Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded News: नांदेड मनपा रणधुमाळी: भाजप-शिवसेना, राष्ट्रवादी, महाविकास आघाडी सगळेच अडचणीत

काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण व प्रमुख पदाधिकारी मुंबईत असून गुरुवारी कॉग्रेसची महत्त्वाची बैठक झाली आहे. स्थानिक पातळीवर कॉंग्रेसने प्रभागनिहाय सक्षम उमेदवारांची चाचणी सुरू केली

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 26, 2025 | 04:50 PM
Nanded News: नांदेड मनपा रणधुमाळी: भाजप-शिवसेना, राष्ट्रवादी, महाविकास आघाडी सगळेच अडचणीत
Follow Us
Close
Follow Us:
  • महापालिका निवडणुकीच्या पूर्वतयारीत भाजपाने सुरुवातीला आघाडी घेतली
  • राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून भाजपसमोर युतीचा प्रस्ताव
  • काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.), शिवसेना (उबाठा) गटाचे तळ्यात मळ्यात
Nanded News: नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होऊन दोन दिवस उलटले तरी शहराच्या राजकारणात अपेक्षित महायुती वा आघाडीचा जन्म झालेला नाही. भाजप-शिवसेना, काँग्रेस वंचित, महाविकास आघाडी अशा सर्वच पातळ्यांवर केवळ चर्चा, प्रस्ताव आणि गुप्त बैठकांचे गुऱ्हाळ सुरू असून प्रत्यक्षात मात्र युतीचा निर्णय कुठेही ठोसपणे पुढे सरकलेला दिसत नाही. परिणामी इच्छुक उमेदवारांची घालमेल वाढली असून राजकीय वातावरण अधिकच अस्वस्थ झाले आहे.

महापालिका निवडणुकीच्या पूर्वतयारीत भाजपाने सुरुवातीला आघाडी घेतल्याचे चित्र होते. स्थानिक पातळीवरील जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले, निरीक्षक व प्रभारी यंत्रणा कार्यरत झाली; मात्र उमेदवारी निश्चितीच्या टप्प्यावरच युतीचा पेच निर्माण झाला. भाजप-शिवसेना युतीसंदर्भात दोन फेऱ्यांच्या चर्चा होऊनही अद्याप कोणताही ठोस निष्कर्ष निघालेला नाही. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे दोन्ही राज्यसभा सदस्य, संघटन मंत्री – संजय कौडगे आणि खासदार अजित डॉ. गोपछडे मंगळवारी मुंबईत होते. त्यांनी नांदेड मनपा निवडणुकीच्या प्रभारी व राज्याच्च्या मंत्री पंकजाताई मुंडे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. इच्छुक उमेदवारांची प्रभागनिहाय यादी, माजी नगरसेवकांची माहिती आणि पक्षातील ज्येष्ठ निष्ठावंतांची स्थिती त्यांनी मुंडेंसमोर मांडली.

Lucknow Plants theft : PM मोदींचा कार्यक्रम संपला अन् झाली चोरी: कुंड्यांसाठी उडाली झुंबड

युतीच्या चर्चेला वेगळे वळण देत राज्यातील महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेही भाजपसोबत युतीचा प्रस्ताव समोर ठेवला आहे. राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाने अधिक जागा घ्याव्यात आणि त्यानंतर शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यात जागावाटप व्हावे, अशी मांडणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ओमप्रकाश पोकर्णा यांनी केली. मात्र भाजपातील अंतर्गत नाराजी, मागील निवडणुकांचे अनुभव आणि स्थानिक राजकारण पाहता ही मांडणी फारशी सकारात्मक वाटत नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादीने “आम्ही सर्व २० प्रभागांतील ८१ जागा स्वबळावर लढवण्याची तयारी ठेवली आहे,” असे स्पष्ट करत भाजपाला सावधगिरीचा इशारा दिला आहे. मित्रपक्षांना सोबत न घेता एकट्याने निवडणूक लढविल्यास त्याचा फटका भाजपालाच बसेल, असा थेट इशाराही पोकर्णा यांनी दिला आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.), शिवसेना (उबाठा) गटाचे तळ्यात मळ्यात

दुसरीकडे महाविकास आघाडीचे चित्रही तितकेच धूसर आहे, काँग्रेस व शिवसेना (उद्धव ठाकरे गट) हे पक्ष सध्या स्वतंत्रपणे तयारी करत असल्याचे दिसून येते. इच्छुकांच्या मुलाखती, प्रभागनिहाय चाचपणी सुरू असून आम्ही सज्ज आहोत असा संदेश दिला जात आहे. वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत आघाडी करण्यास इच्छुक असल्याचे समजते. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी नांदेड येथे काँग्रेससोबत आघाडीबाबत अनुकूलता दर्शवली असली, तरी त्या दिशेने अद्याप ठोस पाऊल पडलेले नाही.

