बारामती : बारामती शहरातील जामदार रोड परिसरात शनिवारी (दि.१३) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास एका सदनिकेमध्ये पती-पत्नीचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे .
बारामतीमधील जामदार रस्त्यावरील खत्री-पवार पार्क येथील घटना
सचिन महालिंग वाघोलीकर (वय ५०) व त्यांच्या पत्नी सारिका (वय ४२) नाव असून घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत. शहरातील जामदार रस्त्यावरील खत्री-पवार पार्कमधील सदनिका क्रमांक १०२ मध्ये ही घटना उघडकीस आली.
आई-वडिलांचे मृतदेह पाहून मुलांनी फोडला हंबरडा
वाघोलीकर यांना दोन मुले व एक मुलगी आहे, त्यांची मुले शनिवारमुळे कन्हेरी येथे मारुती मंदिरात दर्शनासाठी गेली होती. ती परत आली असता सदनिकेला बाहेरून कडी असल्याचे दिसून आले. त्यांनी कडी काढून आतमध्ये प्रवेश केला असता बेडरूममधील कपाट व दुसऱ्या खोलीतील डबे अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. तर किचनमध्ये वाघोलीकर दाम्पत्याचे रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आले. आपल्या आई-वडिलांचे मृतदेह पाहून मुलांनी हंबरडा फोडला. यावेळी नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
स्थानिक नागरिकांनी बारामती शहर पोलिसांना फोनवरून या घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड व पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी भेट देऊन घटनेची सविस्तर माहिती घेतली.
भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ
भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून चोरीच्या उद्देशाने हा खून करण्यात आला की घातपात आहे. याबद्दल विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ऐन उन्हाळ्यात बारामतीमध्ये ही गंभीर घटना घडल्याने संपूर्ण बारामती परिसर हादरला आहे.
भरदिवसा घडलेल्या घटनेने विविध तर्क वितर्काना उधाण
भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती .चोरीच्या उद्देशाने हा खून करण्यात आला की घातपात आहे, याबद्दल विविध तर्क वितर्काना उधाण आले आहे. ऐन उन्हाळ्यात बारामती मध्ये ही गंभीर घटना घडल्याने संपूर्ण बारामती परिसर हादरला आहे.आज दि १३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १०.४५ ते १२.३० वा सुमारास वघोलीकर दांपत्याला मुले घरातून बाहेर गेल्याचा फायदा घेवून पाळत ठेवून घरात घुसून एका अज्ञात इसमाने त्या नवरा बायकोचा खुन केल्याचे निष्पन्न माहिती बारामती शहर पोलीस स्टेशनला मिळताच तपासाची सूत्रे हलवली.