Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाविकास आघाडीचे सरकार येताच मराठवाड्यातील…; नाना पटोलेंचं मोठं आश्वासन

मराठवाड्यात गायरान जमिनीचा प्रश्न गंभीर असून, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर गायरान जमिनीचा प्रश्न सोडवू, असे आश्वासन नाना पटोले यांनी दिले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 08, 2024 | 12:30 AM
महाविकास आघाडीचे सरकार येताच मराठवाड्यातील...; नाना पटोलेंचं मोठं आश्वासन

महाविकास आघाडीचे सरकार येताच मराठवाड्यातील...; नाना पटोलेंचं मोठं आश्वासन

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मराठवाड्यात गायरान जमिनीचा प्रश्न गंभीर असून, अशोक चव्हाण दोनदा राज्याचे मुख्यमंत्री झाले तरीही त्यांनी हा प्रश्न सोडवला नाही. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर गायरान जमिनीचा प्रश्न सोडवू, असे आश्वासन देत या भागात शेतात जाण्यासाठी आजही पाणंद रस्ते आहेत, सरकार आल्यानंतर हे पाणंद रस्तेही मजबुत केले जातील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणूकीतील काँग्रेस मविआचे अधिकृत उमेदवार रविंद्र वसंतराव चव्हाण आणि भोकर विधानसभेचे अधिकृत उमेदवार तिरुपती (पप्पू) कदम कोंढेकर यांच्या प्रचारार्थ नाना पटोले यांची मुदखेड मध्ये जाहीर सभा झाली.

या सभेत बोलताना पटोले पुढे म्हणाले की, नांदेड जिल्ह्यात भाजपा विरुद्ध काँग्रेस असे चित्र कुठेच दिसत नसून येथील हुकूमशाहीच्या विरोधात काँग्रेस लढत आहे, या हुकूमशाहीला सत्तेतून बाहेर काढले पाहिजे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षातून दोनदा मुख्यमंत्रीपद, अनेक वर्षे मंत्रीपद भोगले पण काँग्रेस पक्ष अडचणीत असताना ते काँग्रेसला सोडून भाजपात गेले. ज्या काँग्रेस पक्षाने त्यांना मोठे केले त्यालाच आज ते शिव्या देत आहेत. अशोक चव्हाण भाजपामध्ये असते तर त्यांचा राजकीय उदय झाला नसता. दोनदा मुख्यमंत्री झाले पण त्यांनी स्वतःचे घर भरण्याचेच काम केले. सत्तेचा वापर करून दहा पिढ्यांचा उद्धार केला आणि जेलमध्ये जावे लागेल या भितीने अशोक चव्हाण भाजपात गेले. भाजपात जाताच देवेंद्र फडणवीसांनी अशोक चव्हाण यांच्या साखर कारखान्याला १५० कोटी रुपये दिले. आता अशोक चव्हाण यांचा सातबारा खोडायची वेळ आली आहे, असे नाना पटोले म्हणाले.

राज्यात आज महिला सुरक्षित नाहीत, शाळेत जाणाऱ्या मुली सुरक्षित नाहीत, ६७ हजार महिला राज्यातून बेपत्ता झाल्या आहेत पण सरकारकडे त्याचे उत्तर नाही. मविआ सत्तेत आल्यानंतर महिलांचा मान मन्मान राखला जाईल, महिलांना दर महिन्याला ३ हजार रुपये दिले जातील, राज्यभर एसटी बस प्रवास मोफत असेल. शिंदे- भाजपा सरकारने प्रचंड भ्रष्टाचार केला असून, सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये लाखो रुपये वसुल केले आहेत, युती सरकारचे यासाठी रेडकार्ड ठरलेले आहे. मविआ सरकार आल्यास भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प आहे, असेही नाना पटोले यांनी सांगितले.

Web Title: Nana patole has given a big promise to the people from the meeting in nanded nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2024 | 12:30 AM

Topics:  

  • ashok chavhan
  • BJP
  • Congress
  • maharashtra
  • Nana patole

संबंधित बातम्या

Political News: राज ठाकरेंच्या मुंबईतील सभेपूर्वीच मनसेला मोठा धक्का, ‘या’ बड्यानेत्याने हाती घेतला भाजपचा झेंडा
1

Political News: राज ठाकरेंच्या मुंबईतील सभेपूर्वीच मनसेला मोठा धक्का, ‘या’ बड्यानेत्याने हाती घेतला भाजपचा झेंडा

भाजप बलात्काऱ्यांनाही संधी देणारा पक्ष, बेटी बचाव, बेटी पढाव नाही तर…; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
2

भाजप बलात्काऱ्यांनाही संधी देणारा पक्ष, बेटी बचाव, बेटी पढाव नाही तर…; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

Navi Mumbai Election : पनवेलकरांचा भाजपाला दणदणीत पाठिंबा; सरस्वती काथारा यांना मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद
3

Navi Mumbai Election : पनवेलकरांचा भाजपाला दणदणीत पाठिंबा; सरस्वती काथारा यांना मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद

Pune Election : भाजपच्या सभेला नागरिकांचा प्रतिसाद! प्रभाग 09 साठी जाहीरनामा प्रसिद्ध
4

Pune Election : भाजपच्या सभेला नागरिकांचा प्रतिसाद! प्रभाग 09 साठी जाहीरनामा प्रसिद्ध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.