२७ वर्षांत मुंबईचे तापमान २ अंशांनी वाढले! 'काँक्रिटच्या जंगला'मुळे मुंबईकरांचा श्वास कोंडला; आजारांचा धोका वाढण्याची शक्यता
गेल्या २७ वर्षांत मुंबईच्या सरासरी तापमानात तब्बल २ अंश सेल्सिअसची वाढ झाली असून, वाढत्या सिमेंटच्या जंगलामुळे मुंबई आता ‘अर्बन हीट आयलैंड’च्या विळख्यात सापडली आहे. राज्याचे माजी साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी धक्कादायक माहिती दिली. मुंबईने आपले नैसर्गिक संरक्षण कवच गमावल्याने उष्णतेच्या लाटेचा आणि आजारांचा धोका कित्येक पटीने वाढला असल्याचा इशाराच डॉ आवटे यांनी दिला, १९९१ ते २०१८ या कालावधीतील आकडेवारीनुसार, मुंबईचे सरासरी तापमान ३४.०८ अंशांवरून ३६.२८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. या काळात मुंबईतील बांधकामे ६६ टक्क्यांनी वाढली, मात्र त्याची मोठी किंमत पर्यावरणाला मोजावी लागली आहे. मुंबईने या काळात आपली ८१ टक्के मोकळी जमीन, ४० टक्के हरित क्षेत्र (जंगले) आणि ३० टक्के जलस्रोत (तलाव व पाणथळ जागा) गमावले आहेत.(फोटो सौजन्य – istock)
वाढत्या तापमानाचा थेट परिणाम आरोग्यावर होत असल्याचे राज्याच्या आकडेवारीवरून दिसते. २०११ मध्ये उष्णता संबंधित आजाराचे २८ रुग्ण होते, तर २०२२ मध्ये हा आकडा ७७३ पर्यंत पोहोचला आहे. २०२२ मध्ये उष्माघातामुळे ३१ मृत्यूची नोंद झाली आहे, जी गेल्या दशकातील सर्वाधिक संख्या आहे. डॉ. आवटे यांनी स्पष्ट केले की, मुंबईत झाडे आणि जलसाटे कमी झाल्याने काँक्रीटच्या इमारती उष्णता शोषून घेतात आणि रात्री ती बाहेर सोडतात. यामुळे शहराचे तापमान आजूबाजूच्या ग्रामीण भागापेक्षा कितीतरी जास्त राहते. झोपडपट्टी परिसर सर्वाधिक तप्त दाट दाट लोकवस्ती आणि झाडांचा अभाव असलेल्या झोपडपट्टी परिसरातील तापमान, उच्चभू आणि हरित क्षेत्राच्या तुलनेत ६ ते ८ अंशांनी जास्त नोंदवले जात आहे. याचा विमानतळ, औद्योगिक वसाहती आणि मॉल्ससारख्या मोठ्या बांधकामांच्या भागात उष्णता सर्वाधिक साठून राहत आहे.
मुंबईत होणार देशातील सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प; ‘या’ प्रकल्पाचा मास्टर प्लॅन सादर
८८ मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात वाढत्या तापमानाचा बेट परिणाम सार्वजनिक आरोग्यावर होत आहे. उष्णतेमुळे होणाऱ्या आजारात वाढ झाली असून यामागे केवळ तापमान वाढणे हेच एकमेव कारण नाही, सिमेंटची जंगले आणि आर्द्रता यामुळे शरीराची उष्णता बाहेर पडण्यास अडथळा निर्माण होतो, जो उष्माघातासाठी कारणीभूत ठरत आहे, अशी माहिती डॉ प्रदीप आवटे यांनी दिली आहे.






