Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai News : ‘धोकादायक इमारती तातडीने खाली करा…’, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांचा इशारा

भारतीय हवामान विभागाने पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केल्यानंतर वसई-विरार महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी धोकादायक व अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांना तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे. इमारत रिकामी न केल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी इमारत मालक, विकासक, सोसायट्यांवर राहील, असा कडक इशारा दिला.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 26, 2026 | 12:14 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • वसई-विरार शहरात अतिवृष्टी सुरु
  • धोकादायक इमारती तातडीने खाली करा
  • महापालिका आयुक्तांचा इशारा
Vasai News : वसई-विरार शहरात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी धोकादायक व अतिधोकादायक घोषित इमारतींतील रहिवाशांना तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे. इमारत रिकामी न केल्यास, स्ट्रक्चरल ऑडिट न केल्यास किंवा अहवालानुसार दुरुस्ती न केल्यामुळे भविष्यात दुर्घटना घडली तर त्याची संपूर्ण जबाबदारी इमारत मालक, विकासक, सहकारी गृहनिर्माण संस्था, भोगवटादार आणि व्यवस्थापनावर राहील, असा स्पष्ट इशाराही आयुक्तांनी दिला आहे.

Maharashtra Earthquake: महाराष्ट्र हादरलं! नाशिकमध्ये 3.6 तर पालघरमध्ये 3.1 रिश्टर तीव्रतेचा भूकंप, प्रशासन सतर्क, जीवितहानी नाही

वसई-विरार महापालिकेचे आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, भारतीय हवामान विभागाने पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिल्याने शहरात मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि स्थानिक पातळीवर अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत जुन्या, जीर्ण आणि संरचनात्मकदृष्ट्या कमकुवत इमारतींमध्ये असे राहणे जीवितसुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते, महापालिकेने स्पष्ट केले आहे.

दरवर्षी स्ट्रक्चरल ऑडिट गरजेचं

महापालिकेने धोकादायक आणि अतिधोकादायक म्हणून घोषित इमारतींच्या रहिवाशांनी महापालिकेच्या नोटिसा व सूचनांचे काटेकोर पालन करावे, काही इमारतींमध्ये छत, स्लॅब किंवा भिंती कोसळण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. सर्व गृहनिर्माण संस्था, इमारत मालक आणि व्यवस्थापनांनी पात्र संरचनात्मक अभियंत्याकडून दरवर्षी स्ट्रक्चरल ऑडिट करून घेणे गरजेचे आहे. ऑडिट अहवालानुसार आवश्यक दुरुस्ती, मजबुतीकरण आणि प्रतिबंधात्मक उपाय तातडीने करणे बंधनकारक असल्याचेही आयुक्तांनी म्हटले आहे.

धोकादायक इमारतींची लक्षणे अशी

धोकादायक इमारतींची लक्षणेही महापालिकेने नागरिकांसमोर मांडली आहेत. बीम, स्लॅब, स्तंभ किंवा भिंतींना मोठे तडे जाणे, काँक्रीट निखळणे, लोखंडी सळया उघड्‌या दिसणे, इमारत किंवा स्तंभ झुकणे, स्लॅब अथवा प्लास्टर मोठ्या प्रमाणात पडणे, असामान्य आवाज येणे आणि पावसामुळे गळती होऊन संरचनात्मक नुकसान दिसणे ही गंभीर धोक्याची चिन्हे असल्याचे सांगण्यात आले आहे.

नियंत्रण कक्षाशी संपर्क साधा

अशी लक्षणे आढळल्यास तात्काळ तज्ज्ञ संरचनात्मक अभियंत्याचा सल्ला घ्यावा, महापालिकेच्या संबंधित विभागाला माहिती द्यावी आणि गरज पडल्यास इमारत त्वरित रिकामी करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकानी ०२५०-२३३४५४६, ०२५०-२३३४५४७, ८६६९९७६१०१ किंवा ७०५८९१११२५ या नियंत्रण कक्ष क्रमांकांवर संपर्क साधाचा, असेही महापालिकेने कळवले आहे.

Palghar News : सफाळे किनारपट्टीवर प्रकल्पांविरोधात एल्गार! पेट्रोलियम अन् विमानतळाला विरोध; बैठकीत जनआंदोलनाचा निर्धार

Web Title: Vasai virar commissioner warns vacate dangerous buildings due to heavy rains marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 12:13 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • mansoon
  • Marathi News
  • palghar
  • Palghar news
  • vasai
  • Vasai news
  • Vasai Virar

संबंधित बातम्या

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी
1

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी

Chandrapur News: विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानाची प्रतीक्षा; ग्रामपंचायतीला निधी मिळाला, पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नाही
2

Chandrapur News: विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानाची प्रतीक्षा; ग्रामपंचायतीला निधी मिळाला, पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नाही

Raigad News: महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा भव्य शैक्षणिक सोहळा; १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव
3

Raigad News: महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा भव्य शैक्षणिक सोहळा; १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव

Solapur Maratha Protest: आंदोलक २०० फूट उंच पाण्याच्या टाकीवर चढले
4

Solapur Maratha Protest: आंदोलक २०० फूट उंच पाण्याच्या टाकीवर चढले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.