Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pratap Sarnaik : “हिंगणा बसस्थानकावरील अतिक्रमण तातडीने हटवा,” प्रताप सरनाईक यांचे निर्देश

हिंगणा येथील नवीन बस स्थानकाचे बांधकाम सुरू असून तेथे जुन्या जागा मालकाकडून बेकायदेशीर अतिक्रमण करण्याचा प्रकार घडला होता. याबाबत एसटी महामंडळाने पोलिसांच्याकडे तक्रार केली होती.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 09, 2025 | 06:34 PM
"हिंगणा बसस्थानकावरील अतिक्रमण तातडीने हटवा," प्रताप सरनाईक यांचे निर्देश

"हिंगणा बसस्थानकावरील अतिक्रमण तातडीने हटवा," प्रताप सरनाईक यांचे निर्देश

Follow Us
Close
Follow Us:
  • हिंगणा बस स्थानकाच्या जागेवर खाजगी मालकाने अतिक्रमण
  • अतिक्रमण बेकायदेशीर असून ते तातडीने काढून टाकावे असे निर्देश
  • बेकायदेशीर अतिक्रमण करण्याचा प्रकार घडला होता.
नागपूर : नागपूर विभागातील हिंगणा बस स्थानकाच्या जागेवर खाजगी मालकाने अतिक्रमण केले आहे. सदर अतिक्रमण बेकायदेशीर असून ते तातडीने काढून टाकावे असे निर्देश संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले. हिंगणा बसस्थानकाच्या पाहणी दौऱ्याच्या वेळी बोलत होते.

हिंगणा येथील नवीन बस स्थानकाचे बांधकाम सुरू असून तेथे जुन्या जागा मालकाकडून बेकायदेशीर अतिक्रमण करण्याचा प्रकार घडला होता. याबाबत एसटी महामंडळाने पोलिसांच्याकडे तक्रार केली होती. तथापि पोलिसांनी त्याला दाद दिली नाही. साधी तक्रारही नोंदवली नाही. अधिवेशन काळामध्ये एसटीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्याकडे तक्रार केली असता , या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून मंत्री सरनाईक यांनी संबंधित जिल्हा उपनिबंधक यांना तातडीने मोजणी करून ज्याचे अतिक्रमण झाले आहे.

Pratap sarnaik : “…फक्त देखावा नको ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”, प्रताप सरनाईक यांची गणेशपेठ बसस्थानकाला अचानक भेट

ते हटवून मूळ मालकास म्हणजे एस टी महामंडळाला ती जागा परत करण्याचे निर्देश दिले. तथापि मोजणी दरम्यान सदर जागेवर मुळ मालकाचा हक्क असल्यास त्यानुसार ती जागा अधिकृतपणे त्याला हस्तांतरित करण्याचे देखील निर्देश एसटी महामंडळाला दिले. परंतु शासकीय जागा आहे, त्याला कुणी वाली नाही म्हणून त्यावर बेकायदेशीर रित्या कोणी अतिक्रमण करत असेल तर ते कदापि सहन केले जाणार नाही. असा सज्जड दम यावेळी त्यांनी दिला.

बेकायदेशीर जमीन बळकावली

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) नागपूर विभागाअंतर्गत येणाऱ्या हिंगणा बसस्थानकाच्या प्रस्तावित जागेवरून गंभीर वाद निर्माण झाला होता, हिंगणा येथील सर्व्हे क्रमांक २१० क, २१० अ व २२२ या एकूण १.७४ हेक्टर (सुमारे ४.३१ एकर) क्षेत्रावर नवीन बसस्थानक उभारण्याचे काम सुरू आहे. या जमिनीचे मुळ मालक म्हणून  फुलाबाई भगवान कोटुगळे,  स्वाती सुचेत बोडे आणि  पांडुरंग राधा तुकारे यांची नोंद आहे. संबंधित जमिनीपोटी कोट्यवधी रुपयांचा मोबदला एसटी महामंडळाने संबंधितांना देण्यात आला आहे. त्यांच्याकडून सदर जमीन विकत घेऊन ती बस स्थानकाच्या बांधकामासाठी विकसित करण्यात येत आहे.

मात्र, त्यापैकी एका मुळ जमीन मालकाच्या वारसाने एसटीच्या अधिकृत जमिनीवर बेकायदेशीर रित्या कुंपण उभारणीचा प्रयत्न झाल्यानंतर प्रकरण अधिकच चिघळले. भूमी अभिलेख कार्यालयामार्फत पुनर्मोजणीसाठी तारखा निश्चित करण्यात आल्या असून, पुढील निर्णय मोजणी अहवाल आल्यानंतर घेण्यात येणार आहे.

मराठी-कन्नड वाद चिघळणार? कर्नाटकात मराठीची गळचेपी! नेत्यांची धरपकड, ST सेवाही बंद अन्…

Web Title: Immediately remove the encroachment at hingna bus stop instructed pratap sarnaik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 06:34 PM

Topics:  

  • msrtc
  • pratap sarnaik
  • st bus

संबंधित बातम्या

हे तर आठवे आश्चर्य! ‘या’ बसस्टँडमध्ये रहस्यमयरित्या झिरपतेय पाणी; परिसरात दलदल अन्…
1

हे तर आठवे आश्चर्य! ‘या’ बसस्टँडमध्ये रहस्यमयरित्या झिरपतेय पाणी; परिसरात दलदल अन्…

Pratap sarnaik : “…फक्त देखावा नको ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”, प्रताप सरनाईक यांची गणेशपेठ बसस्थानकाला अचानक भेट
2

Pratap sarnaik : “…फक्त देखावा नको ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”, प्रताप सरनाईक यांची गणेशपेठ बसस्थानकाला अचानक भेट

मराठी-कन्नड वाद चिघळणार? कर्नाटकात मराठीची गळचेपी! नेत्यांची धरपकड, ST सेवाही बंद अन्…
3

मराठी-कन्नड वाद चिघळणार? कर्नाटकात मराठीची गळचेपी! नेत्यांची धरपकड, ST सेवाही बंद अन्…

महाराष्ट्र फिरायचाय? मग ‘लालपरी’ आहे ना! आवडेल तिथे प्रवास योजना स्वस्त; पास रक्कम वाचून…
4

महाराष्ट्र फिरायचाय? मग ‘लालपरी’ आहे ना! आवडेल तिथे प्रवास योजना स्वस्त; पास रक्कम वाचून…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.