Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : पीक काढणीच्या तोंडावर अवकाळी; बळीराजा हवालदिल

पाऊस प्रामुख्याने कर्नाटक व तेलंगणा सीमेलगत असलेल्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील सीमावर्ती भागांमध्ये राहण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामातील पिक काढणीच्या तोंडावर पावसाचे संकट उभे राहिले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 28, 2026 | 06:21 PM
Nagpur News : पीक काढणीच्या तोंडावर अवकाळी; बळीराजा हवालदिल
Follow Us
Follow Us:
  • पीक काढणीच्या तोंडावर अवकाळी;
  • बळीराजा हवालदिल
नागपूर, राज्यातील काही भागात सध्या अंशतः आभाळी हवामान असून ही स्थिती या आठवड्यात कायम राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या दक्षिण भागांमध्ये दुपारनंतर स्थानिक स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो. हा पाऊस प्रामुख्याने कर्नाटक व तेलंगणा सीमेलगत असलेल्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील सीमावर्ती भागांमध्ये राहण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामातील पिक काढणीच्या तोंडावर पावसाचे संकट उभे राहिले आहे.

30 व 31 मार्च 2026 दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर ढगाळ हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते. उर्वरित विदर्भात देखील हवामानात बदल दिसू शकतो. या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता नाकारता येत नाही. काही दिवसांपासून हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. काही भागात कडाक्याची उष्णता आहे तर काही ठिकाणी पाऊस सुरू आहे. शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजांकडे लक्ष ठेवावे व त्यानुसार शेतीची कामे नियोजित करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

जंगलाच्या जिल्ह्यात बांबूचा तुटवडा! आदिवासी कारागीर हवालदिल; कच्च्या मालाअभावी पारंपरिक उद्योग ठप्प

नुकसानीचे पंचनामे
सरकारकडून सध्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. रब्बीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाचा अत्यंत मोठा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पाऊस कायम राहणार आहे. मार्च महिना संपत आला आहे, तरीही पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. आजही राज्यातील काही जिल्हह्यामध्ये पाऊस राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

गेल्या आठवड्यातच कोल्हापूरमध्ये देखील अवकाळी पावसाने सुरुवात केली. कोल्हापूर, सातारा सांगली पट्ट्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. गेल्या दोन दिवसांपासून साताऱ्यात सायंकाळच्या सुमारास अचानक हवामानात मोठा बदल होत असून वातावरणात गारवा निर्माण होत आहे. विशेषतः महाबळेश्वर आणि जावळी तालुक्यातील कुडाळ, मेढा, करहर, पाचगणी, रुईघर, म्हसवे, सरताळे, सर्जापूर, बेलावडे, सोनगाव आणि आलेवाडी या परिसरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. काही भागांत विजांचा कडकडाट इतका तीव्र होता की नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

ऐन मार्चअखेरीस नागपुरात पावसाची हजेरी; 1 एप्रिलपर्यंत ढगाळ-उन्हाळी वातावरण कायम

Web Title: Nagpur news untimely harvest on the eve of harvest baliraja is in trouble

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 06:21 PM

Topics:  

  • Mansoon session
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.