Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

’50 ग्रॅम पावडर टाकेन…’ पोलिसांच्या व्हायरल व्हिडिओवरून राज ठाकरे आक्रमक, ‘पोलीस ड्रग्स सप्लायर आहे का?’ असा सवाल केला उपस्थित

मुंबईतील संयुक्त पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी CJP आंदोलन, NEET पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईवरून भाजप सरकारवर निशाणा साधला. पेपरफुटीला जबाबदारांवर कारवाई आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत 26 जुलै रोजी उद्धव ठाकरे यांच्यासह संयुक्त मोर्चाची घोषणा केली.

  • By विवेक
Updated On: Jul 23, 2026 | 03:44 PM
'50 ग्रॅम पावडर टाकेन...' पोलिसांच्या व्हायरल व्हिडिओवरून राज ठाकरे आक्रमक, 'पोलीस ड्रग्स सप्लायर आहे का?' असा सवाल केला उपस्थित

'50 ग्रॅम पावडर टाकेन...' पोलिसांच्या व्हायरल व्हिडिओवरून राज ठाकरे आक्रमक, 'पोलीस ड्रग्स सप्लायर आहे का?' असा सवाल केला उपस्थित

Follow Us
Follow Us:

मुंबईत आज झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 26 जुलै रोजी संयुक्त मोर्चाची घोषणा केली. शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर असा हा मोर्चा निघणार असून विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन दोन्ही नेत्यांनी केले. यावेळी त्यांनी पोलिसांच्या व्हायरल व्हिडीओवरून संताप व्यक्त करत गंभीर प्रश्न उपस्थित केले.

यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी ’50 ग्रॅम पावडर टाकेन’ मुंबई पोलीस कर्मचाऱ्याच्या व्हायरल व्हिडिओचा उल्लेख करत “हा पोलीस ड्रग्स सप्लायर आहे का?” असा सवाल उपस्थित केला आहे. याशिवाय NEET पेपरफुटी, दिल्लीतील CJP आंदोलन आणि विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईवरून भाजप सरकारवरहि त्यांनी जोरदार निशाणा साधला. पेपरफुटी प्रकरणातील जबाबदारांवर तातडीने कारवाई करून त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

’50 ग्रॅम पावडर टाकेन’ व्हिडिओचा उल्लेख

पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओचाही उल्लेख केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, आंदोलनासाठी जाणाऱ्या काही विद्यार्थ्यांना एका पोलिसाने “50 ग्रॅम पावडर टाकेन” अशी धमकी दिल्याचा व्हिडिओ त्यांच्या पाहण्यात आला आहे. याबाबत त्यांनी संताप व्यक्त करत, “हा पोलीस ड्रग्स सप्लायर आहे का? पोलिसांकडे पावडर कुठून आली?” असा सवाल उपस्थित केला. हा व्हिडिओ आपण मुंबई पोलिस आयुक्तांकडे पाठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Thackeray Brothers: महाराष्ट्र पेटणार! विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार; २६ जुलैला मुंबईत ‘संयुक्त मोर्च’

पेपरफुटीवर सरकारला धारेवर

राज ठाकरे म्हणाले की, “पेपरफुटीला जे जबाबदार असतील त्यांचा तात्काळ राजीनामा घ्या. भविष्यात अशी घटना पुन्हा होणार नाही, याची सरकारने हमी द्यावी. हे आधी केले असते, तर इतका मोठा संघर्ष निर्माण झाला नसता.” त्यांनी भाजपवर टीका करत, काँग्रेसच्या काळात ज्या आंदोलनांवर भाजपने राजकारण केले, आज त्याच प्रकारची भूमिका भाजप घेत असल्याचा आरोप केला.

26 जुलैच्या मोर्चात राजकीय झेंडे नसतील

संयुक्त मोर्चाबाबत माहिती देताना राज ठाकरे म्हणाले की, 26 जुलै रोजी सकाळी 10 वाजता शिवाजी पार्क येथे जमण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर सकाळी सुमारे 11 ते 11.30 वाजण्याच्या दरम्यान मोर्चा सिद्धिविनायक मंदिराच्या दिशेने रवाना होईल. या मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचे झेंडे नसतील. केवळ राष्ट्रीय तिरंगा हातात घेऊन नागरिक सहभागी होतील, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

‘विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज अमान्य, शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घ्या’; ठाकरे-केजरीवाल यांचा जंतर-मंतरवरील आंदोलनाला पूर्ण पाठिंबा

‘हा मतपेटीचा नव्हे, न्यायाचा विषय’

राज ठाकरे म्हणाले की, हा प्रश्न कोणत्याही पक्षाच्या राजकारणाचा नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित आहे. “हा मतपेटीचा विषय नाही, हा न्यायाचा विषय आहे. विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. त्यांचा आवाज ऐकण्याऐवजी प्रश्न विचारणाऱ्यांनाच देशद्रोही ठरवण्याची प्रवृत्ती वाढत आहे,” असा आरोप त्यांनी केला. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन आणि देशभरातील वाढता संताप लक्षात घेता, सरकारने दडपशाहीचा मार्ग न स्वीकारता संवादातून प्रश्न सोडवावेत, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

Web Title: Raj thackeray on viral police video mumbai cjp protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 03:44 PM

Topics:  

  • CJP Protest
  • Mumbai Police
  • raj thackeray
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Jantar Mantar Protest : ‘विद्यार्थ्यांना मिळाली रफ्तार’ रस्त्यावर उतरली रॅपर मंडळी! Emiway नेही दिली साथ
1

Jantar Mantar Protest : ‘विद्यार्थ्यांना मिळाली रफ्तार’ रस्त्यावर उतरली रॅपर मंडळी! Emiway नेही दिली साथ

CJP Protest: विद्यार्थी जिथे सांगतील तिथे चर्चेला तयार!; केंद्र सरकारची मोठी ऑफर
2

CJP Protest: विद्यार्थी जिथे सांगतील तिथे चर्चेला तयार!; केंद्र सरकारची मोठी ऑफर

‘स्वत:चं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्यांचं बघायचं वाकून’; ठाकरे बंधूंच्या मुंबईतील मोर्चावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
3

‘स्वत:चं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्यांचं बघायचं वाकून’; ठाकरे बंधूंच्या मुंबईतील मोर्चावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

दिल्लीमधील आंदोलनात वापरण्यात आलेले अश्रूधूर नळकांडे म्हणजे काय? जाणून घ्या शरीरावर होणारे गंभीर दुष्परिणाम
4

दिल्लीमधील आंदोलनात वापरण्यात आलेले अश्रूधूर नळकांडे म्हणजे काय? जाणून घ्या शरीरावर होणारे गंभीर दुष्परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.