गेल्यामहिन्यात रिक्षाचे भाडेवाढ झाली आहे, रिक्षाचे भाडे हे २१ रुपये होते तर आता ते २३ रूपये झाले आहे. रिक्षाच्या भाडे वाढी बरोबर आते टॅक्सीचे देखील भाडेवाढ करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने शहरातील विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत टर्मिनल्सवरून चालवल्या जाणाऱ्या प्रीपेड टॅक्सीच्या भाड्यात वाढ केली आहे. मुंबई रस्ते वाहतुक विभागाकडून या संबंधित माहिती देण्यात आली आहे. एमएमआरटीएने २००० बसेससाठी स्टेज कॅरेजला मंजूरी दिली आहे. ज्यामुळे बेस्ट अधिक बस चालवण्यास प्रणामी प्रवाशांना उत्तम सुवाधा देण्याचा प्रशासनाचा मानस आहे. तसेच मुंबई वाहतुक विभागाकडून मुंबई महानगर परिसरात ९२ नवीन टॅक्सी आणि ऑटोरिक्षा स्टँडलाही मान्यता दिलेली आहे.
आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय टर्मिनल्सचे किमान भाडे १२७ रुपये तर डोमेस्टीक टर्मिनल्सचे किमान ८५ रुपये होते. सुधारित भाडेवाढीनुसार ६ किमीपर्यंत प्रीपेड टॅक्सीचे सुधारित किमान भाडे आंतरराष्ट्रीय टर्मिनलपासून १४० रुपये असेल, तर डोमेस्टीक टर्मिनलपासून ४ किमीपर्यंतचे किमान भाडे ९३ रुपये असेल. तरी तुम्ही मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळासह डोमेस्टीक विमानतळावरुन प्रवास करायचा प्लॉन करत असाल तर हो ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण वाहतुक विभागाच्या भाडेवाढीच्या निर्णयानंतर मुंबईकरांच्या खिशाला आणखीच कात्री बसणार आहे.