Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis: ‘२०२९ पूर्वी फडणवीसांनी पंतप्रधान व्हावं’; विजय वडेट्टीवारांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण

Devendra Fadnavis: पंतप्रधान व्हावे आणि देशाला मराठी पंतप्रधान मिळावा, अशी आपली इच्छा असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. यासोबतच खुले तेल विक्री, आरक्षण, जातनिहाय जनगणना, आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न, विद्यार्थी आंदोलन आणि रामदास आठवले यांच्या टीकेवरही त्यांनी भाष्य केले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 25, 2026 | 12:41 PM
“२०२९ पूर्वी फडणवीसांनी पंतप्रधान व्हावं”; विजय वडेट्टीवारांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण

“२०२९ पूर्वी फडणवीसांनी पंतप्रधान व्हावं”; विजय वडेट्टीवारांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण

Follow Us
Follow Us:
  • “२०२९ नंतर फडणवीसांना संधी मिळणार नाही”
  • विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण
  • काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची इच्छा
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय भवितव्याबाबत केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. “देवेंद्र फडणवीस यांनी २०२९ पूर्वी पंतप्रधान व्हावे. देशाचा पंतप्रधान मराठी माणूस व्हावा, अशी आमची इच्छा आहे,” असे वडेट्टीवार यांनी इच्छा व्यक्त केली. याचबरोबर त्यांनी खुले तेल विक्रीचा मुद्दा, आरक्षण, जातनिहाय जनगणना, आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केले.

“२०२९ पूर्वी फडणवीसांनी पंतप्रधान व्हावे”

देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपमधील जबाबदारीबाबत बोलताना वडेट्टीवार यांनी सांगितले की, फडणवीस मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांची भाजपच्या वरिष्ठ समितीत नियुक्ती करण्यात आली असावी. कोणाला कोणत्या पदावर किंवा समितीत घ्यायचे हा भाजपचा अंतर्गत प्रश्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘मोदी सरकारने संपूर्ण पिढीचे भविष्य धोक्यात आणले’; मल्लिकार्जुन खर्गेंची टीका

मात्र, यानंतर त्यांनी फडणवीसांबाबत महत्त्वाचे विधान केले. “आमची इच्छा आहे की देवेंद्र फडणवीस यांनी २०२९ पूर्वी पंतप्रधान व्हावे. त्यानंतर त्यांना संधी मिळणार नाही. पंतप्रधान मराठी माणूस व्हावा, अशी आमची इच्छा आहे. भाजप त्यांना किती काळ थांबवणार किंवा पुढे नेणार, हे पाहायला मिळेल,” असे वडेट्टीवार म्हणाले.

खुले तेल विक्रीच्या निर्णयावर भाष्य

खुले खाद्यतेल विक्रीबाबतच्या निर्णयावरही वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली. खुले तेल विक्रीवरील बंदीचा निर्णय चुकीचा होता आणि तो रद्द करण्यात येत असेल तर त्याचे स्वागत असल्याचे त्यांनी सांगितले. तुकाराम मुंढे यांनी घेतलेला हा निर्णय मंत्रिमंडळाने रद्द केल्यास तो चांगला निर्णय ठरेल, असे सांगतानाच आपण यासंदर्भात यापूर्वीही मागणी केली होती, असा दावा वडेट्टीवार यांनी केला.

खुले तेल विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय तेली समाजावर अन्याय करणारा होता. गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिक त्यांच्या आर्थिक गरजेनुसार खुले तेल खरेदी करतात. जनतेतून झालेला विरोध लक्षात घेऊन हा निर्णय रद्द करण्यात आला असावा, असेही त्यांनी म्हटले.

जरांगे यांच्या मागण्यांवर काय म्हणाले?

