेल स्थानकात प्रवाशांनी भरलेली लिफ्ट कोसळली
आठवड्याच्या सुरुवातीलाच मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. मुंबईची लाइफलाइन असणारी मुंबई लोकलबाबत एक मोठी दुर्घटना घडली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहेत. तर दुसरी घटना म्हणजे पनवेल स्थानकात प्रवाशांनी भरलेली लिफ्टच खाली कोसळली. या दोन्ही घटनांचा रेल्वे वाहतूकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. हजारो प्रवाशांना याचा फटका बसला आहे.

Solapur News : कोणी पाणी देतं का पाणी ; 872 कोटी रुपये खर्च करुनही नागरिकांची पाण्यासाठी वणवण

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीहून कल्याणच्या दिशेने जाणारी एक डाऊन स्लो लोकल रुळावरून घसरल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. डबा रुळावरून घसरल्याने डाऊन स्लो मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असल्याची माहिती मिळत आहे. आज आठवड्याचा पहिला दिवस आहे. कामावर जाणाऱ्या प्रवाशांची लगबग सुरु आहे. अशाच परिस्थितीत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. (फोटो सौजन्य – X) 

दुसरी घटना म्हणजे, नवी मुंबईतील पनवेल रेल्वे स्थानकातील प्रवाशांना ने-आण करणारी लिफ्ट अचानक खाली कोसळली आहे. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या लिफ्टमध्ये 4 प्रवासी अडकले होते. अचानक लिफ्ट खाली कोसळल्याने प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास डोंबिवली रेल्वे स्थनकाजवळ मोठी दिर्घटना घडली. या घटनेमुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आज सकाळी डोंबिवली रेल्वे स्थनकाजवळ कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकलचे ३ डबे रुळावरून घसरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही लोकल कळवा कारशेडमधून अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात होती. या घटनेत कोणतीही जिवीत नाही घडली नाही. तरी देखील याचा परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतूकीवर झाला आहे. या घटनेनंतर मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी झाली आहे.

२७ वर्षांत मुंबईचे तापमान २ अंशांनी वाढले! ‘काँक्रिटच्या जंगला’मुळे मुंबईकरांचा श्वास कोंडला; आजारांचा धोका वाढण्याची शक्यता

सध्या रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम सुरू आहे, लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येईल, अशी शक्यता आहे. या घटनेनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेसेवेवर परिणाम झाला आहे. याचा परिणाम प्रवाशांवर होत आहे.

पनवेल रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वरील लिफ्ट अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे सर्वत्र गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. या लिफ्टमध्ये अडकलेल्या चार प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे आणि या घटनेक कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

Web Title: Mumbai local disruption central railway empty local train derails near dombivli panvel station lift collapse

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 09:28 AM

Topics:  

  • central railway
  • Mumbai News
  • panvel

संबंधित बातम्या

‘उत्तर मुंबईत कौशल्य विकास केंद्राच्या…’; ‘रोजगार’ संदर्भात काय म्हणाले केंद्रीय मंत्री पीयूष गोयल?
1

‘उत्तर मुंबईत कौशल्य विकास केंद्राच्या…’; ‘रोजगार’ संदर्भात काय म्हणाले केंद्रीय मंत्री पीयूष गोयल?

Indian Railways: रेल्वे स्थानक, जंक्शन, सेंट्रल आणि टर्मिनस म्हणजे काय? रेल्वे प्रवाशांनी जाणून घ्या यामागील फरक
2

Indian Railways: रेल्वे स्थानक, जंक्शन, सेंट्रल आणि टर्मिनस म्हणजे काय? रेल्वे प्रवाशांनी जाणून घ्या यामागील फरक

Mumbai News: खाजगी रुग्णालय बिलांना लगाम कधी? ‘जनआरोग्य अभियाना’चा सवाल, उपचारांचे प्रमाणित दर निश्चित करण्याची मागणी
3

Mumbai News: खाजगी रुग्णालय बिलांना लगाम कधी? ‘जनआरोग्य अभियाना’चा सवाल, उपचारांचे प्रमाणित दर निश्चित करण्याची मागणी

Maharashtra Breaking News Today 2026:  राज्यासह देशभरात शिक्षक दिन आणि गोकुळाष्टमीचा उत्साह
4

Maharashtra Breaking News Today 2026: राज्यासह देशभरात शिक्षक दिन आणि गोकुळाष्टमीचा उत्साह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.