Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस; हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ जारी, पुढील 4-5 दिवसांत…

रविवार रात्रीपासून दक्षिण कोकणात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची नोंद झाली, तर सावंतवाडी, कुडाळ आणि दोडामार्ग परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 10, 2026 | 07:06 AM
महाराष्ट्रात 25 जूननंतर मान्सून

महाराष्ट्रात 25 जूननंतर मान्सून

Follow Us
Follow Us:

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. उन्हाचा कडाका कमी झाला असून, आता पावसाची चाहूल लागली आहे. त्यातच राज्यात मान्सून दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने ही अधिकृत घोषणा केली आहे. रविवार रात्रीपासून दक्षिण कोकणात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची नोंद झाली, तर सावंतवाडी, कुडाळ आणि दोडामार्ग परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

पुणे जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण असून, हवामान पूर्णपणे बदललेले दिसत आहे. दक्षिण कोकणात मान्सूनचे आगमन साधारणपणे मृग नक्षत्रादरम्यान होते. परंतु यंदा मान्सून दोन दिवस आधीच दाखल झाला आहे. हवामान विभागाने राज्यातील २५ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील चार ते पाच दिवसांत अनेक भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

जायकवाडीची जलपातळी घटल्याने संभाजीनगरच्या २७४० कोटींच्या नवीन पाणी योजनेला मोठा झटका; १२ जूनचा वाढीव पाणीपुरवठा रखडणार?

दरम्यान, येत्या १५ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचा विस्तार पूर्ण होण्याची शक्यता आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, परभणी, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

मराठवाडा, खान्देशात सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता

विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये १५ जूनपर्यंत ढगाळ आकाश, मेघगर्जनेसह पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांची शक्यता आहे. जरी हा पाऊस व्यापक लागवड आणि पेरणीसाठी पुरेसा असण्याची शक्यता असली तरी, सध्या तशी परिस्थिती दिसत नाही.

तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअस

राज्याच्या अनेक भागांमध्ये १२ जूनपर्यंत कमाल तापमान जास्त राहण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि खानदेशमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे, तर मराठवाड्यात ते ३५ ते ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

अनेक राज्यांमध्येही पावसाची शक्यता

देशभरातील अनेक राज्यांमध्ये हवामान बदलले आहे. काही भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा अंदाज आहे, तर इतर ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहू शकते. हवामान विभागाने १० जूनसाठी अनेक राज्यांकरिता सतर्कतेचा इशारा दिला आहे. १० जून रोजी राजधानी दिल्लीत अंशतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. दुपार किंवा संध्याकाळी हलका पाऊस आणि धुळीच्या वादळाची शक्यता आहे.

छ. संभाजीनगरमध्ये मान्सून लांबला; सरासरीच्या केवळ ३६ टक्के पाऊस, शेतकरी चिंतेत; कृषी विभागाचा पेरणीबाबत महत्त्वाचा सल्ला

Web Title: Strong arrival of the monsoon in maharashtra yellow alert issued by the meteorological department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 07:01 AM

Topics:  

  • Heavy Rain
  • Maharashtra Rain
  • Weather Update

संबंधित बातम्या

पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! वसईतील धबधबे, किनारे अन् निसर्ग पर्यटनस्थळांवर बंदी; उल्लंघन केल्यास होणार कडक कारवाई
1

पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! वसईतील धबधबे, किनारे अन् निसर्ग पर्यटनस्थळांवर बंदी; उल्लंघन केल्यास होणार कडक कारवाई

Vasai News : ‘धोकादायक इमारती तातडीने खाली करा…’, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांचा इशारा
2

Vasai News : ‘धोकादायक इमारती तातडीने खाली करा…’, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांचा इशारा

देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस; गुजरातच्या सहा जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट, पुढील काही तासांत…
3

देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस; गुजरातच्या सहा जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट, पुढील काही तासांत…

Maharashtra Rain Alert: राज्यात नुसता धुमाकूळ; तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची तर…, घाट माथ्यावर मुसळधार
4

Maharashtra Rain Alert: राज्यात नुसता धुमाकूळ; तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची तर…, घाट माथ्यावर मुसळधार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.