Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई आधी कोळी बांधवांचीच; गिरगाव चौपाटीवरील बोटी हटवण्याच्या कारवाईला मंत्री मंगल प्रभात लोढांचा ब्रेक, प्रशासनाला कडक निर्देश

मुंबईच्या गिरगाव चौपाटीवरील कोळी बांधवांच्या बोटी हटवण्याच्या प्रशासनाच्या कारवाईला मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्थगिती दिली आहे. "मुंबई सर्वप्रथम कोळी बांधवांचीच आहे" असे म्हणत त्यांनी बीएमसीला कडक निर्देश दिले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 12, 2026 | 04:34 PM
मुंबई आधी कोळी बांधवांचीच; गिरगाव चौपाटीवरील बोटी हटवण्याच्या कारवाईला मंत्री मंगल प्रभात लोढांचा ब्रेक, प्रशासनाला कडक निर्देश
Follow Us
Follow Us:
  • मुंबई आधी कोळी बांधवांचीच
  • गिरगाव चौपाटीवरील बोटी हटवण्याच्या कारवाईला मंत्री मंगल प्रभात लोढांचा ब्रेक
  • प्रशासनाला कडक निर्देश
मुंबई | दिनांक: १२ जून २०२६: गिरगाव चौपाटी येथे कोळी बांधवांच्या बोटी हटवण्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीची राज्याचे मंत्री व स्थानिक आमदार मंगल प्रभात लोढा यांनी तात्काळ दखल घेतली असून, संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.

या संदर्भात कोळी समाजाच्या प्रतिनिधींनी श्री. मंगल प्रभात लोढा यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली. त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेत, श्री. मंगल प्रभात लोढा यांनी तत्काळ बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहआयुक्त तसेच मत्स्यव्यवसाय विभागाच्या आयुक्तांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. यावेळी त्यांनी कोळी बांधवांशी समन्वय साधून सहकार्य करण्याच्या तसेच कोणतीही कारवाई करताना त्यांच्या उपजीविकेचा व परंपरागत हक्कांचा सर्वंकष विचार करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.

गिरगाव चौपाटीवरील कोळी बांधवांच्या हक्काच्या प्रश्नाची तातडीने दखल घेतली. त्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांशी तत्काळ संपर्क साधला. कोळी बांधवांची उपजीविका, त्यांचे परंपरागत हक्क आणि सांस्कृतिक वारसा अबाधित राहावा यासाठी समन्वयातून सकारात्मक मार्ग काढण्याच्या… pic.twitter.com/xp3Z3K60gz — Mangal Prabhat Lodha (@MPLodha) June 12, 2026

आदिवासी मुलांसाठी ‘मानवतेचा हात, सर्वांचा साथ’ अभियानाचा शुभारंभ; Mangal Prabhat Lodha म्हणाले…

गिरगाव चौपाटी परिसर हा मुंबईच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचा महत्त्वाचा भाग असून, येथे दीर्घकाळापासून कोळी समाज आपली उपजीविका पारंपरिक पद्धतीने करत आहे. या पार्श्वभूमीवर विकासकामे आणि स्थानिकांच्या हक्कांमध्ये संतुलन राखणे अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

यासंदर्भात श्री. मंगल प्रभात लोढा म्हणाले, “गिरगाव चौपाटीवरील कोळी बांधवांचा प्रश्न अत्यंत संवेदनशील आहे. प्रशासन आणि स्थानिक समुदाय यांच्यात योग्य समन्वय राखूनच या प्रश्नावर मार्ग काढला पाहिजे. जोपर्यंत कोळी बांधवांना गिरगाव चौपाटी येथे योग्य जागा किंवा पर्यायी व्यवस्था उपलब्ध होत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांच्या सोबत ठामपणे उभे आहोत. मुंबई ही सर्वप्रथम कोळी बांधवांचीच आहे. कोळी बांधवांची उपजीविका आणि त्यांच्या पारंपरिक हक्कांचा सन्मान राखत सकारात्मक तोडगा निघेल, यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील.”

या प्रकरणात सर्व संबंधित घटकांमध्ये संवादातून मार्ग काढण्यास प्राधान्य देण्यात येणार असून, लवकरच यावर सकारात्मक तोडगा निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

मांडवी आयटीआय नामांतराचा वाद चिघळणार; ‘हा तर डॉ. कलाम यांचे नाव पुसण्याचा प्रयत्न’, लोढा यांची टीका

Web Title: Mumbai minister mangal prabhat lodha stops bmc action on koli boats at girgaon chowpatty

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 04:33 PM

Topics:  

  • Koli Community
  • Mangal Prabhat Lodha
  • Mumbai
  • worli

संबंधित बातम्या

PM Modi Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बाणगंगेवर महाआरती, मंगलप्रभात लोढांचे आयोजन
1

PM Modi Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बाणगंगेवर महाआरती, मंगलप्रभात लोढांचे आयोजन

Mumbai Local: प्रवाशांसाठी मोठी बातमी! मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर सुरू होणार आपत्कालीन वैद्यकीय कक्ष
2

Mumbai Local: प्रवाशांसाठी मोठी बातमी! मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर सुरू होणार आपत्कालीन वैद्यकीय कक्ष

मोठी बातमी! राज्यातील तरुणांसाठी खूशखबर; ‘रोजगार महाकुंभ’द्वारे हजारो नोकऱ्यांची संधी
3

मोठी बातमी! राज्यातील तरुणांसाठी खूशखबर; ‘रोजगार महाकुंभ’द्वारे हजारो नोकऱ्यांची संधी

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पा मोरया! गणेशभक्तांना घेऊन ‘नमो एक्स्प्रेस’ कोकणकडे रवाना
4

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पा मोरया! गणेशभक्तांना घेऊन ‘नमो एक्स्प्रेस’ कोकणकडे रवाना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.