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या मागण्यांसंदर्भात वडेट्टीवार यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. सरकार जरांगे यांच्या मागण्यांवर काय निर्णय घेते, कोणता मंत्री त्यांच्याकडे जातो किंवा कोण जात नाही, याच्याशी आपले देणेघेणे नसल्याचे ते म्हणाले. “आमची भूमिका स्पष्ट आहे. जातनिहाय जनगणना करा आणि आमच्या वाट्याचे आम्हाला द्या,” असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

काही नोंदी किंवा प्रमाणपत्रे बोगस असतील तर ती न्यायालयात टिकणार नाहीत. संविधान आणि न्यायाच्या चौकटीत बसणारे निर्णयच टिकतील. केवळ कोणीतरी मागणी केली म्हणून घेतलेला निर्णय कायदेशीर कसोटीवर टिकेलच असे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधींचे पत्र

आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून राहुल गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याची माहितीही वडेट्टीवार यांनी दिली. एका कार्यक्रमाच्या मंचावर आलेल्या आदिवासी विद्यार्थिनीने मराठीतून आपल्या समस्या मांडल्या. तिच्या वक्तव्यातून आदिवासी विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, हे समोर आल्याचे वडेट्टीवार म्हणाले. आदिवासी विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी-सुविधांपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. विशेषतः आदिवासी विद्यार्थिनींबाबत अविश्वास दाखवला जात असल्याचे गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचे ते म्हणाले.

या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून मुख्यमंत्री या विषयाला प्राधान्य देतील आणि आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवतील, अशी अपेक्षा वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

विद्यार्थी आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सुरू असलेल्या आंदोलनाबाबत वडेट्टीवार यांनी काँग्रेसची भूमिका मांडली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्यांना काँग्रेसने विरोध केलेला नाही आणि राहुल गांधी तरुणांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्यांसोबत उभे राहण्याची भूमिका राहुल गांधी यांनी घेतली आहे. त्यामुळे अशा आंदोलनांना प्रतिसाद मिळत असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. राहुल गांधी यांनी नागपूरमधील विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमासाठी होकार दिला आहे. मात्र कार्यक्रमाची तारीख अद्याप निश्चित झालेली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

राजनाथ सिंहांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया

आरक्षण संपणार नसल्याच्या केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावरही वडेट्टीवार यांनी भाष्य केले. “राजनाथ सिंह बरोबर बोलले की आरक्षण संपणार नाही. मात्र त्यांचा इशारा नेमका कोणाला होता, हे त्यांनी सांगावे,” असे ते म्हणाले. भाजपमधीलच काही नेते आरक्षणाबाबत वेगवेगळी विधाने करतात. त्यामुळे भाजपची भूमिका विरोधाभासी असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

रामदास आठवलेंवर टीकास्त्र

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेलाही वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिले. आठवले यांना त्यांच्या राजकीय आघाडीत एका नगरसेवकाची जागाही मिळत नसल्याचा टोला त्यांनी लगावला. “जिथे खुर्ची मिळते तिथे ते पळतात. ते काँग्रेसला काय सांगणार?” अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी आठवले यांच्यावर टीका केली.

एकाचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान व्हावे अशी इच्छा व्यक्त करताना दुसरीकडे भाजपच्या आरक्षणविषयक भूमिकेवर टीका केल्याने विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याची राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा होण्याची शक्यता आहे.

BMC आयुक्त अश्विनी भिडें यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट नाकारल्याचा दावा; आयुक्तांच्या भूमिकेवर वंचित आक्रमक

Web Title: Vijay wadettiwar wants devendra fadnavis to become prime minister before 2029 maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 12:40 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Maharashtra Politics
  • Vijay wadettiwar

संबंधित बातम्या

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट
1

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट

Maharashtra Live Breaking News in Marathi: मंगेश चिवटेंची पुणे शिक्षक मतदारसंघातून माघार
2

Maharashtra Live Breaking News in Marathi: मंगेश चिवटेंची पुणे शिक्षक मतदारसंघातून माघार

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान
3

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
4

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.