'टेस्ट ट्यूब 'तून गायींची गर्भधारणा, 5 वर्षांत तब्बल 190 गायींचा जन्म
नागपूर : वंध्यत्वावर उपचार म्हणून कायमच ‘टेस्ट ट्यूब बेबी’ या वैज्ञानिक पद्धतीकडे बघितल्या गेले. पण हेच संशोधन झपाट्याने नष्ट होणा-या भारतीय गायींच्या प्रजाती वाचविण्यासाठी फायदेशीर ठरते आहे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील प्रजनन शास्त्राच्या प्रयोगशाळेने टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यामातून पाच वर्षांत 114 गायींना जन्म दिला आहे. आजच्या घडीला येथील 88 गायी गाभण आहेत. तसंच अत्याधुनिक संशोधनातून गायींच्या गभर्धारणेचा टक्काही 11.40 वरून 32.12 वर पोहचला आहे.
इलेक्ट्रिक वाहनांना भाडेपट्टा देण्यासाठी टाटा मोटर्सने व्हर्टेलोशी या कंपनीशी केली हातमिळवणी
पशु विज्ञान क्षेत्रातील संशोधनाचा फायदा नष्ट होत जाणा-या भारतीय गायींच्या प्रजाती वाचविण्यासाठी व्हावा यासाठी केंद्र सरकारने डिसेंबर 2020 मध्ये राष्ट्रीय गोकुल मिशन जाहीर केले. या अंतर्गत माफसू विद्यापीठात 2021 मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा सुरू झाली. माफसुचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रा. डॉ. मनोज पाटील यांच्यावर प्रजनन प्रयोग शाळेची धुरा सोपविण्यात आली. आज येथे डॉ. डी. एस. रघुवंशी, डॉ. ए. पी. गावंडे, डॉ. एम. एस. बावस्कर, डॉ. एस. ए. इंगळे आणि डॉ. ए. एम. शेंडे यांचे योगदान आहे.
गायीच्या नैसर्गिक गर्भधारणेच्या माध्यमातून गाय ही ऐवळ एका वासरूला जन्म देऊ शकते. परंतु टेस्ट ट्यूबच्या माध्यमातून गायीच्या एका खीबिजातून 32 ते 40 वासरांचा जन्म होतो. या माध्यमातून वेगाने चांगले गाय-बैल तयार होऊ लागले असून, अंडाणू गोठवून भविष्यासाठी जतन करता येतात.
गायीच्या प्रजातीचे संरक्षण करण्यासाठी ‘टेस्ट ट्यूब बेबी’चा प्रयोग मोलाचे पाऊल ठरणार आहे. माफसूची प्रयोगशाळा उत्पादन दरात देशातील दुस-या क्रमांकावर असून, विद्यापीठ स्तरावर प्रथम क्रमांकावर आहे. या प्रयोगशाळेचा सर्वच राज्यांना मोठा फायदा होईल हे निश्चित.
—डॉ. मनोज पाटील, प्राध्यापक, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ
उत्कृष्ट गाईची निवड केली जाते, गाईच्या बरगड्याचा आकार, पाठीवरील वरबीचे प्रमाण तपासले जाते. गाय निरोगी असणे आवश्यक असते. गरजेनुसार आहार, जंतुचे औषध दिल्या जाते.
प्रयोगशाळेत स्त्रीवीज जास्त प्रमाणात असलेल्या साहीवाल, गीर, गवाळू डांगी आणि देवनी प्रजातीच्या दाता गायी आहेत.
अल्ट्रासाऊंडच्या मदतीने गाईच्या अंडाशयातून स्त्रीबीज गोळा केले जाते. लॅबमध्ये स्त्रीचीज व बैलाच्या शुक्राणूचा संगम चड़यला जाती. 7 दिवसांत गायीचे भ्रूण तयार होतो. हे भ्रूण विना शास्त्रक्रीया गायीच्या गर्भाशयात सोडले जातात.
हे भ्रूण विना शस्त्रक्रीया गायीच्या गर्भाशयात सोडले जातात.
45 दिवसांनंतर गायीची गर्भचाचणी करण्यात येते, त्या गायीला सरोगेट गाय संबाधले सरोगेट गायीचे योग्य संगोपन राखले जाते. 9 महिन्यांनी वासराचा जन्म होतो
डिसेंबर 2020 मध्ये केंद्र सरकारने देशात 31 पशुविज्ञान प्रयोगशाळांना परवानगी दिली. प्रत्यक्षात यातील 19 सुरू झाल्या. तत्कालीन महाराष्ट्र सरकारच्या निरुत्साही धोरणाचा फटका बसल्यामुळे यातील राज्याच्या वाट्याला केवळ एका प्रयोगशाळेचे भाग्य लाभले. ही प्रयोगशाळा तेलंगखेडी भागात आहे.