Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pratap sarnaik : “…फक्त देखावा नको ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”, प्रताप सरनाईक यांची गणेशपेठ बसस्थानकाला अचानक भेट

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नागपूर शहरातील एसटीच्या गणेशपेठ बसस्थानकाला अचानक भेट दिली. त्यावेळी त्यांनी केवळ देखावा म्हणून प्रवासी सुविधा निर्माण करू नका!

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 08, 2025 | 05:29 PM
प्रताप सरनाईक यांची गणेशपेठ बसस्थानकाला अचानक भेट

प्रताप सरनाईक यांची गणेशपेठ बसस्थानकाला अचानक भेट

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रताप सरनाईक यांची गणेशपेठ बसस्थानकाला अचानक भेट
  • सर्व महत्त्वाच्या विभागांची तपासणी
  • चालक व वाहकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या
नागपूर: हिवाळी अधिवेशन आपल्या शहरांमध्ये आहे, त्यामुळे मंत्री कधीही भेट देऊ शकतात. त्यासाठी केवळ देखावा म्हणून प्रवासी सुविधा निर्माण करू नका! तर वर्षातील 365 दिवस प्रवाशांना त्यांच्या मूलभूत सुविधा मिळणे हे आपल्या कर्तव्य आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करा, असे निर्देश परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत.

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे कामकाज स्थगित झाल्यानंतर परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी नागपूरातील गणेशपेठ बसस्थानकाला अचानक भेट दिली . यावेळी मंत्री सरनाईक यांनी प्रसाधनगृह, उपहारगृह, चौकशी कक्ष, प्रवासी प्रतीक्षालय, चालक-वाहक विश्रांतीगृह यांसह सर्व महत्त्वाच्या विभागांची तपासणी केली. चालक व वाहकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गरम पाण्याची उपलब्धता आणि इतर सुविधा सुधारल्याबद्दल चालक-वाहकांनी मंत्री महोदयांचे आभार मानले.

Nanded News : मुलाखतींच्या तारखांबाबत इच्छुकांमध्ये झाला संभ्रम; भाजपामधील अंतर्गत वाद आला समोर

तसेच बसची प्रतिक्षा करत असलेल्या NCC कॅडेट विद्यार्थी आणि प्रवाशांशी चर्चा करून त्यांच्या सूचनांचा आढावा घेण्यात आला. महिला प्रवाशांसाठी विशेषतः स्ननदा मातांसाठी असलेल्या हिरकणी कक्षाची तपासणीही करण्यात आली. केवळ औपचारिकता पूर्ण करण्यासाठी हिरकणी कक्ष निर्माण करु नका ते अद्यायावत करून तिथे महिला कर्मचारी नियुक्त करा. असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले .

तपासणीदरम्यान काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या

• शौचालयांची स्वच्छता समाधानकारक असल्याचे आढळले.
• इतर एसटी स्थानकांच्या तुलनेत नागपूर बस स्थानकात सुमारे ९०% सुविधा चांगल्या अवस्थेत आहेत.
• मात्र कँटीनमध्ये अत्यंत अस्वच्छता व दुर्गंधी आढळून आली. यावर तत्काळ कारवाईचे आदेश देत कँटीनचा परवाना रद्द करण्यासाठी महानगरपालिकेलाही सूचना करण्यात आल्या.

सोलापूरचा धसका

सोलापूर आणि धाराशिव येथील अचानक भेटीमुळे एसटी प्रशासन खडबडून जागे झाले आहे. याची प्रचिती गणेशपेठ बसस्थानकावरील सुधारणा बघितल्यावर जाणवले,अशी मिश्किल प्रतिक्रिया मंत्री सरनाईक यांनी दिली. राज्यातील एसटी बसस्थानकावरील सुविधांमध्ये सकारात्मक बदल दिसत असून, हे बदल केवळ देखावा न राहता वर्षातील 365 दिवस प्रवाशांना त्यांच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. अशा सुचना मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिल्या.

दरम्यान विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या “विद्यार्थी हेल्पलाइन” च्या माध्यमातून अनेक तक्रारींचे जलद निरसन होत आहे, परंतु तक्रारी होणार नाहीत अशी यंत्रणा कार्यान्वित करण्यावर भर देण्यात येणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या सेवांमध्ये स्वच्छता, सुविधा आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी पुढील काळातही कडक भूमिका कायम राहील, असे सांगितले.

Tukaram Mundhe News: स्मार्ट सिटी प्रकरणात तुकाराम मुंढेंवर गंभीर आरोप; निलंबनाची मागणी, भाजप आमदाराला धमकीचा कॉल

Web Title: Pratap sarnaik sudden visit to the ganeshpeth st bus station in nagpur city news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 05:29 PM

Topics:  

  • msrtc
  • pratap sarnaik
  • st bus

संबंधित बातम्या

मराठी-कन्नड वाद चिघळणार? कर्नाटकात मराठीची गळचेपी! नेत्यांची धरपकड, ST सेवाही बंद अन्…
1

मराठी-कन्नड वाद चिघळणार? कर्नाटकात मराठीची गळचेपी! नेत्यांची धरपकड, ST सेवाही बंद अन्…

महाराष्ट्र फिरायचाय? मग ‘लालपरी’ आहे ना! आवडेल तिथे प्रवास योजना स्वस्त; पास रक्कम वाचून…
2

महाराष्ट्र फिरायचाय? मग ‘लालपरी’ आहे ना! आवडेल तिथे प्रवास योजना स्वस्त; पास रक्कम वाचून…

MSRTC News: हात केला की बस थांबणार! न थांबल्यास ‘या’ नंबरवर तक्रार करता येणार
3

MSRTC News: हात केला की बस थांबणार! न थांबल्यास ‘या’ नंबरवर तक्रार करता येणार

एसटीत गुंडगिरी, धावत्या बसमध्ये चालकाला दांडक्याने मारहाण; VIDEO व्हायरल
4

एसटीत गुंडगिरी, धावत्या बसमध्ये चालकाला दांडक्याने मारहाण; VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.