सणांच्या निमित्ताने भेसळयुक्त मिठाई बाजारामध्ये विक्रीस उपलब्ध आहे (फोटो - AI)
Nanded News : नांदेड : नांदेड शहरात मोठ्या प्रमाणावर मिठाई, नमकीन, डेअरी उत्पादने तसेच विविध प्रकारचे पॅकबंद खाद्यपदार्थ विक्री करणारी दुकाने, हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रे कार्यरत आहेत. मात्र या ठिकाणी विक्री होणाऱ्या अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचे पालन याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाकडून नियमित तपासणी होत नसल्याची नागरिकांमध्ये तीव नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील अनेक मिठाई दुकाने, फास्टफूड सेंटर, हॉटेल्स तसेच नमकीन आणि डेअरी उत्पादनांची विक्री करणाऱ्या केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर अन्नपदार्थ तयार करून विक्री केली जाते. (Crime News) विशेषतः सणासुदीच्या काळात किंवा उन्हाळ्यात मिठाई, पेढे, बर्फी, नमकीन यांसारख्या पदार्थांची मागणी वाढत असते. मात्र या पदार्थाच्या दर्जाबाबत किंवा त्यामध्ये भेसळ तर नाही ना, याची अधिकृत तपासणी क्वचितच होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. (Nanded News)
डेअरी उत्पादनांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात यावेत
तपासणीदरम्यान विविध खाद्यपदार्थाचे नमुने अधिकृत पद्धतीने संकलित करून ते प्रयोगशाळेकडे पाठविणे, तसेच अन्नसुरक्षा नियमांचे पालन होते की नाही याची खात्री करणे आवश्यक
असल्याचेही मत व्यक्त होत आहे. विशेषतः मिठाई, पेढे, बर्फी, नमकीन आणि पॅकबंद डेअरी उत्पादनांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात यावेत, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
हे देखील वाचा : “हे परराष्ट्र धोरणाचे अपयश..! गॅस तुटवड्यावरुन विरोधकांचा मोदी सरकारवर निशाणा
नियमांचे केले जातेय उल्लंघन
शहरातील अनेक दुकाने आणि हॉटेल्समध्ये पॅकबंद पदार्थ, गोडधोड मिठाई, तेलकट पदार्थ तसेच डेअरी उत्पादनांची विक्री केली जाते. काही ठिकाणी उत्पादनांची साठवणूक आणि स्वच्छतेचे नियम योग्य प्रकारे पाळले जात नसल्याच्या तक्रारी देखील वेळोवेळी पुढे येत असतात. अशा परिस्थितीत अन्न व औषध प्रशासन विभागाने शहरातील प्रमुख मिठाई दुकाने, नमकीन विक्री केंद्रे, हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांवर विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
हे देखील वाचा : TETमध्ये इंग्रजी सक्तीची करा! मराठी माध्यमातील शिक्षकांसाठी पळवाटा रोखण्यासाठी परिपत्रक
नियमांचे पालन व्हावे
नांदेड शहरात अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन व्हावे आणि नागरिकांना मान सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने नियमित तपासणी मोहीम राबवणे तुट गरजेचे असल्याचे जाणकारांचे मत आहे. भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ गुन विक्री होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, सा अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात बा येत आहे. नियमित तपासणीमुळे क्रम अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत जागरूकता पो वाढून ग्राहकांचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली कन जात आहे.






