मुंबईत एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्या २ लोकल अन्...; मिरा रोड स्टेशनवर घडला प्रकार
मुंबईकरांची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल संदर्भात मोठी घटना समोर आली आहे. मुंबईत दोन लोकल ट्रेन एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्याची घटना घडली. त्यामुळे प्रवाशांच्या ह्रदयाचे ठोके काही काळासाठी वाढले होते. प्रवाशांमध्ये एकच भीती पसरली होती. पश्चिम रेल्वेच्या मिरा रोड स्टेशनवर सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. मात्र, मोटरमनच्या सतर्कतेमुळे हा अनर्थ टळला आणि प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.
मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांचा दिवसभरात लोकल ट्रेनने प्रवास होतो. नोकरीवर पोहोचण्यासाठी नागरिकांचं पहिलं प्राधान्य लोकल ट्रेनला असतं. याच लोकल ट्रेनला प्रवाशांची मोठी गर्दी असते. लोकल प्रवासी प्रचंड गर्दीतून नोकरीसाठी कार्यालय गाठतात. ऑफिसला जाताना प्रवासी निश्चिंत असतात. त्यांना अपघाताची कोणतीही भीती नसते. मात्र, आज बुधवारी लोकल ट्रेनचा मोठा अपघात थोडक्यात टळला. हा प्रकार समजताच अनेक प्रवाशांची झोप उडाली.
पश्चिम रेल्वेच्या मिरा रोड स्टेशनजवळ मोठी घटना घडली. मिरा रोड रेल्वे स्टेशनवर एकाच ट्रॅकवर दोन लोकल ट्रेन समोरासमोर आल्याची घटना घडली. दादरकडून वसईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मिरा रोड रेल्वे स्टेशन येथील प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर एकाच रेल्वे ट्रॅकवर दोन्ही ट्रेन आल्या. दोन्ही लोकल ट्रेन समोरासमोर येऊ लागल्याने स्टेशनवर उभे असणाऱ्या प्रवाशांमध्ये एकच भीती पसरली. लोकल ट्रेनच्या मोटनमनच्या सतर्कतेमुळे काही मीटर अंतरावर दोन्ही ट्रेन थांबवण्यात आल्या. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
मुंबईतील सूक्ष्मकण प्रदूषण (पीएम २.५ आणि पीएम १०) हा वायू प्रदूषणाचा मुख्य घटक आहे, जो सार्वजनिक आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करतो. या श्वेतपत्रिकेत मुंबईतील सूक्ष्मकण प्रदूषणाचे स्त्रोत तपासले आहेत, ज्यात वाहतूक क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. वाहतूक, उद्योग, रस्त्यांवरील धूळ, ऊर्जा उत्पादन आणि निवासी क्षेत्रातून पीएम २.५ व पीएम १० उत्सर्जित होतात. या उत्सर्जनातील घटक आणि ईव्हीचे (इलेक्ट्रिक वाहन) रूपांतर केल्याने प्रदूषण कमी होण्याची शक्यता असून, आरोग्य आणि आर्थिक लाभ देखील प्राप्त होऊ शकतात.
मुंबईत सध्या ४.६ दशलक्ष वाहने आहेत, ज्यामध्ये दुचाकी, कार्स, कमर्शियल वाहने, बसेस, आणि तीनचाकी यांचा समावेश आहे. वाहतूक क्षेत्राच्या प्रदूषणात प्रमुख घटक असलेली कमर्शियल वाहने आहेत, ज्याचा पीएम २.५ उत्सर्जनात ४८.२८% वाटा आहे. वाहतूक क्षेत्राचे एकूण पीएम २.५ उत्सर्जन १४.६ Gg आहे. या प्रदूषणामुळे आरोग्यसेवा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. वायूप्रदूषणामुळे जीवितहानी आणि अपंगत्वाचे नुकसान देखील होत आहे, ज्यामुळे आरोग्य खर्चाचा वाढीव भार पडतो.