महाराष्ट्र कर्नाटक वाद पेटला (प्रातिनिधिक फोटो- सोशल मीडिया)
महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटला
दोन्ही राज्यांमध्ये एसटी सेवा तूर्तास बंद
मराठी एकीकरण समितीच्या नेत्यांना अटक
Maharashtra Karnataka Dispute: महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद हा प्रश्न कायमच चर्चेत असणारा प्रश्न आहे. सीमावादाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. कर्नाटकमध्ये (Karnataka)आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाला सीमाभागातील मराठी भाषिकांनी विरोध केला. दरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सीमावादाचा प्रश्न पेटण्याची शक्यता आहे.
कर्नाटकच्या हिवाळी अधिवेशनाचा विरोध करण्यासाठी जात असताना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड करण्यात आली आहे. या कृतीचा महाराष्ट्र एकीकरण समितीने निषेध नोंदवला आहे. यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यात तात्पुरती म्हणून एसटी (MSRTC) सेवा बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.
आजपासून कर्नाटकचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. याविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने मेळावा आयोजित केला होता. मात्र मेळाव्याला जात असतानाच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड करण्यात आली आहे. मेळाव्याला परवानगी नसल्याने या नेत्यांची धरपकड करण्यात आली आहे.
राजकारणात भूकंप! ‘या’ राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये आर-पार लढाई; BJP ‘ऑपरेशन लोटस’ राबवणार?
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड करण्यात आल्याने त्याचे पडसाद महाराष्ट्रात देखील पसरले आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात कायमच एसटी बसला टार्गेट केले जाते. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून एसटी बस सेवा बंद करण्यात आली आहे. एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड झाल्याने तणाव वाढण्याची शक्यता आहे.
‘या’ राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये आर-पार लढाई
कर्नाटक राज्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डिके शिवकुमार यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. अडीच वर्षांचा कराराची आठवण करून देत डिके शिवकुमार यांनी सोशल मीडिया पोस्ट करत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना डिवचले आहे. हे प्रकरण दिल्लीट हायकमांडकडे गेले आहे. मात्र कॉँग्रेसमध्ये हा कलह सुरू असताना भाजप कर्नाटकमध्ये ऑपरेशन लोटस राबवणार का याची शक्यता आहे.
अडीच वर्षांच्या कारारानुसार डिके शिवकुमार हे कर्नाटकचे मुख्यमंत्री होण्याचा अंदाज आहे. मात्र विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा त्याला विरोध असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे डिके शिवकुमार यांनी सोशल मीडिया पोस्ट करत मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कॉँग्रेस नेतृत्वाला डिवचले आहे.






