Photo Credit- Social Media 'नागपूर दंगल फडणवीस पुरस्कृत', मनोज जरांगेंचा थेट आरोप
जालना: निवडणुका जवळ आल्या की मुद्दाम वाद उकरून काढले जातात, त्यामुळे समाजाने जागरूक राहणे आवश्यक आहे. हे सगळे राजकीय डावपेच आहेत. कबर येथे आणि वाद निर्माण होतो आणि नागपूरला त्याचा हिंसक परिणाम दिसतो? राज्यात यांचेच सरकार असून तेच आर्थिक सहाय्यही करतात, मग ही समस्या स्वतःच का सोडवत नाहीत?’असा सवाल मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी उपस्थित केला आहे.
तसेच, मुस्लिम समाजाचे कबरींवर विशेष प्रेम असावे, अशी अपेक्षा का ठेवली जाते? ही दंगल सरकार, फडणवीस पुरस्कृत आहे. यांना तो कोरटकर, सोलापूरकर दिसत नाही का? तिथं हिंदुत्व जागत का नाही? असा आरोपही त्यांनी केला आहे. कोरटकर आणि सोलापूरकर यांच्याकडे यांचे लक्ष का जात नाही? तिथे हिंदुत्व का जागृत होत नाही? अशा प्रश्नांची सरबत्ती करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर तीव्र टीका केली.
Uddhav Thackeray : संरक्षण पुरवणाऱ्यांचा औरंगजेब कोण लागतो?, कबरीवरून उद्धव ठाकरे कडाडले
नागपूरच्या महाल आणि हंसापुरी भागात सोमवारी झालेल्या हिंसाचारामुळे नागपूरसह राज्यातही तणावाचे वातावरण तयार झाले आहे. यावरून त्यांनी राज्यातील फडणवीस सरकारवर निशाणा साधल आहे. वेरूळ येथे मालोजी राजांची गढी आहे, तिथे आज शहाजीराजे भोसले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी शहाजीराजे भोसले यांना मानवंदना अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाला मनोज जरांगे पाटील आणि इतर नेते उपस्थित होते. यावेळी त्यांनी नागपूरमधील हिंसाचाराच्या घटनेवर भाष्य करत सरकारवर टीका केली.
मनोज जरांगे म्हणाले, “निवडणुका जवळ आल्या की मुद्दाम असे वाद निर्माण केले जातात. पण संरक्षणही तुम्हीच करता, मग मग मूर्ख कोण? माझ्या मताला काही किंमत आहे का? सरकारचे लोक ‘कबर हटवा’ असे म्हणतात, पण त्यामुळे गोरगरिबांना अडचणीत टाकले जाते. मराठा आरक्षण दिले गेले नाही, सरकारने आश्वासन दिले तरी ते पूर्ण होत नाही. तसेच, मुस्लिम जनतेला मी आवाहन करतो की, कबरींवर प्रेम नका करू. सरकार तुमचे आहे, जर कबर हटवायची असेल, तर ती काढा, पण गोरगरिबांना यात अडकवू नका,” असही मनोज जरांगे यांनी म्हटले म्हणाले. तेलंगणाने ४२ टक्के ओबीसी आरक्षण दिले, पण महाराष्ट्रात तसे होणार नाही. फडणवीस असे कधीच करणार नाहीत. त्यामुळे लोकांनी शांत राहावे, आपले रोजगार टिकवावे, आणि दंगली टाळाव्यात, असे आवाहनही त्यांनी केलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या औरंगजेबाच्या कबर वादाला हिंसक वळण लागले आहे. सोमवारी (17 मार्च) संध्याकाळी नागपूरच्या महाल परिसरात दोन गटांमध्ये हिंसक हाणामारी झाली. दोन्ही बाजू एकमेकांवर दगडफेक करताना, परिसरात आग लावताना आणि वाहनांची तोडफोड करताना दिसले. एवढेच नाही तर काही लोकांनी पोलिस पथकावरही हल्ला केला. या हल्ल्यात एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यासह अनेक पोलिस जखमी झाले. नागपूरचे उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर जमावाने कुऱ्हाडीने हल्ला केल्याचा आरोप आहे. यामुळे त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आणि त्याचे फोटोही समोर आले आहेत.