Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Operation Tiger: अरे देवा! मुंबई पालिकेत पण ऑपरेशन टायगर २.०? ३५ नगरसेवक संपर्कात; किरण लांडे यांचा दावा

Shivsena Operation Tiger: राज्यात ‘ऑपरेशन टायगर २.०’च्या चर्चांना वेग आला असतानाच आता मुंबई महापालिकेतही मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा रंगली आहे. ठाकरे गटातील तब्बल ३५ नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना नेते किरण लांडे यांनी केला असून, आगामी काळात मुंबईच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 18, 2026 | 01:31 PM
अरे देवा! मुंबई पालिकेत पण ऑपरेशन टायगर २.०? ३५ नगरसेवक संपर्कात; किरण लांडे यांचा दावा

अरे देवा! मुंबई पालिकेत पण ऑपरेशन टायगर २.०? ३५ नगरसेवक संपर्कात; किरण लांडे यांचा दावा

Follow Us
Follow Us:
  • मुंबई पालिकेत पण ऑपरेशन टायगर २.०?
  • ३५ नगरसेवक संपर्कात
  • किरण लांडे यांचा दावा
Shivsena Operation Tiger News Marathi : मुंबई महानगरपालिकेतील राजकीय वातावरण ‘ऑपरेशन टायगर‘च्या निमित्ताने कमालीचे तापले असून, सत्ताधारी भाजप आणि विरोधी ठाकरे गटात थेट ‘आकड्यांचे युद्ध’ आणि कलगीतुरा रंगू लागला आहे. ठाकरे गटातील काही नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चेने पालिकेच्या गोटात मोठी खळबळ उडवून दिली आहे. त्यातच शिंदे गटाचे किरण लांडे यांनीही मुंबईतील ३० ते ३५ नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा करून पालिकेत ‘ऑपरेशन टायगर २.०’च्या चर्चाना हवा दिली.

‘ऑपरेशन टायगर’बाबत आम्हाला काहीही माहिती नाही, आमच्या नेत्यांना…; बावनकुळे यांचं मोठं विधान

या पार्श्वभूमीवर भाजप ‘पुढे बघा, बरेच काही घडेल’, असा सूचक इशारा देत ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहे, तर ठाकरे गटाने ‘तुम्ही फक्त आकडे लावण्यात आणि पक्ष फोडण्यातच पुढे आहात, असा खोचक टोला लगावत आपल्या निष्ठावंतांवर विश्वास जाहीर केला आहे. महापालिकेतील ऑपरेशन टायगर पार्ट २ बाबत बोलताना शिवसेना शिंदे गडाचे नगरसेवक किरण लांडगे यांनी सांगितले की, खासदारांच्या पक्षप्रवेशानंतर आता अनेक नगरसेवकही आमच्या संपर्कात आहेत. पक्षाचे संघटनात्मक बळ वाढविण्यासाठी चर्चा सुरू आहे.

गोंधळ घालणे हाच ठाकरे गटाचा अजेंडा : खणकर

पालिकेतील सभागृह नेते गणेश खणकर यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्ला चढवताना विरोधकांच्या गांभीर्यावरव प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गेल्या चार महिन्यांत विरोधी पक्ष असलेल्या ठाकरे गटाने कोणत्याही धोरणात्मक विषयावर गंभीर भूमिका मांडली नसून, केवळ गोंधळ घालणे हाच त्यांचा अजेंडा असल्याचा आरोप त्यांनी केला. ठाकरे गटात माजी महापौरांचा भरणा असूनही त्यांच्या बोलण्यात प्रगल्भता नाही आणि त्यांना केवळ पैठणी, पुरणपोळी आणि चटणी अशाच विषयांवर बोलण्यात अधिक रस असतो, असा चिमटा त्यांनी काढला.

आमचे काही नगरसेवक त्यांच्या संपर्कात आहेत याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. पण ज्यांना जायचे आहे त्यांनी खुशाल जावे, आम्ही कोणालाही अडवणार नाही, एक-दोन नगरसेवक गेल्याने ठाकरे गटाला काहीही फरक पडत नाही, कारण आमचे खरे आणि निष्ठावान नगरसेवक आजही पक्षासोबत खंबीरपणे उभे आहेत, सत्ताधाऱ्यांचे हे फोडाफोडीचे षडयंत्र मुंबईची जनता उघड्या डोळ्यांनी बघत असून, योग्य वेळी ती सत्ताधा-यांना मतपेटीतून दणदणीत उत्तर देईल, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी दिली.

भविष्याची चिता आहे, त्याची ठाकरे गटात मोठी घुसमट होत आहे. अंतर्गत खदखद असणारे अनेक नगरसेवक सभागृहात भाजपक्षशी नजरेने संपर्क साधून सोबत येण्याची इच्छा दर्शवत असल्याने भाजपचा आकडा नक्कीच वाढणार आहे, अशी माहिती भाजपचे सभागृह नेते गणेश खणकर यांनी दिली.

Shiv Sena Operation Tiger: ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला फक्त 3 खासदार उपस्थित; 6 बंडखोरांनी फिरवली पाठ

Web Title: Shivsena operation tiger after six mps now operation tiger in bmc twenty plus uddhav thackeray shivsena ubt corporators in touch with eknath shinde group kiran landge claim

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 01:31 PM

Topics:  

  • BMC
  • Eknath Shinde
  • Operation Tiger
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Disha Salian Case : ‘फालतू चारित्र्यहनन बस्स झालं!’ दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरे संतापले
1

Disha Salian Case : ‘फालतू चारित्र्यहनन बस्स झालं!’ दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरे संतापले

Shivsena Symbol Case : शिंदे गटाचा मोठा दावा; ‘विजयी आमदारांच्या मतांपैकी ७६% मते आमच्याकडे’, सुप्रीम कोर्टात वकिलाचा युक्तिवाद
2

Shivsena Symbol Case : शिंदे गटाचा मोठा दावा; ‘विजयी आमदारांच्या मतांपैकी ७६% मते आमच्याकडे’, सुप्रीम कोर्टात वकिलाचा युक्तिवाद

‘मोदीजींच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाएवढी’; मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंचं भरभरून कौतुक, गुजरातीमधून भाषणाची सुरुवात
3

‘मोदीजींच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाएवढी’; मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंचं भरभरून कौतुक, गुजरातीमधून भाषणाची सुरुवात

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड
4

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.