Railway Ticket Price Increase : रेल्वेचा प्रवास महागला! आजपासून दरवाढ लागू, सामान्यांच्या खिशाला कात्री

काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण व प्रमुख पदाधिकारी मुंबईत असून गुरुवारी कॉग्रेसची महत्त्वाची बैठक झाली आहे. स्थानिक पातळीवर कॉंग्रेसने प्रभागनिहाय सक्षम उमेदवारांची चाचणी सुरू केली, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ची स्थिती अधिकव अडचणीत दिसत आहे. जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये प्रभाव दाखवण्यात अपयश आल्यामुळे मनपा निवडणुकीत या गटाचे स्वतंत्र अस्तित्व कुठे दिसेल, याबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याच पाश्र्वभूमीवर भाजपातील स्थानिक नेते जर एकसंध भूमिका घेत असतील, तर काँग्रेसशी बेट चर्चा करून नव्या प्रकारचा जागावाटपाचा प्रयोग करता येईल का, यावर राष्ट्र‌वादीत अंतर्गत मंथन सुरू आहे. काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्याशी यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता अधिकृत सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.

एकूणच, नांदेड मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीपूर्वीच युतीचा पेच, पक्षांतर्गत नाराजी, स्वबळाच्या घोषणा आणि गुप्त बैठका यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. युती होणार की स्वबळावर लढाई रंगणार, याचा फैसला अद्याप गुलदस्त्यातच असून, या निर्णयावरच नांदेडच्या राजकारणाची पुढील दिशा ठरणार आहे.

Maharashtra Politics: शरद पवार होणार NDA मध्ये सामील? महायुतीच्या नेत्याने केला मोठा दावा

काँग्रेसकडून जोरदार तयारीः खा. रवींद्र चव्हाण

आघाडीबाबत अजून काही निर्णय झाला नसून आप आपल्या परीने बाचपणी सुरू आहे. काँग्रेसने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत, मनपाची निवडणूक जोरदारपणे लढविण्याची तयारी काँग्रेसने केली असून येत्या ३० तारखेपर्यंत आघाडीबाबतचे चित्र स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे खासदार रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

भाजपसोबत जागा वाटपाबाबत बैठक होणार : आ. हेमंत पाटील

भाजपसोबत युती करण्याबाबत शिवसेनेकडून प्रयत्न सुरू असून जागावाटपावरून बोलणी सुरू आहे. केवळ ६ जागा शिवसेनेला देण्यात येतील, असे भाजपकडून सांगण्यात आले होते, त्यामुळे युतीची बोलणी पुढे झाली नाही, शिवेसेनेला किमान ३० जागा द्याव्यात, अशी अपेक्षा आहे, याबाबत उद्या भाजपच्या नेत्यांसोबत बैठक होणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी दिली.

 

 

 

Web Title: Nanded news nanded municipal corporation election battle bjp shiv sena ncp and the entire maha vikas aghadi are all in trouble

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2025 | 04:50 PM

Topics:  

  • ajit pawar
  • BJP
  • nanded news
  • Nationalist Congress Party
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

Nanded Politics : मुख्यमंत्र्यांची सभा, तरीही पराभव! संतोष बांगर यांचे संघटनकौशल्य निर्णायक
1

Nanded Politics : मुख्यमंत्र्यांची सभा, तरीही पराभव! संतोष बांगर यांचे संघटनकौशल्य निर्णायक

Mira Bhayandar Election: मीरा-भाईंदरमध्ये भाजप युतीसाठी तयार, मात्र ठेवल्या स्पष्ट अटी-शर्ती
2

Mira Bhayandar Election: मीरा-भाईंदरमध्ये भाजप युतीसाठी तयार, मात्र ठेवल्या स्पष्ट अटी-शर्ती

राज्यात पुन्हात वाजणार घड्याळाची टीकटीक; अजित पवारांची मागणी शरद पवारांना होणार मान्य?
3

राज्यात पुन्हात वाजणार घड्याळाची टीकटीक; अजित पवारांची मागणी शरद पवारांना होणार मान्य?

Prashant Jagtap News:  शरद पवार यांची साथ का सोडली? प्रशांत जगतापांनी सांगितलं कारण
4

Prashant Jagtap News: शरद पवार यांची साथ का सोडली? प्रशांत जगतापांनी सांगितलं कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.