'या' लाडक्या बहिणींचा लाभ बंद होणार नाही...; राज्य सरकारचा मोठा निर्णय
Ladki Bahin Yojna News: राज्यसरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेत सातत्याने वेगवेगळे बदल आणि नियम-अटींचा समावेश केला जात आहे. जुलै महिन्याच्या हफ्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अडीच लाख रुपयांच्या आत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेली राज्य सरकारची ‘लाडकी बहीण’ ही महत्त्वाकांक्षी योजना थांबवण्याचा विचार सध्या सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.
या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा केले जातात. मात्र, आता सरकार या योजनेबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवरच हा निर्णय घेतला जाणार असल्याची चर्चा आहे. हा निर्णय झाल्यास हजारो महिलांना मोठा आर्थिक धक्का बसू शकतो. या संदर्भात राज्य सरकारने कोणतीह अधिकृत घोषणा केलेली नसली तरीही या संभाव्य निर्णयामुळे लाडकी बहिण योजना पुढे सुरू राहणार की बंद होणार, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
राज्य सरकारची महिलांसाठी सुरू केलेली महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजना सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीत गंभीर अनियमितता समोर आली असून, योजनेचे निकष न पाळता अनेक अपात्र लाभार्थ्यांनी मदत घेतल्याचं उघडकीस आलं आहे. या योजनेअंतर्गत अडीच लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांना दर महिन्याला २,००० रुपयांची थेट आर्थिक मदत दिली जाते. मात्र, जेव्हा योजना सुरू करण्यात आली, तेव्हा काही स्पष्ट निकष ठरवण्यात आले होते, उदा. ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांना वगळण्यात यावं आणि सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना अपात्र ठरवावं.
मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार, या निकषांचे उल्लंघन झाले असून, ६५ वर्षांहून अधिक वयाच्या महिला, सरकारी नोकरीतील महिला आणि अर्हता नसलेल्या अनेक जणांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं उघड झालं आहे. विशेष म्हणजे, ही योजना केवळ महिलांसाठी असतानाही १४,००० पुरुषांनीही लाभ घेतल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. ही माहिती उघड झाल्यानंतर संबंधित यंत्रणांमध्ये खळबळ माजली असून, सरकारकडून या गैरव्यवहाराची चौकशी आणि कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवरच सरकार या योजनेबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचंही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
दादरचा कबूतरखाना वादाच्या भोवऱ्यात! अगदी शेकडो वर्षांपूर्वी आहे ते कबूतरांचे खाद्यस्थान
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेत अनधिकृतरीत्या लाभ घेतलेल्या महिलांची यादी तयार केली जात असून, संबंधितांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना पुढील १५ दिवसांच्या आत संबंधित लाभार्थींच्या खात्यांची माहिती मागवली आहे. यामध्ये ज्या महिला नियमबाह्य लाभ घेताना आढळतील, त्यांच्याकडून मिळालेली संपूर्ण रक्कम वसूल केली जाणार आहे, असेही सूत्रांनी सांगितले. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी खोटे दस्तऐवज सादर करणे, पात्रतेचे निकष न पाळणे यासारख्या प्रकारांमुळे ही कारवाई केली जात आहे. त्यामुळे आता अनेक महिलांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.