Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident News: घोडबंदरवर १० महिन्यांत १८ जण बळी, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मृत्यू : उच्च न्यायालयाने घेतली गंभीर दखल

विनाहेल्मेट, गाडीचा स्पीड किंवा रस्त्यांवरी खड्डे, अशा अनेक कारणांमुळे रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 03, 2025 | 07:02 PM
घोडबंदरवर १० महिन्यांत १८ जण बळी, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मृत्यू : उच्च न्यायालयाने घेतली गंभीर दखल

घोडबंदरवर १० महिन्यांत १८ जण बळी, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मृत्यू : उच्च न्यायालयाने घेतली गंभीर दखल

Follow Us
Close
Follow Us:
  • घोडबंदरवर १० महिन्यांत १८ जण बळी
  • नेहमीच वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते
  • वाहने तासंनतास रांगेत उभी असतात
मुंबई : ठाणे शहरातील घोडबंदर मार्गावर जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत १८ जणांचा रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे मृत्यू झाल्याची माहिती मंगळवारी उच्च न्यायालयाला देण्यात आली. त्याची न्यायालयाने गंभीर दखल घेतली. तसेच या मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते, वाहने तासंनतास रांगेत उभी असतात, त्यामुळे येथून प्रवास करणे दुःस्वप्न असल्यासारखे असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.

ठाण्यात वर्षभरात खड्चांमुळे रस्ते अपघातात एकही मृत्यू न झाल्याचा महापालिकेचा दाव्यावर बोट ठेवून काही प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार ठाण्यात खड्यांमुळे १८ मृत्यू झाल्याची माहिती याचिकाकर्ते अॅड. रुजू ठक्कर यांनी न्यायालयाला दिली.

11 वर्षात मुंबईकरांच्या वाहन संख्येत भलीमोठी वाढ! एकूण वाहनांची संख्या 53 लाखांच्या घरात

दोषी कंत्राटदारावर कारवाईची मागणी

पीडितांच्या कुटुंबीयाना भरपाई देण्याची मागणी केली, तसेच दुरुस्तीच्या एका महिन्यात खड़े पुन्हा कसे? याची चौकशी करण्याची आणि निकृष्ट कामासाठी दोषी आढळलेल्या कंत्राटदार आणि अधिका-यांवर कठोर शिस्तभंगाची आणि दंडात्मक कारवाई करण्याचीही मागणी केली आहे. त्याची गंभीर दखल घेऊन ही परिस्थिती सुधारण्यासाठी पुढील पावसाळ्याची वाट पाहू नका, असे खडेबोल न्यायालयाने ठाणे पालिकेला सुनावले.

राज्य सरकार, महापालिका, पीडब्ल्यूडीला नोटीसा

ठाणे घोडबंदर आणि गायमुख घाटातील अरूंद रस्त्यामुळे अनेक वर्ष वाहतूककोडींची समस्या कायम आहे. त्यात दिवसेंदिवस भरच घडत चालाली आहे. तरीही ठाणे पालिका याकडे गांभीर्याने का पाहत नाही? असा प्रश्न न्या, रेवती मोहिते-डेरे आणि न्या. संदेश पाटील यांच्या खंडपीठाने उपस्थित केला. यावेळी न्यायमूर्तींना आलेला वैयक्तिक अनुभवही त्यांनी सांगितला.

भाईदरजवळील उतन येथे प्रवास करणे अशक्य असल्याचे न्या. डेरे यांनी नमूद केले. दुसरीकडे, वाण्याला उत्तर मुंबई, वसई विरार, भिवंडी, नाशिक आणि गुजरातशी जोडणारा घोडबंदर रोड हा व्यापार आणि वावसायाच्या दृष्टीकोनातून महत्वाचा दुवा आहे. तरीही त्याकडे, प्रशासनाचे दुर्लक्ष असून ११ तास वाहतूककोंडी होणे हे भयावय असल्याचे मत न्या. पाटील यांनी व्यक्त केले. राज्य सरकार, ठाणे महापालिका (टीएमसी) सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी), मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि वाहतूक पोलिसांना नोटीस बजावली आणि भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देऊन न्यायालयाने सुनावणी १५ डिसेंबरला ठेवली.

आयुषच्या पालकांना भरपाई दोन आठवड्यात

या प्रश्नी गठीत केलेल्या समितीने २८ सप्टेंबरला डोंबिवलीतील उघड्या नाल्यात वाहून गेलेल्या १३ वर्षीय आयुध कदमच्या पालकांना ६ लाख रुपये भरपाई देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केडीएमसीच्या वतीने न्यायालयाला देण्यात आली. येत्या दोन आठवड्‌यात ही रक्कम कुटुंबीयांना देण्यात येईल, तसेच या घटनेसंदर्भात संबंधित अधिका-यांची चौकशीही सुरू असल्याचेही सांगितले.

प्रकरण काय ?

खड्डे आणि रस्त्यांवरील उघड्या मैनहोल्सच्या प्रश्नावर उब्य न्यायालयाने २०१८ मध्ये सविस्तर आदेश दिले असतानाही त्याची अंमलबजावणी आणि रस्त्यांची देखभाल करण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप करून अॅड. रुजू ठक्कर यानी अवमान याचिका केली आहे.

Mumbai News: ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह प्रवास १० मिनिटांत, कसं ते जाणून घ्या…

Web Title: Thane news 18 people died due to potholes on ghodbunder road from january to october 2025 it causes high court taken serious note of this

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 07:02 PM

Topics:  

  • Mumbai
  • thane
  • Traffic

संबंधित बातम्या

नारायण राणेंचा उद्धव ठाकरे यांना थेट निशाणा, मुंबईत ठाकरे बंधूंना यश का मिळाले नाही?
1

नारायण राणेंचा उद्धव ठाकरे यांना थेट निशाणा, मुंबईत ठाकरे बंधूंना यश का मिळाले नाही?

Vasudhaiva Kutumbakam Conclave 4.0: मुंबईत आठवडाभर रंगणार ज्ञानयज्ञ! जैनाचार्य युगभूषणसूरीजींच्या आशीर्वादाने भव्य उद्घाटन
2

Vasudhaiva Kutumbakam Conclave 4.0: मुंबईत आठवडाभर रंगणार ज्ञानयज्ञ! जैनाचार्य युगभूषणसूरीजींच्या आशीर्वादाने भव्य उद्घाटन

MUMBAI : एकनाथ शिंदेंच्या भूमिकेमुळे मुंबईवर महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा झेंडा? -संजय राऊत
3

MUMBAI : एकनाथ शिंदेंच्या भूमिकेमुळे मुंबईवर महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा झेंडा? -संजय राऊत

आर्टिफिशियल इंटेलिजेंस वापरा, पण जबाबदारी विसरू नका! एआय-निर्मित युक्तिवादावर हायकोर्ट संतप्त
4

आर्टिफिशियल इंटेलिजेंस वापरा, पण जबाबदारी विसरू नका! एआय-निर्मित युक्तिवादावर हायकोर्ट संतप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.