ओबीसींचे आरक्षण घटणार नाही
नागपूर: नागपूर हिट अँड रन प्रकरणात रोनित आणि अर्जुन यांच्या रक्त तपासणी अहवालात अल्कोहोल आढळून आले. पण या अपघातावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे हादेखील सामील होता. पण बावनकुळे आपल्या मुलाला वाचववण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहेत. या आरोपांना बावनकुळेंनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले आहे.
या प्रकरणात पोलीस चौकशीवर कोणताही दबाव टाकला जाणार नाही. मी कधीही पोलिसांना फोन केला नाही, फक्त एकदा माहिती घेतली होती. त्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री मुंबईत होते. पण मी त्यांनाही काहीसुद्धा बोललो नाही. ज्यांची चूक असेल त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. यानंतर सामाजित आणि राजकीय जीवनात राहणाऱ्या परिवारांनी कुठल्याही प्रकारची घटना मान्य केली जाणार नाही. आता फक्त एकच प्रश्न आहे. मग तो मुलगा कुणाचाही असो, आता फक्त आता एकच भाग तो म्हणजे गाडी चालवणारा कोण होता आणि गाडीत बसणाऱ्यांवर कोणता गुन्हा लावायचा? याचा तपास पोलीस करतील. गाडी चालवणारे कोण आणि गाडीत बाजूला बसणारे कोण हे लक्षात आले आहे. अशी भूमिका बावनकुळे यांनी मांडली.
हेही वाचा: विनेश फोगाटच्या विरोधात ‘लेडी खली’ने शड्डू ठोकले; कोण आहे कविता दलाल?
यावेळी चंद्रशेखर बानकुळेंनीभाजप आमदार नितेश राणे यांच्याकडून सुरू असलेल्या चिथावणीखोर वक्तव्यांवरही प्रतिक्रिया दिली. नितेश राणे यांच्या म्हणण्याप्रमाणे भारतातील अनेक भागात मुस्लिम समाज एकत्र राहतात. बांगलादेशातील घटनेचा आधारे काहीजण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कापून टाकण्याचे व्हिडीओ व्हायरल करत आहेत. त्यावरून नितेश राणे बोलत असावेत. पण आपण त्यावर विचार केला पाहिजे. हे आपल्याला मान्य नाही. नितेश राणेंचे विधानस सरळ आहे.आम्ही हिंदूविरोधी आणि देशाच्या विरोधात वागणाऱ्यांच्या विरोधात होत. असेही बावनकुळेंनी स्पष्ट केले.
हेही वाचा: अजित पवारांना शरद पवार गटात नो एन्ट्री, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याचे वक्तव्य