मुंबईकरांना हवामान विभागाचा हाय अलर्ट (foto- istockphoto)
मुंबई: गेले काही दिवस अवकाळी पावसाने राज्यभरात धुमाकूळ घातला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यातच आता हवामान विभागाने मुंबईकरांना महत्वाचा इशारा दिला आहे. मुंबईकरांसाठी ही बातमी महत्वाची असणार आहे. हवामान विभागाने मुंबईला हाय अलर्ट दिला आहे.
आज मुंबईत समुद्राला मोठी भरती येण्याची शक्यता आहे. समुद्राला येणाऱ्या भरतीमुळे मुंबईकरांना समुद्राचे रौद्रस्वरूप पाहायला मिळण्याचा अंदाज आहे. समुद्रात मोठ्या मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. समुद्राला भरती आल्याने चार ते पाच मीटर उंच लाटा उसळण्याचा अंदाज आहे. आज दहा वाजण्याच्या सुमारास समुद्राला उधाण येण्याचा अंदाज आहे.
मुंबई महानगरपालिकेने या कालावधीत समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये असे आवाहन नागरिकांना केले आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईला पावसाने झोडपून काढले आहे. आज पुन्हा एकदा मुंबईला अति ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोकण आणि गोवा किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे कोकणात आणि अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. पुढील काही तासांमध्ये कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होणार आहे. पुढील ३६ तासांमध्ये अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकणातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मान्सून येत्या दोन दिवसात केरळात
महाराष्ट्रात मान्सून पूर्व पावसाने थैमान घातलं असून नदी नाल्यांना मे महिन्यातच वाहू लागले आहेत. दरम्यान अरबी समुद्रात रेंगाळलेल्या मान्सूच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार झालं असून येत्या २ दिवसात केरळात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मान्सूनची अशीच प्रगती सुरू राहिली तर १ जून पर्यंत मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून दरवर्षी 1 जूनला केरळमध्ये दाखल होत असतो, मात्र यंदा तब्बल 8 दिवस आधीच दाखल होणार आहे.
Monsoon Update : खुशखबर! मान्सून येत्या दोन दिवसात केरळात, मुंबईत 1 जूनलाच धडकणार
दरम्यान राज्यात मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला आहे. जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली असून शेतमालाचं मोठं नुकसान झालं आहे. आणखी काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यातच मान्सूनच्या प्रगतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पुढील 2-3 दिवसांमध्ये मान्सून दक्षिण अरबी समुद्रात आणखी प्रगती करेल. मालदीव आणि कोमोरिनचा उरलेला भागही व्यापेल आणि लक्षद्वीप, केरळ, तमिळनाडू आणि ईशान्यकडील राज्यांमधील काही भागात धडक देईल.