नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं बारावीच्या परिक्षेबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. बारावीची (HSC) लेखी परीक्षा ही 4 मार्च ते 30 मार्च दरम्यान घेण्यात येणार सांगण्यात आलं आहे. तर, इयत्ता दहावीची (SSC) लेखी परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान होणार आहे. मात्र या निर्णयाला विद्यार्थ्यांनी विरोध दर्शविला असून आज नागपुरमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केल.
[read_also content=”१९ वर्षाच्या मुलाने जगातील सर्वात मोठ्या श्रीमंताच्या आणलेत नाकीनऊ, जाणून घ्या नेमकं प्रकरण https://www.navarashtra.com/business/tracks-the-elon-musks-private-jet-19-year-old-has-developed-bot-nrvb-230211.html”]
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. ऑनलाईन परीक्षा आयोजित करणं शक्य नसल्याचं मंडळाने स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र, हा निर्णय विद्यार्थ्यांना फारसा रुचलेला नाही आहे. या निर्णयाचा निषेध करत नागपूरमध्ये (Nagpur Student Protest) विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षांना विरोध केला आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्यात यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे.
कोल्हापूरमध्येही विद्यार्थ्यी उतरले रस्त्यावर
दहावी बारावीची बोर्ड परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात या मागणीसाठी कोल्हापुरातीलही (Kolhapur) विद्यार्थी आक्रमक झाले होते. या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं एसएससी बोर्ड कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. शिक्षण ऑनलाईन झालं असताना परीक्षा ऑफलाईन का? असा सवाल विद्यार्थ्यांच्यावतीनं करण्यात आला आहे. पालकांनी देखील ऑनलाईन परिक्षेचीच मागणी केली आहे.
[read_also content=”2022 च्या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांच्या काय आहेत अपेक्षा? https://www.navarashtra.com/business/ten-banks-available-24-hours-for-lics-jumbo-ipo-order-to-complete-the-process-in-just-three-weeks-not-75-days-230264.html”]