Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: सचिन वाझेंच्या जामिनावर कोर्टाचा निर्णय; अँटिलिया प्रकरणातील साडेपाच वर्षांचा कारावास

अँटिलिया स्फोटक प्रकरणात माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेंना जामीन मंजूर झाला आहे. साडेपाच वर्षांपासून तुरुंगात असलेल्या वाझेंच्या सुटकेचा मार्ग या निर्णयामुळे मोकळा झाला आहे. मात्र, अन्य प्रकरणांमध्ये आरोपी असल्याने त्यांची तातडीने सुटका होईल का, याबाबत प्रश्न कायम आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 29, 2026 | 04:21 PM
अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेंना जामीन; साडेपाच वर्षांनंतर बाहेर येण्याचा मार्ग मोकळा

अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेंना जामीन; साडेपाच वर्षांनंतर बाहेर येण्याचा मार्ग मोकळा

Follow Us
Follow Us:
  • अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेंना जामीन
  • साडेपाच वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा
  • इतर प्रकरणांमुळे सुटकेबाबत अद्याप अनिश्चितता
 

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळल्याच्या प्रकरणात माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना जामीन मंजूर झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, वाझे अन्य प्रकरणांमध्येही आरोपी असल्याने या जामिनानंतर त्यांची तातडीने तुरुंगातून सुटका होईलच असे नाही. अँटिलिया प्रकरणात वाझे मार्च २०२१ पासून न्यायालयीन कोठडीत आहेत.

हेही वाचा: Crime News: ‘लिव्ह-इन’मधून जन्मलेल्या बाळाचे तीन व्यवहार; ४८ तासांत चार हातांतून तेलंगणापर्यंत प्रवास

दीर्घ कारावासाच्या पार्श्वभूमीवर जामीन

अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात वाझे यांच्यावर आरोप आहेत. जुलै २०२६ मध्ये विशेष एनआयए न्यायालयाने वाझे यांचा आरोपातून मुक्त करण्याचा अर्ज फेटाळला होता. न्यायालयाने आरोप निश्चित करण्यासाठी पुरेसा प्राथमिक पुरावा असल्याचे नमूद केले होते. त्यानंतर ऑगस्ट २०२६ मध्ये वाझेसह एकूण दहा आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले.

अँटिलियाबाहेर सापडली होती स्फोटकांनी भरलेली गाडी

२५ फेब्रुवारी २०२१ रोजी दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाबाहेर एक बेवारस स्कॉर्पिओ आढळली होती. या वाहनात जिलेटिनच्या २० कांड्या आणि धमकीचे पत्र सापडले होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सोपवण्यात आला. यानंतर ४ मार्चला मनसुख हिरेन बेपत्ता झाले आणि ५ मार्च २०२१ रोजी त्यांचा मृतदेह ठाणे खाडीत आढळला. दोन्ही प्रकरणांचा परस्पर संबंध असल्याचा तपास यंत्रणेचा आरोप आहे.

हेही वाचा: Solapur News: पाणीटंचाईने त्रस्त तुळशी गाव चक्क विक्रीला; ५०० हून अधिक तरुणांची लग्ने रखडली

१० आरोपींवर आरोप निश्चित

ऑगस्ट २०२६ मध्ये विशेष एनआयए न्यायालयाने सचिन वाझे, माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासह एकूण दहा आरोपींविरोधात आरोप निश्चित केले. सरकारी पक्षाने या प्रकरणात कट, खंडणी, पुरावे नष्ट करणे आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येसंदर्भात विविध आरोप मांडले आहेत. आरोपींनी हे आरोप नाकारले आहेत. दरम्यान, वाझे यांना यापूर्वी अन्य प्रकरणांमध्येही न्यायालयीन दिलासा मिळाला आहे; मात्र अँटिलिया प्रकरणातील न्यायालयीन कोठडीमुळे ते तुरुंगातच राहिले होते. त्यामुळे सध्याच्या जामिनाचा प्रत्यक्ष परिणाम त्यांच्या सुटकेवर होण्यासाठी इतर प्रकरणांतील न्यायालयीन स्थितीही महत्त्वाची ठरणार आहे.

Web Title: Sachin waze antilia explosive case bail mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 04:07 PM

Topics:  

  • antilia case
  • Antilia House
  • Court
  • Mukesh Ambani
  • Mumbai Crime case
  • Mumbai Murder Case
  • Mumbai News
  • NIA
  • Sachin Waze

संबंधित बातम्या

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
1

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Mumbai News: पिंडदानामुळे पूर्वजांना मिळेल मुक्ती! पितृ पंधरवड्यात १६ दिवस करणार पूर्वजांचे स्मरण; अनेक ठिकाणी आयोजन
2

Mumbai News: पिंडदानामुळे पूर्वजांना मिळेल मुक्ती! पितृ पंधरवड्यात १६ दिवस करणार पूर्वजांचे स्मरण; अनेक ठिकाणी आयोजन

Mumbai News : मुंबईतील 14 फुटांवरील झोपड्यांवर कारवाईचा मुद्दा तापला; ठाकरे गटाचा विरोध, भाजपचा पलटवार
3

Mumbai News : मुंबईतील 14 फुटांवरील झोपड्यांवर कारवाईचा मुद्दा तापला; ठाकरे गटाचा विरोध, भाजपचा पलटवार

Mumbai News: २,७५४ मेट्रिक टन विसर्जनोत्तर साहित्याचे संकलन! मुलुंड येथील तात्पुरत्या केंद्रात साठवणूक
4

Mumbai News: २,७५४ मेट्रिक टन विसर्जनोत्तर साहित्याचे संकलन! मुलुंड येथील तात्पुरत्या केंद्रात साठवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.