Photo Credit- Social Media नागपूर हिंंसाचार 'नियोजनबद्ध कट'; पोलीस तपासात मोठी माहिती उघड
नागपूर : नागपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य सूत्रधार एमडीपी पक्षाचा शहराध्यक्ष फाईम खान याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच, एमडीपी पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर आणि युट्यूबर मोहम्मद शेहजाद खान यांनाही बेड्या ठोकण्यात आल्या असून, त्यांची चौकशी सुरू आहे. या घटनेच्या पोलिस तपासातून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. नागपुरात सोमवारी उफाळलेला हिंसाचार हा नियोजनबद्ध कट असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पोलीस आणखी काही संशयितांची चौकशी करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार,नागपूर हिंसाचार प्रकरणी फाईम खान याच्यासह एमडीपी पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर आणि युट्यूबर मोहम्मद शेहजाद खान यांनाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे. पोलिस तपासात या हिंसाचाराचा नियोजनबद्ध कट असल्याचे स्पष्ट झाले असून, आणखी काही संशयितांची चौकशी केली जात आहे.
World Water Day 2025 : ‘पाणी हेच जीवन!’ वाचा कसे करू शकतो मानव ‘या’ जलसंकटाचा सामना?
नागपूरमधील महाल आणि हंसापुरी या भागात सोमवारी (17 मार्च) रात्री मोठा हिंसाचार झाला. या हिंसाचाराचे नियोजन सोमवारी सकाळीच झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. हमीद इंजिनियरने सोशल मीडियाच्या माध्यमातून मुजाहिद्दीनसाठी आणि युद्धग्रस्त गाझा भागातील नागरिकांसाठी देणग्या गोळा करत असल्याचे आवाहन केले होते. यासंबंधीचे काही पुरावेही सायबर पोलिसांच्या हाती लागले आहेत.
दुसरीकडे, नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाईंड फहिम खान सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्याने सत्र न्यायालयात जामीनसाठी अर्ज केला आहे. फहिम खानला अटक केल्यानंतर त्याची प्रकृती खराब झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर फहिम खानला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं होतं. फहिम खान याने सत्र न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. यावर सोमवारी (24 मार्च) सुनावणी होईल.
पोटातील आतडयांना सूज आल्यानंतर शरीरात दिसू लागतात ‘ही’ भयानक लक्षणे, घरगुती उपाय करून घ्या आरोग्याची
राज्य सरकारकडून या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहरात तणावाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहेत. सोशल मीडियावर अफवा पसरणार नाहीत, यासाठी सायबर सेल सतर्क असून, काही खात्यांवर कारवाई करण्यात आली आहे. हिंसाचारानंतर नागपूरमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
काही भागांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे, जेणेकरून अफवा आणि चुकीची माहिती पसरू नये. पोलिसांचे म्हणणे आहे की, आणखी काही जणांचा या कटात समावेश असू शकतो आणि पुढील अटक लवकरच होण्याची शक्यता आहे. ही घटना नागपूरसारख्या मोठ्या शहरात घडल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे, आणि या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.