संग्रहित फोटो
जखमींना तातडीच्या उपचारांच्या सूचना
तसेच जखमींना आवश्यक उपचार व वैद्यकीय सुविधा मिळतील, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या अपघातातील जीवितहानीबद्दल पालकमंत्री अतुल सावे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. “या दुःखद घटनेत जीवितहानी झाल्याने मनस्वी दुःख झाले. या कठीण प्रसंगी माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबीयांसोबत आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना करतो,” असे त्यांनी म्हटले आहे.
हे सुद्धा वाचा : जनतेला पाण्याची चिंता, अहमदपूर तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर; अनेक तलाव कोरडे
उपचारांचा आधार
अपघातातील मृत व्यक्तींच्या निकटवर्तीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) प्रत्येकी २ लाख रुपयांची सानुग्रह मदत मिळण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या घटनेची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही देण्यात आली असून त्यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. अपघातग्रस्त कुटुंबीयांना आवश्यक ती शासकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
हे सुद्धा वाचा : लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात; कारवाईनंतर काही तासांतच दिली उपनगराध्यक्षांना धमकी
गोंदिया-बालाघाट मार्गावर भीषण अपघात
गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर नागरा परिसरात ट्रक आणि बोलेरो प्रवासी वाहनाची समोरासमोर झालेली भीषण धडक झाली. या अपघातात बोलेरोमधील सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृत आणि जखमी प्रवाशांपैकी बहुतांश जण मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.






