Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded News : धोंडगेंचा प्रवेश कलाटणी देणारा…; नांदेडमध्ये DCM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

लोहा येथील बैल बाजार मैदानावर माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांच्या पुढाकारातून शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 30, 2026 | 02:34 PM
DCM Eknath Shinde Attends Farmers' Rally Organized by Former MLA Shankarrao Dhondge Nanded News

DCM Eknath Shinde Attends Farmers' Rally Organized by Former MLA Shankarrao Dhondge Nanded News

Follow Us
Follow Us:

Nanded Political News : लोहा : आजचा दिवस शिवसेनेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा असून शेतकऱ्यांसाठी अहोरात्र झटणारे कार्यकर्ते म्हणजे शंकरअण्णा धोंडगे आहेत, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात केले. लोहा येथील बैल बाजार मैदानावर माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांच्या पुढाकारातून शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर खासदार ज्योती वाघमारे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी मंत्री सिद्धराम मेह्त्रे, आमदार हेमंत पाटील, बालाजी कल्याणकर, आनंदराव बोंढारकर, बाबुराव कदम कोहळीकर, माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, दत्ता पवार, शिवराज बोंडगे, दिलीप धोंडगे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. (Political News)

अण्णांनी शेतकऱ्याच्या मुलावर विश्वास ठेवला

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “शंकरअण्णा धोंडगे यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला असून अनेक माजी सैनिकांचाही सहभाग आहे. “जय जवान, जय किसान” असा हा संगम असल्याचे त्यांनी सांगितले. शंकरअण्णा यांनी माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलावर विश्वास ठेवला, हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण असल्याचेही त्यांनी नमूद केले.

हे देखील वाचा :  काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांचा भीषण अपघात; एअरबॅग उघडल्या नाहीच अन्..

शेतकऱ्यांच्या पाठीशी

शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे काम सरकारने केले असून मुख्यमंत्री असताना केंद्र सरकारचे सहा हजार रूपये व राज्य सरकारचे सहा हजार रूपये असे बारा हजार रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्याचा निर्णय घेतल्याचे शिंदे यांनी सांगितले. शेतकरी हा राज्याचा अन्नदाता असून राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क बळीराजाचा आहे, असे त्यांनी ठामपणे नमूद केले. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन दिवाळीपूर्वीच त्यांच्या खात्यात आर्थिक मदत जमा करण्यात आली. काहींना शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाल्याचे पटले नाही, मात्र सरकारने नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले,. शंकरअण्णा हे महाराष्ट्रातील कष्टकरी, शेतकऱ्यांचे नेते झाले असून अण्णांचा शिवसेना प्रवेश राजकारणाला कलाटणी देणारा ठरला आहे. असेही शिंदे यावेळी म्हणाले.

हे देखील वाचा : पार्थ पवार अन् राज ठाकरेंची भेट; तब्बल दीड तास चर्चा, कारण मात्र गुलदस्त्यात

महिलांच्या सक्षमीकरणासाठी शिवसेना कटिबद्ध असून विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनविण्याचे काम सुरू आहे, असे प्रतिपादन राज्यसभा खासदार डॉ. ज्योतीताई वाघमारे यांनी केले. संध्याताई फाऊंडेशनतर्फे जागतिक महिला दिन सप्ताहानिमित्त गोकुळ लॉन्स, नांदेड येथे आयोजित ‘नवरत्न महिला सन्मान’ पुरस्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा उल्लेख करत महिलांना आर्थिक बळ देण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे सांगितले. तसेच आ. बालाजी कल्याणकर व त्यांच्च्या पत्नी संध्याताई कल्याणकर यांनी बचतगटाच्या माध्यमातून २१ हजार महिलांना स्वावलंबी केले, हे देखील त्यांनी सांगितले आहे.

Web Title: Dcm eknath shinde attends farmers rally organized by former mla shankarrao dhondge nanded news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 02:34 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • nanded news
  • Nanded Politics

संबंधित बातम्या

Eknath Shinde : एसटी बसस्थानकांचा कायापालट होणार! १४७ बसस्थानकांचा पुनर्विकास, एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मोठा निर्णय
1

Eknath Shinde : एसटी बसस्थानकांचा कायापालट होणार! १४७ बसस्थानकांचा पुनर्विकास, एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मोठा निर्णय

Shivsena Supremacy Battle: निवडणूक आयोगाचा निर्णयच चुकीचा!; कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाने सर्वोच्च न्यायालयात खळबळ
2

Shivsena Supremacy Battle: निवडणूक आयोगाचा निर्णयच चुकीचा!; कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाने सर्वोच्च न्यायालयात खळबळ

Nanded Crime News: ‘मंगल, माझ्याशी लग्न कर!’ नकार मिळताच नात्याला रक्तरंजित वळण; तरुणीचा मृत्यू, प्रियकर फरार!
3

Nanded Crime News: ‘मंगल, माझ्याशी लग्न कर!’ नकार मिळताच नात्याला रक्तरंजित वळण; तरुणीचा मृत्यू, प्रियकर फरार!

Sangli News : दहा वर्षांपेक्षा जास्त सेवा केलेल्या महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्या; एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4

Sangli News : दहा वर्षांपेक्षा जास्त सेवा केलेल्या महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्या; एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.